भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयामार्फत (Ministry of Social Justice & Empowerment) देशभरातील विविध सामाजिक योजनांचे मॉनिटरिंग आणि अंमलबजावणी तपासण्यासाठी प्रोग्राम मॉनिटरिंग युनिट (PMU) साठी 49 State Coordinator पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे.
🌐 State Coordinator Bharti 2025संस्थेबद्दल (MSJ&E) – माहिती
सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय हे भारत सरकारचे एक महत्त्वाचे मंत्रालय आहे जे समाजातील SC, OBC, Senior Citizens, Transgender, DNT, EBC, EWS, व्यसनाधीनता बळी, भिकारी व्यक्ती अशा वंचित घटकांच्या कल्याणासाठी योजनांची अंमलबजावणी करते.
या मंत्रालयांतर्गत शेकडो योजना केंद्र/राज्य सरकारी विभागांमार्फत राबवल्या जातात. त्यांचे वेळोवेळी मॉनिटरिंग, मूल्यांकन आणि फील्ड व्हिजिट आवश्यक असते. यासाठीच PMU तयार करण्यात आले आहे.
PMU State Coordinator पदासाठी जबाबदाऱ्या
नियुक्त राज्य/विभाग/प्रदेशांमध्ये लागू योजनांचे फील्ड मॉनिटरिंग
प्रकल्पांची प्रगती तपासणे आणि मंत्रालयाला रिपोर्ट देणे
सर्व दस्तऐवज, डेटा आणि नोंदी गोपनीयतेने जतन करणे (Official Secrets Act, 1923)
महिन्यात 20 दिवस राज्य/जिल्ह्यांमध्ये प्रवास
विविध हितधारकांमध्ये समन्वय बैठकांचे आयोजन
गुणवत्ता नियंत्रण, वेळेवर अहवाल, आणि मानक प्रक्रियेचे पालन