विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आहे ,ती कोणती तर “सारथी मोफत कॉम्प्युटर कोर्स ( Sarthi Free Computer Course )”. हा कॉम्प्युटर कोर्स सारथी या संस्थेमार्फत केला जाणार असून चाळीस हजार जागांची भरती होणार आहे. सारथी फ्री कम्प्युटर कोर्स साठी पात्रता काय, कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात ही आणि इतर सर्व माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत…
– ” छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण ” हा कार्यक्रम सारथी पुणे एमकेसीएल पुणे यांच्या मार्फत राबवण्यात येत आहे.
– या अंतर्गत मराठा, कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा कुणबी, नॉन क्रिमिलियर धारक उमेदवारांसाठी निशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत कम्प्युटर कोर्स अगदी मोफत देण्यात येत आहे.
– अर्जदार मराठा, कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा कुणबी, नॉन क्रिमिलियर धारक असावेत.
– अर्जदारासाठी वयोमर्यादा 18 ते 45 वर्षे आहे.
सारथी मोफत कम्प्युटर कोर्स करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे | Sarthi free computer course required documents –
– विहीत नमुन्यातील परिपूर्ण अर्ज, फोटोसहीत
– आधार कार्ड
– उमेदवाराचा फोटो व सही
– आवश्यक शैक्षणिक गुणपत्रक व प्रमाणपत्र (किमान दहावी पास)
– सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले जातीचे प्रमाणपत्र मराठा जातीच्या अर्जदारांकडे जात प्रमाणपत्र नसेल तर मराठा जातीचा उल्लेख असलेले EWS प्रमाणपत्र (उप विभागीय अधिकारी SDO यांचे प्रमाणपत्र) किंवा TC/LC (शाळा किंवा कॉलेज सोडल्याचा दाखला) आणि 1 वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र (३१ मार्च २०२४ पर्यंत वैध )
– जन्म दाखला
– नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र / मागील तीन वर्षांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र (उप विभागीय अधिकारी/तहसीलदार यांचे प्रमाणपत्र) (३१ मार्च २०२४ पर्यंत वैध)
– महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र तहसीलदार यांचे (Domicile Certificate)
*सारथी मोफत कम्प्युटर कोर्स संदर्भातील महत्त्वाच्या बाबी | Important things about Sarthi Free Computer Course –
– सारथी मोफत कॉम्प्युटर कोर्स कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम अगदी मोफत असून यासाठी कुठलीही फी आकारली जाणार नाही, या प्रशिक्षणाचा खर्च सारथी पुणे यांच्यामार्फत करण्यात येणार आहे.
– एमकेसीएलच्या अध्ययन केंद्रामार्फत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम घेतला जातो.
– हे प्रशिक्षण अनिवासी आहे म्हणजेच प्रशिक्षणादरम्यान राहण्याचा आणि जेवणाचा खर्च विद्यार्थ्यांना करावा लागणार आहे परंतु प्रशिक्षण अगदी मोफत देण्यात येणार आहे.
प्रशिक्षण ठिकाण : एमकेसीएल संस्थेचे अधिकृत अध्ययन केंद्र (ALC)
कोर्स कालावधी : सहा महिने
Sarthi Free Computer Course साठी अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.
* Sarthi Free Computer Course साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
* सर्व अर्जांची छाननी केली जाईल. प्रथम येणाऱ्या पात्र उमेदवारांची यादी www.mkcl.org/csmsdeep वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल.
– मराठा उमेदवारास जातीचे प्रमाणपत्र
– नॉन क्रिमिलेयर /EWS (Economically Weaker Section) असल्याचे प्रमाणपत्र
– TC / LC व एक वर्षांचे उत्पन्न प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
– कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा कुणबी उमेदवाराचे जात प्रमाणपत्र
– नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र
हे सादर करणे गरजेचे आहे. ज्या प्रशिक्षण केंद्राची निवड उमेदवारांनी केलेली असेल त्याच प्रशिक्षण केंद्रावर त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल.
अशा रीतीने विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी असून अगदी मोफत सहा महिन्यांच्या कालावधीसाठी कम्प्युटर कोर्स करता येणार आहे. तर सारथी मोफत कम्प्युटर कोर्स ( Sarthi Free Computer Course ) चा लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर अर्ज करणे गरजेचे आहे.
TITLE OF THE TRAINING PROGRAMME
CHHATRAPATI SAMBHAJI MAHARAJ SARTHI Digital Employability Enhancement Program (“CSMS-DEEP”)