सर्वांसाठी🎯घरबसल्या कमाईचा मार्ग । Best Passive Income Ideas in Marathi। Sell E Book Earn Money

Income Idea : Make money by creating and selling eBooks

     नमस्कार! जय महाराष्ट्र ..🙏🏻

    मंडळी, तुम्हाला माहीतच आहे की,आपण 100 Days 100 income ideas असे चॅलेंज घेतलेले.त्याच संदर्भात आजचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे.. चला तर सुरुवात करूया..

   जवळपास प्रत्येकालाच लहानपणापासून काहीतरी छंद असतो कुणाला गायन करायला आवडते तर कुणाला नृत्य  करायला आवडते तर कुणाला वाचन करायला आवडते. ज्या व्यक्तींना वाचन करण्याचा छंद आहे अशा व्यक्ती नेहमीच वेगवेगळ्या पुस्तकांच्या शोधामध्ये असतात. मग त्यासाठी या व्यक्ती विविध वाचनालयामध्ये जातात तसेच ग्रंथालयांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या पुस्तकांचा शोध घेत असतात किंवा पुस्तकांच्या दुकानांमध्ये त्यांना हवे असणारे पुस्तक वाचण्यासाठी जातात परंतु नेहमीच पुस्तक विकत घेण्यासाठी वेळ असतो तसे नाही मग अशावेळी उपयोगी पडते ते म्हणजे ebook.

  Ebook म्हणजे काय तर पुस्तकाचे डिजिटल कन्वर्जन. ई बुक्स हे मोबाईल टॅबलेट किंवा लॅपटॉप यांसारख्या डिव्हाइसेस वर वाचता येतात त्यामुळे वाचकांचा वेळ आणि खर्च दोन्हीही वाचते.

   तर आजचा टॉपिक या संदर्भात आहे Ebook  तयार करून ते सेल करून कशा रीतीने इनकम जनरेट होऊ शकतो हे बघणार आहोत…

आता ई बुक कसे तयार करायचे हे बघूया … How to Create eBook

  • सर्वप्रथम तुम्हाला कोणत्या विषयावर ई बुक लिहायचे आहे हे ठरवा. तसेच ईबुकला काय नाव देणार आहात हे ठरवा.
  • ई बुक लिहायचा विषय ठरवून झाल्यानंतर रूप रेषा किंवा स्ट्रक्चर तयार करा जेणेकरून तयार करत असलेल्या ई-बुक मध्ये कोणकोणते चाप्टर्स तयार करणार आहात तसेच त्यामध्ये कोणती माहिती लिहिणार आहात हे ठरवा, ई-बुकचा कन्टेन्ट तयार करा.
  • ई बुक चा कन्टेन्ट तयार करून झाल्यानंतर ई-बुक साठी आवश्यक असणारे आकर्षक असे कव्हर पेज तयार करा. कव्हर पेज तयार करण्यासाठी Canva या वेबसाईटचा किंवा ॲपचा उपयोग करू शकता.
  • त्यानंतर तयार झालेल्या कंटेंटचे कन्वर्जन पीडीएफ फॉरमॅट मध्ये करा.
  • अशा रीतीने बुक तयार होईल.

आता ई बुक पब्लिश कसे करता येईल हे बघूयात … How to Publish eBook On Amazon

  • ई बुक पब्लिश करण्यासाठी विविध प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत जसे की Amazon Kindle Direct Publishing, Smashwords, Visme, Rakuten Kobo,Payhip, Sellfy and Gumroad आणि इतर काही.
  • आता उदाहरण म्हणून ॲमेझॉन किंडल यावर ई-बुक कसे पब्लिश करता येईल हे बघूया.
  • सर्वप्रथम ॲमेझॉन ही वेबसाईट ओपन करून Kindle direct या ऑप्शन वर क्लिक करा आणि नंतर ॲमेझॉन अकाउंटद्वारे साइन अप करा.
  • त्यानंतर create a new title या ऑप्शन वर क्लिक करून title ,subtitle,description ,language आणि author name अशी विचारलेली माहिती भरून save करा.
  • आता Kindle ebook content  यामध्ये तयार केलेले बुक अपलोड करा.
  • ई बुक अपलोड केल्यानंतर 24 तासांमध्ये Amazon Kindle कडून ई बुक रिव्ह्यू करण्यात येते.
  • ई बुक रिव्ह्यू झाल्यानंतर approvel मिळते त्यानंतर Kindle ebook pricing या ऑप्शनवर क्लिक करून आपण ठरवलेली ई-बुक ची किंमत टाईप करायची आहे.
  • नंतर publish your ebook या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. अशा रीतीने ईबुक पब्लिश होते.
  • आपले ई बुक खरेदी झाल्यानंतर आपल्याला जो इन्कम जनरेट होतो त्यापैकी काही टक्के ॲमेझॉन किंडल स्वतःकडे ठेवून घेते.

अशाप्रकारे बुक तयार करून पब्लिश करून त्यामधून इनकम मिळवता येऊ शकतो.

ई-बुकचे विविध फायदे आहेत जसे की, Benefits of eBook

  • अगदी कुठेही ई बुक वाचता येऊ शकते.
  • तसेच कितीही ई बुक्स मोबाईल, टॅब किंवा लॅपटॉप वर डाऊनलोड करता येऊ शकतात.
  • पुस्तक खरेदी करण्यासाठी लागणारा वेळ आणि पैसे सुद्धा वाचतात.

असे अनेक फायदे असल्याने ई-बुक वाचकांकडून नक्कीच डाऊनलोड किंवा खरेदी केले जाते. त्यामुळे ही इन्कम आयडिया व्यवस्थित रित्या काम केल्यास नक्कीच फायदा मिळवून देणारी ठरू शकते.

 जर तुम्ही स्वतः ई बुक लिहिणार नसेल तरीसुद्धा ज्यांना ईबुक पब्लिश करता येत नाही अशा लोकांना सुद्धा तुम्ही सर्विस प्रोव्हाइड करू शकता आणि इन्कम जनरेट करू शकता.

तर कशी वाटली आजची इन्कम आयडिया ?? कमेंट करून नक्की कळवा. तसेच इतर कोणत्या इन्कम आयडिया बद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी आहे हे सुद्धा कमेंट करा.

खालील व्हिडिओ मध्ये सम्पुर्ण माहिती आहे

 How To Create ebook Free- Link

 How to Sell Ebook Online in Marathi- Link

watch Full Video-