आपल्या देशांमधील बऱ्याच लोकांचे चांगले शिक्षण झालेले असते, परंतु तरीसुद्धा चांगली नोकरी उपलब्ध नसते किंवा काहींचे कमी शिक्षण असते परंतु त्यांना सुद्धा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असते. बरेच लोक असे असतात की व्यवसाय सुरू करायची इच्छा तर आहे परंतु आर्थिक भांडवल आणणार कुठून ? हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये असतो. परंतु केंद्र सरकारतर्फे किंवा राज्य सरकार तर्फे वेगवेगळ्या योजना जनतेच्या हितासाठी वेगवेगळ्या हेतूने राबवल्या जातात त्यापैकीच एक योजना म्हणजे स्टँड अप इंडिया स्कीम ( Stand up India scheme )
याबद्दल आजच्या लेखामध्ये आपण अधिक माहिती बघणार आहोत…
– ज्या नागरिकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत सरकार आर्थिक मदत करते आणि त्यामुळे स्वतःचा व्यवसाय सुरू करता येणे शक्य होते.
– आर्थिक मदत ही कर्ज स्वरूपामध्ये दिली जाते म्हणजेच ज्या नागरिकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
– स्टँड अप इंडिया स्कीम अंतर्गत आपल्या देशांमधील महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांना प्रगत करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
– स्टँड अप इंडिया स्कीम अंतर्गत 10 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत कर्ज व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळू शकते.
Benefits of Stand up India scheme | स्टँड अप इंडिया स्कीमचे फायदे –
– या योजनेअंतर्गत जे व्यक्ती व्यवसाय सुरू करतील त्या उद्योग व्यवसायांना तीन वर्षांपर्यंत इन्कम टॅक्स सूट देण्यात येणार आहे.
– या योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांना कर्ज मिळू शकते त्यांना कर्ज परतफेड करण्याकरता सात वर्षाचा कालावधी ठेवण्यात आलेला आहे.
– या योजनेअंतर्गत, महिला अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांना कर्ज स्वरूपामध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळणार आहे.
– स्टँड अप इंडिया स्कीम अंतर्गत 10 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत कर्ज व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळू शकते.
– लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत रूपे कार्ड आणि प्रशिक्षण हा सुद्धा लाभ मिळणार आहे.
– या योजनेअंतर्गत जे व्यक्ती व्यवसाय सुरू करतील ते स्वतः तर सक्षम बनतीलच परंतु त्यासोबतच इतरांना सुद्धा रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
स्टँड अप इंडिया योजना पात्रता | Stand Up India Scheme Eligibility –
– महिला, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती मधील नागरिक.
– या योजनेअंतर्गत लाभार्थ्याची वयोमर्यादा 18 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असावी.
– स्टँड अप इंडिया स्कीम ग्रीनफिल्ड प्रकल्पांसाठी वैध/valid आहे, म्हणजेच असा व्यवसाय जो उद्योजकाने प्रथमच सुरू केला आहे.
– लाभार्थ्यांनी या योजनेअंतर्गत सर्वप्रथम व्यापार क्षेत्र उत्पादन क्षेत्र किंवा सेवा क्षेत्रात सुरुवात केली पाहिजे.
– अर्जदार व्यक्ती किंवा लाभार्थी कोणत्याही बँकेचा किंवा वित्तीय संस्थेचा डिफॉल्टर नसावा.
– गैर-वैयक्तिक उपक्रमांच्या बाबतीमध्ये किमान 51% शेअरहोल्डिंग आणि कंट्रोलिंग स्टेक अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या उद्योजकांकडे किंवा महिला उद्योजकांकडे असावा.
Stand Up India Scheme Documents | स्टँड अप इंडिया योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे –
– पासपोर्ट साइज फोटो
– आधारकार्ड
– पॅनकार्ड
– बँक पासबुक
– व्यवसाय पत्ता प्रमाणपत्र
– भागीदारी कराराची प्रत
– जर व्यावसायिकाने जागा भाड्याने घेतली असेल तर भाड्याचं अहवाल
– मतदान कार्ड
– जातीचा दाखला (महिलांसाठी आवश्यक नाही.)
– आयकर रिटर्न प्रत
– प्रकल्प अहवाल
स्टँड अप इंडिया योजनेचा अर्ज करण्याची पद्धत | Stand Up India Scheme Online Application –
– सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
– वेबसाईटच्या होम पेज वर You May Access Loan या मध्ये दिलेल्या ऑप्शन मधून Apply Here वर क्लिक करा.
– यानंतर विचारलेल्या फॉर्ममध्ये सर्व माहिती व्यवस्थित भरून एप्लीकेशन पूर्ण करून आवश्यक ती डॉक्युमेंट्स जोडून सबमिट करायची आहेत.
⭕ आलं आणि लसूण वापरून बनवा हा पदार्थ आणि सुरू करा व्यवसाय…
⭕ जाणून घ्या अधिक माहिती..
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
⭕ व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर मिळवा व्यवसायासाठी कर्ज..