मित्रांनो creator economy हि दिवसेंदिवस ग्रो करत चालली आहे. भारतात पण मिलियन्स मध्ये creator आहे कारण आजच्या परिस्थितीत सर्वांना creator व्हायचं आहे. एका रिपोर्ट नुसार जगात सर्वात जास्त युट्युब आणि Instagram या app चे user भारतात आहे यावरून तुम्हाला अंदाजा लावता येईल. येणाऱ्या काळात creators ची संख्या वाढणार आहे आणि वाढतही चालली आहे. पण याविषयी खोलवर विचार केला तर भारतात फक्त १.५ लाखच असे creator आहे जे चांगली इन्कम करताय. पण आता सर्वांनीच creator बनायचा विचार केला तर व्हिडिओ बघणारे पण पाहिजे, creator ला हेल्प करणार पण कोणीतरी पाहिजे. तर याबद्दलच तुम्हाला या ब्लॉगमध्ये माहिती देणार आहे.
व्हिडीओ एडीट करून कमवा ५ हजार रुपये रोज | Earn money with Video editing in Marathi
Creators ची मदत करून पैसे कमवा | Help creators and earn money
भारतात १.५ लाख असे creators असे आहेत, जे चांगली इन्कम कमवताय. तर हीच आपल्यासाठी मोठी opportunity आहे. जे पण हे creators असतात त्यांना दिवसभरातून खूप schedule असत. व्हिडीओ आयडिया शोधणे, स्क्रिप्ट तयार करणे, व्हिडिओ शूट करणे, व्हिडिओ एडीट करणे, व्हिडिओ अपलोड करणे, सोशल मिडिया manage करणे, लोकांच्या comments ला replay देणे, brands सोबत मिटिंग, त्यांच्या सोबत contact करणे, वेगेवेगळ्या इव्हेंट्सला जाणे त्यासोबत पर्सनल काम वेगळी यामुळे ज्या creators ची इन्कम जशी हळू हळू वाढत जाते तशी त्या creator ला त्याची quality पण वाढवावी लागते, competition मध्ये टिकून राहण्यासाठी काम कराव लागत, त्यामुळे असे creators टीम बनवत असतात ज्यामध्ये लोकांना काम वाटून देतात आणि काही काम creator स्वतः करतात किंवा एखादी एजन्सी असते जिच्याकडे आधीपासून व्हिडिओ एडिटर्स, स्क्रिप्ट रायटर्स अश्या लोकांची टीम असते तर अश्या एजन्सी कडून ते creator काम करून घेतात किंवा काही फ्रीलान्सर्स असतात जे फुल टाईम freelancing करतात तर त्यांना सुद्धा creators काम देतात. तर आपण फ्रीलान्स व्हिडीओ एडिटिंग करून पैसे कसे कमवायचे ती माहिती घेणार आहोत.
जे creators आहेत त्यांच्यासाठी तुम्ही व्हिडिओ एडिटिंग करून देऊ शकतात कारण सध्या सोशल मिडियावरील ९९% content हे व्हिडीओ मध्येच आहे. आणि त्यापैकी १.५ लाख creators हे युट्युब किंवा Instagram येथून इन्कम सुद्धा करताय. तर त्यांना तुम्ही व्हिडीओ एडीट करून देऊ शकतात. यात २ प्रकारे तुम्ही काम करू शकतात पहिलं म्हणजे फ्रीलांसिंग करून दुसर म्हणजे एका creator साठी फुल टाईम एडिटिंग करून.
व्हिडीओ एडिटिंग कुठून शिकायची?
व्हिडीओ एडिटिंगचे भरपूर सारे कोर्स आहेत udemy सारख्या कोर्सेस platform वर पण सुरुवातीला तुम्ही कोणताच कोर्स न घेता फ्री मध्ये युट्युब वरून शिकू शकणार आहात ज्या पण व्हिडीओ एडिटिंग software बद्दल तुम्हाला शिकायचं असेल तर फक्त युट्युबवर त्या app च्या नावासोबत tutorial सर्च करा. उदा, kinemaster video editing tutorial in hindi किंवा मराठी. व्हिडिओ एडिटिंग शिकत असतांना प्रत्येक व्हिडीओ एडिटिंगची concept एकच असते software जरी बदले पण एडीट करण्याचा मार्ग तोच असतो त्यामुळे व्हिडीओ एडिटिंगचे बेसिक्स शिका त्यानंतर तुम्ही प्रोफेशनल एडिटिंग खूप सोप्या पद्धतीने करू शकतात.
व्हिडीओ एडिटिंग कोणत्या software मध्ये करायची?
जस आधी typing ला कंपन्यांमध्ये data entry वर्क साठी डिमांड राहायची तस आता सोशल मिडिया इंडस्ट्री मध्ये व्हिडीओ एडिटिंगची डिमांड आहे. व्हिडीओ एडिटिंग तुम्ही मोबाईल किंवा कम्प्युटर वर करू शकतात. पण आताचे काही मोबाईल apps इतके प्रोफेशनल एडिटिंग फिचर देतात तर तुमच्याकडे जरी कम्प्युटर नसेल तरी तुम्ही मोबाईल ने प्रोफेशनल एडिटिंग करू शकतात. त्यानंतर जशी जशी तुमची स्कील वाढत जाईल तुम्ही कम्प्युटर मधील एडिटिंग software शिकून स्कील वाढवू शकणार आहात. पण मोबाईल मध्ये तुम्हाला ४ तास लागत असतील तोच व्हिडिओ तुम्ही कॉम्प्युटर मध्ये एका तासात सुद्धा एडीट करू शकतात हा एक बेनिफिट असतो त्यामुळे कम्प्युटर मध्ये जर एडीट करून आपला वेळ वाचत असेल तर वाचेलेल्या वेळेत आपण दुसऱ्या client चे व्हिडिओ एडीट करू शकतो.
Mobile video editing apps
- Kinemaster
- VN
- Inshot
- Filmora
Computer video editing software
- Premiere Pro
- Final Cut Pro
- Davinci Resolve
- Filmora
व्हिडीओ एडिटिंग पोर्टफोलिओ कसा बनवायचा
एडिटिंग शिकल्यानंतर युट्युबवर आधीपासून podcast व्हिडिओ असतात. जस. Ranveer Allahbadia, Raj Shamani यांसाखे युट्युब creators च्या channel वर तुम्हाला podcast व्हिडीओ पाहायला मिळतील त्यातले काही motivational वाटणारे असे काही व्हिडीओ मधील भाग शोर्ट मध्ये cut करून तुम्ही ते एडीट करून तुमच्या instagram account बनवा आणि तिथे ते पोस्ट करा. त्यामुळे तुम्ही जरी कोणत्याही client साठी एडिटिंग काम केल नसेल पण तुमच instagram account तुमच्यासाठी portfolio बनू शकतो. त्यामुळे reels च्या रेशोमध्ये व्हिडिओ बनवून पोस्ट करा किंवा तुमच्याकडे काही माहिती असेल तुम्हाला पण चांगल बोलता येत असेल तर तुमचे व्हिडीओ बनवा ते अपलोड करा. असे ५-६ व्हिडिओ फक्त तुमच्या पोर्टफोलिओ साठी आवश्यक आहे. हे फक्त पहिला client मिळण्यासाठी त्यानंतर इतर client ला तुम्ही ज्या client साठी आता काम करत असणार त्याचे video दाखवू शकतात.
Client कसे शोधायचे?
instagram, youtube वर creators ला फॉलो करा त्यानंतर खूप creators त्यात तुम्हाला असे मिळतील ज्यांची व्हिडिओ एडिटिंग खूप simple आहे पण त्यांचे subscribers, followers लाखोंमध्ये आहे तर असे creator चांगले pay सुद्धा करू शकतात. तर अश्या creators ला तुम्ही त्यांच्या instagramवर, Linkedin वर DM, करा त्यासोबत त्यांनी about section मध्ये किंवा bio मध्ये mail दिलेला असतो त्यावर जाऊन त्यांना तुम्ही एडीट केलेले व्हिडीओ दाखवा त्यासोबत लिहा मी एक व्हिडिओ एडिटर आहे मी तुम्हाला दिवसापासून फॉलो करतो मी तुमचे व्हिडीओ पाहिले त्यात मी अजून चांगली editing करून देऊन तुमचे video engaging बनवू शकतो, त्यात तुमच नाव लिहा, मोबाईल नंबर लिहा. हि प्रोसेस जास्तीत जास्त creators सोबत फॉलो करा. त्यापैकी तुम्हाला ५ creators ने जरी काम दिल तरी दिवसाला ५ रुपयांपासून ५ हजार रुपयांपर्यंत सुरुवातीला तुम्ही कमवू शकतात. पण सुरुवातीला तुमच्या पोर्टफोलिओ नसेल, अनुभव नसेल तर तुम्ही बाहेर व्हिडीओ एडिटिंग जो rate सुरु असेल त्यापेक्षा अर्ध्या किंमतीत त्यांना तुमची सर्व्हिस द्या. ज्यामुळे तुम्हाला लवकर काम भेटेल पण कमी जरी चार्ज करत असणार तरी व्हिडीओ एडिटिंग quality हि सर्वांपेक्षा बेस्ट द्यावी लागेल.
त्यासोबत काही creators त्यांच्या instagram stories वर actively टाकत असतात hiring for व्हिडिओ एडिटर स्टोरी मध्ये ते mail सुद्धा देतात तर तुम्ही social media वर active राहून सुद्धा client पर्यंत पोहचू शकतात.
व्हिडीओ एडिटिंगसाठी किती चार्जेस घ्यायचे?
सुरुवातीला तुम्ही एक रील किंवा शोर्ट व्हिडीओ एडीट करण्यासाठी १०० ते २०० रुपये चार्जेस घेऊ शकतात. व्हिडीओच्या time नुसार आणि long व्हिडीओ एडीट करण्यासाठी २०० ते ३०० दरम्यान घेऊ शकतात एका व्हिडीओ साठी.
जेव्हा तुमची एडिटिंग प्रोफेशनल होऊन जाईल, तुमच्या कडे चांगला पोर्टफोलिओ आणि २-३ client असतील त्यानंतर तुम्ही एका रील व्हिडीओसाठी ८०० ते १००० रुपये आणि long व्हिडिओ साठी १५०० ते २००० रुपये चार्जेस घेऊ शकतात. पण हे चार्जेस तुमच्या व्हिडीओ एडिटिंग स्कील वर डिपेंड आहे. त्यामुळे तुम्ही फक्त ज्यांचे followers हे जास्त असतील लाखोंमध्ये आणि त्यांची इन्कम चांगली असेल अश्याच लोकांना टार्गेट करा ज्यामुळे ते तुम्हाला एवढे चार्जेस देऊ शकतील पण सुरुवातीला तुम्ही कमी followers वाल्या creators साठी काम करू शकतात.
प्रोफेशनल व्हिडीओ एडीट कसे करायचे?
यासाठी तुम्हाला sound effects, text effects, transition, stock footages, texture backgrounds, background music, color grading या गोष्टींवर experiment करून शिकू शकतात. त्याबरोबरच सोशल मिडिया मोठ मोठे creators ट्रेंड नुसार काही एडिटिंग techniques वापरतात ते तुम्ही वापरू शकतात.