मित्रांनो भारतात नुकतच PM मोदी यांच्या हस्ते 5G सेवेची लॉंचींग झाली आणि सध्या भारतातल्या 13 metro cities मध्ये 5g नेटवर्क सुरु झाले आहे आणि 2023-24 च्या अखेर पर्यंत jio आणि airtel यांचे networks संपूर्ण भारतात येणार आहे. ज्यावेळी 4G भारतात आल होत त्यावेळेस खूप साऱ्या नवनवीन opportunities होत्या ज्या आतासुद्धा आहेत पण त्यावेळी सप्लाय कमी आणि डिमांड जास्त अशी परिस्थिती होती तेव्हा ज्या लोकांनी संधी ओळखली आणि टेक्नोलॉजी सोबत काम केल ते आज होण शक्य नाही. उदाहरणार्थ युट्युब हे भारतात 4G येण्याच्या 11 वर्षा आधीच आहे. पण जेव्हा लोकांनी android mobile घेतले. 4G चा वापर सुरु केला तर युट्युब जेव्हा लोक explore करायचे तेव्हा त्यांना मोजक्याच लोकांचे videos दिसायचे आणि लोक ते बघायचे तेव्हा ज्या लोकांनी युट्युबला सिरीयस घेऊन ज्यांनी content तयार केल ते आज भारतातच नाही तर जगाच्या top level आहे. तसच आता जस्ट 5G ची एन्ट्री आत्ताच झालीये अश्या वेळेस खूप मोठे बदल आपल्या जीवनात होणार आहेत. खूप क्षेत्रांमध्ये डिमांड जास्त आणि सप्लाय कमी अशी स्थिती आहे. इंडस्ट्रीला ज्यांची डिमांड आहे त्याच स्किल्सवर आपण काम केल तर एक चांगला high paying job मिळवून नक्कीच आपण चांगल करीयर करू शकतोय. तर top 5 क्षेत्र ज्यामध्ये तुम्हाला आता व येणाऱ्या काळात नोकरीच्या संधी मिळतील.
1) Software Engineers –
तुम्ही कधीना कधी ऐकलच असेल IT फिल्ड संदर्भात कारण हे क्षेत्रच अस आहे. जिथे mechanical branch चा विद्यार्थी असो, electrical branch चा विद्यार्थी असो किंवा कोणत्याही इतर engineering ब्रांचचा software field मध्ये मिळत असणारे perks, high package salary, वर्क फ्रॉम होम जॉब आणि खूप सुविधा मिळत असल्यामुळे ते विद्यार्थी त्यांची जरी शिक्षण वेगळ्या subject च घेतल असेल पण placements च्या वेळी software क्षेत्रात switch होत असतात.
जर इंडस्ट्रीचा विचार केला तर रोज नवनवीन startup भारतात येत आहे काही बिलियन डॉलर startup कंपनी होऊन रेकॉर्ड करत आहे. अश्या सर्वांना त्यांच्या कंपनी किंवा वेगवेगळ्या बिसनेसेस साठी website, app development साठी software engineers ते hired करतात. त्यात front-end, backend, full stack, App developer, software tester, security engineer, devOps engineer इत्यादी अश्या अनेक पोस्टसाठी स्किल्स असलेल्या लोकांची गरज असते आणि आता काही कंपन्या कोणतीही डिग्री न पाहता तुमच्याकडे जर या स्किल्स असतील. तर तुम्हाला ते high paying jobs द्यायला तयार आहेत.
2) Data Scientist/Analytics –
कुठेतरी तुम्ही ऐकलच असेल “Data is new Oil” तुम्ही युट्युबवर एखादा व्हिडीओ बघितला तर युट्युब तुम्हाला त्यारिलेटेडच व्हिडीओ पुढे दाखवतो. जर फेसबुकवर तुम्ही एखाद्या पोस्टला लाईक केल त्यारिलेटेडच पोस्ट तुम्हाला पाहायला मिळतात आणि जर तुम्ही मोबाईलमध्ये काही टाईप करतात तेव्हा automatic तुम्हाला suggestions येतात किंवा जरी तुम्ही चुकीची spelling टाईप केली तरी auto correct होऊन जाते. अश्या अनेक गोष्टी या सर्व Data science चा प्रकार आहे. 2025 पर्यंत Data Science ची industry 16 billion dollar ची होणार आहे. एका रिपोर्टनुसार 2026 पर्यंत 11.5 मिलियन म्हणजेच 1 कोटी 15 लाख नवीन जॉब्स पूर्ण जगामध्ये data science या क्षेत्रात निर्माण होणार आहेत.
इंडस्ट्रीचा जर विचार केला तर आधी इंटरनेटचा जास्त वापर नसल्यामुळे कंपनी excel sheet मध्ये data store करून त्यावर काम करायची. पण आता तर पूर्ण जगात data एवढा वाढला आहे कि, एका व्यक्तीने पूर्ण आयुष्यभर जरी युट्युबचे सर्व व्हिडीओ बघण्यास सुरुवात केली तरी ते संपणार नाही, एवढा मोठा data आजच्या स्थितीत आहे. आणि एवढ्या मोठ्या dataला analys करून त्यावर काम करण्यासाठी लोक सुद्धा कमी पडतील एवढा data आहे. कारण तुम्ही एक व्हिडीओ सुद्धा बघितला तरी history तो data saved होतो आणि रोज नवीन data तयारच होत चालला आहे.
Data Scientist च main काम म्हणजे data collect करण, analys करण, insights काढन आणि insights वरून त्या त्या बिसनेस किंवा industry फायदा करून देन होय. उदा. Google कडे असणाऱ्या data चा फायदा google ने कसा करून घेतला ते सांगतो. Google कडे data आहे. कोणाची age किती, कोणाच location कुठल, लोक काय जास्त सर्च करतात. त्याच google ने google ads हे product launch करून फायदा घेतला म्हणजे एखाद्या बिसनेसला त्याच्या शहरातील 20 ते 50 या वायोगटातील लोकांना ads दाखवायचे असेल तर तो तिथपर्यंत पोहचू शकतो.
तुम्ही Artificial Intelligence, Machine Learning, Deep Learning, Big Data ऐकल असेलच हे सुद्धा DATA चा एक प्रकार आहे. Even PM मोदी यांनी सुद्धा यासंदर्भात त्यांच्या एकासभेत IIT च्या मुलांना याबद्दल माहिती दिली होती.
3) IOT & Automation –
Tesla ची ड्रायव्हर लेस कारब्द्द्ल तुम्ही ऐकलच असेल किंवा ऑनलाईन पहिली सुद्धा असेल. Smart city ऐकल असेल पण smart homes सुद्धा तयार होत आहेत. तुम्ही ऑफिसमध्ये आहात आणि तुमच्या घरी कोणीच नाहीये चुकून दरवाजा lock करायचा राहिला तुमच्या मोबाईलने तुम्ही दरवाजा lock/unlock करू शकतात, amazon echo आणि google home assistant ने तुम्ही सर्व घर controll करू शकतात. A.C., lights सारखे अनेक डिव्हाईस तुमच्या आवाजाने ON/OFF करू शकतात. तुमच्या हातात असणाऱ्या smartwatch ने तुम्ही तुमच health चेक करतात अश्या अनेक गोष्टी IOT म्हणजेच Internet of Things मुळेच possible झाल्या आहेत. आणि आज जे सांगितल जात कि, सर्व काही automate होईल आणि automation मुळे खूप जॉब्स जातील तर हे खर जरी असल तरी खूप जॉब्स जरी जात असल्या तरी खूप संधी या क्षेत्रात आहे. जगभरात IOT expertsची आवश्यकता आहे. पाहिजे तेवढे स्किल्स असणारे लोक नाहीत म्हणून संधी ओळखून तुमचा इंटरेस्ट electronics आणि technology या क्षेत्रात असेल तर नक्कीच तुम्ही हे क्षेत्र निवडू शकतात.
TOP 10 sectors तुमच्यासाठी काढून ठेवले होते त्यापैकी फक्त 3 sectorsची माहिती तुम्हाला दिली आहे. त्यामध्ये cyber security, robotics, blockchain, metaverse, medical असे वेगवेगळे क्षेत्र आहेत डिटेल video पाहिजे असेल तर कमेंट करा. आणि आजच्या व्हिडीओ मध्ये सांगितलेल्या क्षेत्रांबद्दल डिटेल माहिती पाहिजे असेल तरी कमेंट करा नक्की पुढचा पार्ट तुमच्यासाठी बनवेल.
सदर ब्लॉग विषयी detail व्हिडीओ पाहण्यासाठी खालील व्हिडीओ पाहू शकतात.