E Rickshaw Yojana | दिव्यांगांना अपंगांना व्यवसायासाठी मोफत गाडी मिळणार लगेच करा ऑनलाईन अर्ज | E Rickshaw Yojana Maharashtra | Best Government Schemes 2025

E Rickshaw Yojana | दिव्यांगांना अपंगांना व्यवसायासाठी मोफत गाडी मिळणार लगेच करा ऑनलाईन अर्ज | E Rickshaw Yojana Maharashtra | Best Government Schemes 2025

    आपल्या समाजामध्ये काही व्यक्ती दिव्यांग किंवा अपंग असतात परंतु तसे असून सुद्धा त्यांना काहीतरी व्यवसाय करण्याची जिद्द मनामध्ये असते आणि त्यापैकी काही व्यक्ती स्वतः नोकरी किंवा व्यवसाय करतात सुद्धा… परंतु त्यापैकी काही व्यक्तींची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे व्यवसाय करण्याकरता आवश्यक असणारी रिक्षा किंवा गाडी खरेदी करता येत नाही परंतु आता महाराष्ट्र सरकारच्या इ रिक्षा योजनेअंतर्गत दिव्यांग अपंग व्यक्तींना व्यवसायासाठी मोफत गाडी मिळू शकणार आहे आणि याबद्दलच माहिती आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणून घेणार आहोत…

E Rickshaw Yojana | दिव्यांगांना अपंगांना व्यवसायासाठी मोफत गाडी मिळणार लगेच करा ऑनलाईन अर्ज | E Rickshaw Yojana Maharashtra | Best Government Schemes 2025

E Rickshaw Yojana

E Rickshaw Yojana | इ रिक्षा योजना –

– दिव्यांग व अपंग व्यक्तींना इ रिक्षा मोफत उपलब्ध करून देण्यासाठीची योजना 10 जून 2019 या दिवशीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली. 

– इ रिक्षा योजनेचा हेतू दिव्यांग व अपंग व्यक्तींना स्वावलंबी बनवणे हा आहे. 

– तसेच दिव्यांग व्यक्तींचे सामाजिक आणि आर्थिक पुनर्वसन करणे, अपंग व दिव्यांग व्यक्तींना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मिती करण्यास चालना देणे आणि इतर व्यक्तींसारखेच अपंग व दिव्यांग व्यक्तींना सुद्धा त्यांच्या कुटुंबास सोबत चांगले जीवन जगण्यास सक्षम करणे असे उद्देश इ रिक्षा योजनेचे आहे.

– राज्यांमधील गरजू अपंग व दिव्यांग व्यक्तींना या योजनेचा फायदा घेता यावा यासाठी अर्ज करण्याकरिता 3 डिसेंबर 2023 या दिवसापासून पोर्टल प्रक्षेपित करण्यात आलेले असून ऑनलाईन अर्ज करता येऊ शकतात. 

E Rickshaw Yojana Benefits | इ रिक्षा योजनेचे एकंदरीत स्वरूप –

– या योजनेच्या लाभार्थ्यांना हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण अनुकूल असणाऱ्या फिरत्या वाहनासाठी/दुकानासाठी 3.75 लाख इतके अनुदान प्रति लाभार्थी उपलब्ध करून देणे तसेच या योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता निवड करण्यात आलेल्या संस्थेने वाहनाची व्यवस्थित देखभाल व दुरुस्ती करणे याचा समावेश असेल. 

– तसेच निवड झालेल्या लाभार्थी दिव्यांग व्यक्तींना व्यवसायानुसार व्यवसायाचे प्राथमिक प्रशिक्षण देणे, आरटीओ मार्फत नोंदणी करणे तसेच दिव्यांग लाभार्थ्याला परवाना मिळवून देणे आणि परवाना मिळत नसल्यास त्या व्यक्तीच्या वतीने इतर सामान्य व्यक्तीला वाहन चालवण्यासाठी परवाना मिळवून देणे आणि वाहन विमा उतरवणे या गोष्टींचा समावेश असेल. 

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

E Rickshaw Yojana Terms and Conditions | इ रिक्षा योजना अटी आणि शर्ती :

  • या योजनेकरिता अर्ज करण्यासाठी अर्जदार व्यक्ती महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. 
  • जी व्यक्ती अर्ज करत आहे त्या व्यक्तीच्या दिव्यांगात्वाचे प्रमाण कमीत कमी 40% इतके असावे आणि जिल्हा शल्यचिकित्सक किंवा सक्षम अधिकारी यांच्याकडून मिळालेले प्रमाणपत्र असावे.
  • अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे दिव्यांगत्वाचे यु डी आय डी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. 
  • अर्जदार व्यक्तीचे वय 18 ते 55 या दरम्यान असावे. 
  • मतिमंद अर्जदार असल्यास अशा परिस्थितीमध्ये त्यांचे कायदेशीर पालक अर्ज करण्यासाठी सक्षम असतील. 
  • अर्ज करणाऱ्या दिव्यांग व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे. 
  • लाभार्थ्याची निवड करत असताना जास्त अपंगत्व असलेल्या व्यक्तीस प्रथम प्राधान्य दिले जाईल म्हणजेच निवडीचा क्रम हा अति तीव्र दिव्यांगत्व ते कमी दिव्यांगत्व याप्रमाणे राहील. 
  • जास्त तीव्र दिव्यांगत्व असणाऱ्या व्यक्तीला वाहन चालवण्याचा परवाना नाकारलेला असेल तरीसुद्धा परवानाधारक नसलेल्या अति तीव्र दिव्यांग व्यक्तीसाठी सोबत याच्या सहाय्याने फिरता व्यवसाय करण्यासाठी प्राधान्य दिले जाईल. 
  • अर्ज करतेवेळी सर्व अटी मान्य आहेत आणि वाहनाची योग्य ती काळजी घेतली जाईल या प्रकारचे बंद पत्र सादर करणे अर्जदारासाठी आवश्यक असेल. 
  • जिल्हा निहाय किती लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल याची घोषणा दिव्यांगांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये केली जाईल. 
  • अर्ज करत असलेली व्यक्ती शासकीय किंवा निमशासकीय किंवा मंडळे किंवा महामंडळे यांचा कर्मचारी नसावा.
  • जी व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करत आहे ती व्यक्ती दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचा कर्जदार असेल तर थकबाकीदार नसावा. 

E Rickshaw Yojana required documents | इ रिक्षा योजना आवश्यक कागदपत्रे –

  • अर्जदाराचा फोटो 
  • अर्जदाराच्या सहीचा फोटो 
  • जातीचा दाखला 
  • अधिवास प्रमाणपत्र 
  • निवासी पुरावा 
  • ओळखपत्र 
  • अर्जदाराचे प्रतिज्ञापत्र 
  • दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र 
  • यू डी आय डी प्रमाणपत्र 
  • बँक पासबुक 

E Rickshaw Yojana Application | इ रिक्षा योजना अर्ज –

इ रिक्षा योजनेसाठी अर्ज करण्याकरिता : येथे क्लिक करा.

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment