७ सोलर बिझनेस आयडियाज | 7 Solar Business ideas –
आजच्या लेखामध्ये आपण सोलर संबंधित कोणकोणते व्यवसाय आपण सुरू करू शकतो अशा व्यवसायांबद्दल माहिती बघणार आहोत. नक्कीच याचा फायदा तुम्हाला होईल, चला तर सुरुवात करूयात…
आजच्या लेखामध्ये आपण सोलर संबंधित कोणकोणते व्यवसाय आपण सुरू करू शकतो अशा व्यवसायांबद्दल माहिती बघणार आहोत. नक्कीच याचा फायदा तुम्हाला होईल, चला तर सुरुवात करूयात…
1 . सोलर प्रोडक्ट्स रिटेल स्टोअर | Solar products retail Store –
हल्ली सोलर वर चालणारे कित्येक प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत तसेच सोलर संबंधित इतर प्रॉडक्ट्स उदाहरणार्थ सोलर पॅनल, बॅटरी ,इन्वर्टर अशी उत्पादने रिटेल स्टोअर सुरू करून त्यामध्ये विक्रीसाठी ठेवू शकता. या व्यवसायामध्ये आपण सौर उपकरणे वापरू इच्छिणाऱ्या ग्राहकांना तसेच या क्षेत्रामध्ये व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना सुद्धा टार्गेट करू शकतो.
2 . सोलर कन्सल्टन्सी | Solar Consultancy –
सोलर ऊर्जेचा अवलंब करू पाहणाऱ्या व्यक्तींना तसेच व्यावसायिकांना जर आपण सोलर बद्दल तज्ञ असू तर कन्सल्टन्सी सर्विसेस उपलब्ध करून देऊ शकतो यामध्ये सिस्टीम डिझाईन, फिजिबिलिटी स्टडीज, साईट असेसमेंट , सोलर एनर्जी सोल्युशन्स इम्प्लिमेंट करण्यासाठी एक्सपर्ट गायडन्स, कॉस्ट इफेक्टिव्ह स्ट्रॅटेजीज अशा काही गोष्टींचा समावेश होतो.
3 . सोलर इन्स्टॉलेशन सर्विसेस | Solar Installation Services –
सध्या बरेच लोक सोलर पॅनलचा उपयोग करत आहेत त्यामुळे याची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहेत आणि म्हणूनच सोलर इन्स्टॉलेशन सर्विसेस हा व्यवसाय सुरू करणे फायदेशीर ठरू शकतो. यामध्ये रेसिडेन्शिअल तसेच कमर्शियल सोलर इन्स्टॉलेशन सर्विसेस आपण उपलब्ध करून देऊ शकतो.
४ . सोलर एनर्जी ऑडिटिंग | Solar Energy Auditing –
सोलर एनर्जी ऑडिटिंग हा सुद्धा एक चांगला व्यवसाय ठरू शकतो त्यासाठी आपल्याकडे चांगली संभाषण कौशल्य त्याचबरोबर सोलर एनर्जी बद्दल व्यवस्थित रित्या ज्ञान असणे गरजेचे आहे तसेच लोकांना सोलर एनर्जीचे महत्व पटवून देणे गरजेचे आहे आणि कशाप्रकारे हे कॉस्ट इफेक्टिव्ह असू शकते हे सुद्धा लोकांना पटवून देणे गरजेचे आहे. या व्यवसायासाठी कमी भांडवल लागते परंतु जर आपल्याकडे ही सर्व कौशल्य असतील तर हा व्यवसाय आपण सुरू करू शकतो.
५ . सोलर पावरड गॅजेट्स | solar powered gadgets –
पूर्वी सोलर फक्त काही गोष्टींसाठी मर्यादित होते उदाहरणार्थ, पाणी गरम करण्यासाठी. परंतु आता तसे राहिलेले नसून सोलरवर चालणाऱ्या विविध वस्तू किंवा गॅजेट्स मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्या वस्तूंचा व्यवसाय आपण सुरू करू शकतो तसेच आपल्याकडे जर त्याबद्दलचे ज्ञान असेल तर सोलर वर चालणारा नवीन प्रॉडक्ट सुद्धा आपण मार्केटमध्ये लॉन्च करू शकतो.
६ . सोलर मेंटेनन्स अँड रिपेअर | solar maintenance and repair –
हल्ली सोलर पॅनल्स किंवा सोलर ऊर्जेबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाल्यामुळे याचा वापर करणे तसेच याची मागणी सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे आणि म्हणूनच वाढत्या सोलर इन्स्टॉलेशन मुळे सोलर मेंटेनन्स तसेच रिपेरिंगची आवश्यकता सुद्धा नक्कीच भासते, त्यामुळेच सोलर मेंटेनन्स अँड रिपेअर हा व्यवसाय सुद्धा एक चांगला व्यवसाय ठरू शकतो.
७ . सोलर एज्युकेशन अँड ट्रेनिंग | solar education and training –
सध्या सोलरची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे त्यामुळे या व्यवसायामध्ये बरेच लोक उतरत आहे किंवा हा व्यवसाय करू इच्छित आहे परंतु सोलर बद्दल पुरेसे ज्ञान नाही किंवा पुरेसे माहिती उपलब्ध नसल्याकारणाने बरेच लोक या व्यवसायामध्ये उतरू शकत नाही आणि म्हणूनच जर सोलर बद्दल सर्व माहिती असणारे कोर्सेस तसेच ट्रेनिंग त्यामध्ये इन्स्टॉलेशन कसे करायचे, मेन्टेनन्स किंवा रिपेरिंग असे विविध कोर्सेस आपण समावेश करू शकतो.
जॉईन करा Whatsapp वर | https://wa.openinapp.link/ufn1x |
जॉईन टेलिग्राम ग्रुप | https://t.me/iconikMarathimotivation |
मला मेसेज करा | https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/ |
आपली वेबसाईट | https://iconikmarathi.com/ |
ai टूल्स साठी | https://yt.openinapp.co/iconik2 |
युट्युब | https://yt.openinapp.co/iconikMarathi |