बलून डेकोरेशन बिसनेस आयडिया | खुप कमी गुंतवणुकीत करायचा बिसनेस
1.प्रस्तावना(Introduction)
नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र !
मित्रांनो जगातला प्रत्येक व्यक्ती ज्याच्या जीवनात येणारा असा दिवस ज्या दिवशी त्याच्या आनंदाला पारावारा नसतो. तो दिवस कोणचा वाढदिवस असू शकतो, कोणाचा लग्नाचा वाढदिवस असू शकतो, कोणाच्या तरी मित्राचा/मैत्रिणीचा वाढदिवस असू शकतो, कुटुंबातील व्यक्तीच्या वाढदिवस असू शकतो. किंवा असे अनेक इवेंट. लोक खूप उत्साहात साजरी करतात. आणि या उत्साह समारंभामध्ये लोकांना अजून उत्साहित करण्याचे काम करणारी वस्तू ती म्हणजे आजुबाजूचे डेकोरेशन फुललेलं असं वातावरण हे आहे. याच्याच फायदा आपल्याला घ्यायचा आहे.
मित्रांनो डेकोरेशन खूप प्रकारे केले जात असते. त्यात फुलांच्या डेकोरेशन पासून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पण यामध्ये जर एका विशिष्ठ(special) topik साठी काम केल तर त्याची डिमांड वेगळीच असते. जसे एखादी कंपनी जीच्या सगळ्या प्रकारचे products मार्केट मध्ये उपलब्ध असतात. आणि ती जर ब्रांड असेल तर आपण तिचे वस्तू घेतो पण दुसरी कंपनी जी फक्त एकच वस्तू विकते आणि ती कंपनीचा सुद्धा ब्रांड आहे. तर अश्या वेळेस एक विशिष्ठ वस्तू विकणारी कंपनीला आपण प्राधान्य देऊन तिचे वस्तू घेत असतो. सांगायचे झाले तर सुरुवातीला सर्व काही डेकोरेशन नाही तर फक्त बलून डेकोरेशन मध्ये फोकस केल तरी खूप मोठ्या लेव्हल पर्यंत आपण पोहचू शकतो.
2.गुंतवणूक(investment) –
(i)एक बलून डेकोरेशन बिसनेसची सुरुवात करतांना लागणारे साहित्य :-
बलून मध्ये हवा भरण्यासाठी एक लहान मशिन ऑनलाईन मार्केट मध्ये मिळते त्याची किंमत 800/- रुपयांपासून ते 1500/- रुपयांपर्यंत आहे. त्या मशिनद्वारे तुम्ही एका वेळेस 2 बलून मध्ये हवा भरू शकतात. त्यानंतर 500 ते 1000 बलून लागतील आपल्याला आलेल्या order आणि डिझाईन नुसार त्याची किंमत फक्त 700रुपये/- पर्यंत असेल. व सोबत लागणारे लहान-लहान साहित्य जसे कि, दोरी, सेलो टेप, व वेळेवर लागणारे साहित्य. यांचा खर्च येईल 300रुपये/- पर्यंत. फक्त एवढ्याच साहित्यामध्ये तुम्ही तुमचा बिसनेस सुरु करू शकतात. एकूण खर्च बघितला तर कमीत कमी 2 हजार रुपये मात्र तुम्हाला लागतील.
(ii)साहित्य कोठून विकत घ्यावे :-
इंडियामार्ट ही एक मोठी वेबसाईट आहे. जिथे सर्व साहित्य wholsale मिळत. तेथून तुम्ही तुम्हाला लागणारे बलून वेगवेगळ्या डिझाईन मध्ये order करू शकतात, तेही wholsale किंमती मध्ये. किंवा सध्याच्या स्थितीत जवळ जवळ सर्व शहरांमध्ये मोठ-मोठे बेकरी शॉप आहेत. तेथे सुद्धा तुम्हाला बलून मिळू शकतील. तुम्ही त्यांना सांगून permanent डील करू शकतात. ते पण तुम्हाला wholsale मध्ये देऊ शकतील. जे मशिन बलून मध्ये हवा भरण्यासाठी लागते ते amazon, flipkart, meesho येथील वेबसाईट वर तुम्हाला आरामात available होऊन जाईल. व उर्वरित लहान-लहान साहित्य कुठेही सहज उपलब्ध होते.
3.एकूण किती नफा होऊ शकतो (Profit)–
यामध्ये orders आणि डिझाईन नुसार तुम्ही चार्जेस घेऊ शकतात. त्यात मशिन तुमच permanent असेल फक्त बलून आणि लहान-लहान साहित्य यांचा खर्चाचा जर विचार केला तर 1000/- रुपये पर्यंत तुमचा खर्च होतो. तरी सुरुवातीला तुमचा बिसनेस नवीन असल्यामुळे 2000/- रुपयांपासून तुम्ही एकूण सर्विस चार्ज घेऊ शकतात. तुम्हाला 1000/- रुपये एका एवेंट मागे profit होईल. आणि महिन्याला फक्त 10 जरी तुम्हाला सुरुवातीला order मिळाल्यात. तरी 10,000 रुपये महिना तुम्ही कमवू शकतात. आणि सुरुवातीला याच्याहून जरी कमी घेतले तरी काही हरकत नाही. मार्केट मध्ये तुम्ही अभ्यास करा. आजूबाजूचे लोक बलून डेकोरेशनचे किती चार्ज घेत आहेत. त्यानुसार तुम्ही त्यांच्याहून कमी जर घेतले आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे हाच जर उद्देश ठेवला तर सुरुवातीला तुम्हाला जरी कमी profit झाला पण पुढे जाऊन तुमचाच बिसनेस टॉपला राहू शकतो.
4.बिसनेसची मार्केटिंग कशी करायची (Marketing Techniques)–
मार्केटिंग वेगवेगळ्या प्रकारे करता येते. त्यात तुम्ही तुमचे visiting card बनवू शकतात. तुम्हाला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्ती पर्यंत तुम्ही देऊ शकतात. सोबतच जिथे केक बेकरी असेल तेथील मालकशी संपर्क करून तुम्ही टाय-अप करू शकतात. व त्यांच्या दुकानावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती ज्याने पुढील काही एवेंट साठी केक order केला असेल त्यांना तुमचे pamplet किंवा visiting card देण्यास सांगू शकतात. same अशीच टेक्निक जिथे विवाह समारंभ होतात. एक अशी जागा जिथे प्रे-वेडिंग व्हिडिओ शूट होतात. त्यांच्या सोबत वापरू शकतात.
तुमच्या परिसरातील लोकल tv network, news पेपर, news channel, यांना sponsered advertisement साठी रिक्वेस्ट करू शकतात. आणि सध्याच्या परिस्थितीत सर्वात जास्त वापरण्यात येणारा मार्केटिंग फॉर्मुला तो म्हणजे डिजिटल मार्केटिंग. डिजिटल मार्केटिंगच्या माध्यामतून तुम्ही ads चालवून अश्या लोकांपर्यंत पोहचू शकतात ज्यांच्या वाढदिवस जवळ आहे. तुम्ही तुमची वेबसाईट बनवून ज्या ज्या ठिकाणी डेकोरेशन तुम्ही केले आहेत तेथील फोटो तुमच्या वेबसाईट वर टाकू शकतात. जेणेकरून पुढील येणारा customer ला तुमच्या सर्विस बद्दल माहिती मिळेल. आणि google my business वर तुमचा business लिस्ट जर केला तर तुमच्या जवळ असणाऱ्या लोकांनी जरी गुगल वर सर्च केल तरी त्यांना तुमची सर्विस बद्दल माहिती मिळेल. त्याच्यासोबत प्रत्येक सोशल मिडिया वर तुमचे business अकाऊंट उघडून प्रत्येक एवेंटला केलेल्या डेकोरेशनचे फोटो पोस्ट करू शकतात. याच्यामुळे बाहेरचे सुद्धा order तुम्हाला येऊ शकतात.
काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम