प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना | Irrigation Scheme

    राज्य सरकार तर्फे तसेच केंद्र सरकारतर्फे वेगवेगळ्या सरकारी योजना राबवल्या जात असतात. शेती हा व्यवसाय सोप्या पद्धतीने व व्यवस्थित रित्या करता यावा यासाठी सुद्धा सरकारतर्फे वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असतात जेणेकरून शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ घेता यावा. आजच्या लेखामध्ये अशीच एक योजना ” प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना ” 

या योजनेबद्दल आपण माहिती बघणार आहोत ..

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना | Irrigation Scheme –

– कमी पाण्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना उत्तम शेती करता यावी, यासाठीच महाराष्ट्र सरकार तर्फे तुषार सिंचन व ठिबक सिंचन योजना राबवली

– या योजनेमुळे ज्या ठिकाणी पाण्याचा पुरवठा कमी प्रमाणात उपलब्ध आहे म्हणजेच ज्या भागात प्रवाहाने पाणी भरता येत नाही, त्या ठिकाणी या योजनेचा लाभ जर शेतकऱ्यांना मिळाला तर खूपच मदत होईल.

– तसेच या भागात पाण्याचा जास्त पुरवठा आहे त्या भागातील शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळाला तर शेतीला पाणी भरणे सोपे होईल त्याचबरोबर पाणीसुद्धा वाचेल.

तुषार सिंचन –

– मिनी स्प्रिंकलर

– पोर्टेबल स्प्रिंकलर 

– रेनगन

– मायक्रो स्प्रिंकलर 

     पीव्हीसी किंवा ॲल्युमिनियम पाईपला स्प्रिंकलर नोझल द्वारे पाण्याच्या दाबाचा वापर करून पाणी पिकावर सर्वच ठिकाणी पावसासारखे फवारले जाते, या पद्धतीलाच तुषार सिंचन पद्धत असे म्हणतात. तुषार सिंचन पद्धतीचे बरेच फायदे आहेत.

ठिबक सिंचन –

– मायक्रोजेट

– फॅनजेटस

– इन लाईन

– ऑन लाईन

– सबसरफेस

    आकाराने लहान म्हणजेच कमी जाडीच्या नळीद्वारे झाडांना झाडाच्या मुळाशी थेंब थेंब पाणी देणे या पद्धतीलाच ठिबक सिंचन पद्धत असे म्हटले जाते. ठिबक सिंचन पद्धतीचे सुद्धा बरेचसे फायदे आहेत.

अनुदान –

तुषार सिंचन व ठिबक सिंचन साठी 80 टक्के अनुदान मिळणार आहे. यापूर्वी हे अनुदान 45 ते 55 टक्के दरम्यान होते.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी अटी व पात्रता | Eligibility for Irrigation Scheme –

– अर्जदार शेतकरी असणे आवश्यक आहे.

– जर शेतकऱ्यांनी 2016 – 17 पूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला असेल तर त्याच सर्वे नंबर साठी शेतकऱ्यांना पुढील सात वर्षांसाठी या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

–  पाच हेक्टर पर्यंत क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येतो.

– प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी फॉर्म भरल्यानंतर पूर्वसंमती आल्याशिवाय सिंचन खरेदी करू नये.

– या योजनेसाठी पात्र ठरल्यानंतर पूर्वसंमती आल्यावर सिंचन विक्रेत्यांकडून सिंचन खरेदी करावे आणि त्या संबंधित कागदपत्रे किंवा पावत्या 30 दिवसांच्या आत अपलोड कराव्या.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे | Documents required for Irrigation Scheme –

– आधार कार्ड

– बँक अकाउंट डिटेल्स

– सातबारा उतारा

– ८अ

– पासपोर्ट साईज फोटो

– मोबाईल क्रमांक

अर्ज करण्यासाठी व अधिक माहितीसाठी महाडीबीटी वेबसाईटला भेट द्या.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Leave a Comment