महाराष्ट्रात वर्क फ्रॉम होम आणि फिल्ड इंटर्नशिप | Nesternship –
हल्ली शिक्षणासोबतच आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये विविध इंटर्नशिप केल्याचा फायदा नक्कीच करिअर घडवण्यामध्ये होतो. आज अशाच एका इंटर्नशिप बद्दल डिटेल माहिती आपण जाणून घेणार आहोत, ही इंटरशिप आहे नेसले इंटर्नशिप – Nesternship
Nestle बद्दल थोडक्यात माहिती –
– नेस्ले ही स्विस मल्टिनॅशनल अन्न आणि पेय प्रक्रिया कंपनी आहे ज्याचे मुख्यालय वेवे, स्वित्झर्लंड येथे आहे.
– आपण आतापर्यंत नेसलेचे विविध प्रॉडक्ट्स बघितले असतील, त्यांची चव चाखली असेल त्यामध्ये मेडिकल फूड, वॉटर बॉटल, टीआर कॉफी, डेरी प्रॉडक्ट्स, आईस्क्रीम्स, पेट फूड आणि इतरही अनेक….
– नेस्लेचे 447 कारखाने असून, ते 189 देशांमध्ये कार्यरत आहेत आणि सुमारे 339,000 लोकांना रोजगार देतात.
Table of Contents
Nestlé Internship Program – Nesternship
Nesternship बद्दल माहिती –
– Nesternship हा Nestlé’s Internship Program आठ आठवड्यांसाठी एक चांगला लर्निंग अनुभव देतो, ज्या ठिकाणी आपल्याला अनुभवी लीडर्स आणि त्यांच्या डायरेक्शन आणि सुपरव्हिजन सोबत रियल वर्ड बिजनेस प्रोजेक्टचा अनुभव घेता येतो.
– हा एक आयकॉनिक ब्रँड त्यामुळे ही एक चांगली संधी आहे.
– Nesternship ही इंटर्नशिप पेक्षा सुद्धा खूप काही आहे कारण आपल्या स्किल्स मध्ये वाढ होईल तसेच एका मोठ्या कंपनी सोबत अनुभव सुद्धा आपल्याला घेता येईल.
Features | Nesternship चे वैशिष्ट्ये –
Nesternship चा कालावधी – ८ आठवडे
काय शिकायला मिळणार – अनुभवी इंडस्ट्री मेंटॉरच्या मार्गदर्शनाखाली प्रभावी रिअल वर्ल्ड प्रोजेक्ट्सचे एक्सपोजर
काय कमावणार – नेस्ले कडून अनुभवाचे प्रमाणपत्र, 10,000 रुपये किमतीचे Amazon व्हाउचर आणि गोल्डन तिकीट मिळवण्याची संधी!
गोल्डन तिकीट नक्की काय आहे ?
– गोल्डन तिकीट म्हणजे नेस्लेसोबत करिअर घडवण्याची चांगली संधी आहे.
– गोल्डन तिकीट मुळे नेस्ले येथे फुल टाईम नोकरीच्या संधीसाठी प्लेसमेंट इंटरव्यू होण्यासाठी मदत मिळते.
– आपल्या परफॉर्मन्सच्या आधारावर तसेच आपले पॅशन आणि ओव्हर ऑल प्रोजेक्ट आऊट कम यावर आधारित आपल्या मेंटोर कडून आपल्याला गोल्डन तिकीट मिळावे यासाठी शिफारस सुद्धा मिळू शकते
– जर तुम्हाला सुद्धा जगामधील आघाडीच्या FMCG कंपनीमध्ये करिअर बनवायचे असेल तर गोल्डन तिकीट मिळवण्यासाठी नक्की या इंटरशिप साठी अप्लाय करणे आवश्यक आहे.
Available Streams & Eligibility | पात्रता –
*फील्ड सेल्स ( Field Sales ) –
– सेल्स आणि मार्केटिंग कशी करायची याबद्दलचे नॉलेज मिळवण्यामध्ये मदत होईल.
– विक्रीच्या मूलभूत गोष्टींवर प्रभुत्व मिळवण्यामध्ये मदत होईल.
– न्यूट्रिशन व्यवसायाच्या व्यावसायिक कार्यामध्ये आपले करिअर सुरू करा.
शैक्षणिक पात्रता: बी. फार्मा, एम. फार्मा, लाइफ सायन्सेस, पशुवैद्यकीय आणि समान विषयातील पदवी.
*सप्लाय चेन ( Supply chain ) –
– तुमच्याकडे ऑपरेशनल चॅलेंजेस सॉल्व करण्याचे पॅशन आहे का ? आणि जर सप्लाय चेन या क्षेत्रामध्ये करिअर किंवा काम करायचे असेल तर नेसले कडे अनुभवी प्रोफेशनल आहेत ज्यामुळे रियल वर्ड प्रॉब्लेम सोबत टॅकल कसे करायचे याबद्दल आपल्याला शिकायला मिळेल.
– लॉजिस्टिक्स, कस्टमर सर्विस आणि नियोजन ऑप्टिमाइझ करण्यासाठी एनालिटिकल आणि स्ट्रॅटेजिक कौशल्ये विकसित करा.
– ग्राहकांपर्यंत उत्पादने मिळवून देण्याच्या वास्तविक-जगातील आव्हानांचा सामना करा.
– शैक्षणिक पात्रता: सप्लाय चेनमध्ये एमबीए किंवा समान विषयातील मास्टर्स.
*मॅन्युफॅक्चरिंग अँड इंजीनियरिंग ( manufacturing and engineering) –
– नेसले कंपनीसोबत मॅन्युफॅक्चरिंग अँड इंजीनियरिंग फिल्डमध्ये चांगला अनुभव मिळवण्याची संधी Nesternship या इंटर्नशिपमुळे मिळते.
– कॉलिटी, सस्टॅनीबिलिटी, इंजीनियरिंग आणि प्रोडक्शन अशा विविध प्रोजेक्ट वर काम करू शकता.
– चांगला फॅक्टरी अनुभव मिळू शकतो.
– प्रोडक्शन क्षेत्रामध्ये किंवा आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये करिअर करण्याची चांगली संधी.
– शैक्षणिक पात्रता : बी टेक, बी इ किंवा समान फील्ड मध्ये मास्टर्स
*कॉर्पोरेट फंक्शन्स ( corporate functions ) –
– Behind-the-scenes insights:
जगातील मोठ्या एफएमसीजी कंपनीसोबत काम अशाप्रकारे केले जाऊ शकते हे शिकण्याची संधी.
– Real-world problem-solving:
क्रिटिकल चॅलेंजेसला कसे सामोरे गेले पाहिजे तसेच बिजनेस च्या यशामध्ये आपण योगदान कसे देऊ शकतो हे शिकण्याची संधी.