Best Tata Mutual Funds for 2024 | टाटा म्युचल फंडस् | Tata Mutual Funds –

Best Tata Mutual Funds for 2024 | टाटा म्युचल फंडस् | Tata Mutual Funds –

       आजच्या ब्लॉगमध्ये आपण टाटाचे कोणते म्युच्युअल फंड्स बेस्ट ( Tata Mutual Funds)आहेत हे बघणार आहोत.टाटा या ब्रँडचे नाव येताच गुणवत्ता आणि विश्वसनीय असा ब्रँड असे आपोआपच चित्र डोळ्यासमोर येते.ऑटोमोबाईलपासून हॉस्पिटॅलिटीपर्यंत विविध उद्योगांमध्ये आपली उपस्थिती निर्माण करत आहे.आता, टाटा ॲसेट मॅनेजमेंटच्या माध्यमातून म्युच्युअल फंडाच्या जगामध्ये टाटा ग्रुपचा प्रवेश झाल्याने जे गुंतवणूकदार  विश्वासार्ह गुंतवणूक भागीदार शोधत असतात त्यांच्यासाठी लक्षवेधी ठरला आहे.

        टाटा म्युच्युअल फंड विविध प्रकारच्या गुंतवणुकीचे पर्याय ऑफर करतात, विविध गरजा आणि गुंतवणूकदारांच्या रिस्क प्रोफाइलची पूर्तता करतात. फंड पोर्टफोलिओमध्ये ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह अशा दोन्ही म्युच्युअल फंडांचा समावेश आहे, प्रत्येक अनुभवी फंड मॅनेजर्स द्वारे मॅनेज केले जाते जे काळजीपूर्वक रिसर्च करतात, एनालाईज करतात आणि परतावा ऑप्टिमाइझ करण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या स्टॉकची निवड करतात.

Best Tata Mutual Funds for 2024 | टाटा म्युचल फंडस् | Tata Mutual Funds –

Tata Mutual Funds

Active vs. Passive Mutual Funds | एक्टिव आणि पॅसिव्ह म्युच्युअल फंड –

ॲक्टिव म्युच्युअल फंड हे फंड मॅनेजर्स द्वारे मॅनेज केले जातात जे मार्केटचे ऍक्टिव्हिटी रिसर्च करतात, कंपनीच्या परफॉर्मन्सचे एनालिसिस करतात आणि अशा स्टॉक्सचे पोर्टफोलिओ तयार करतात जे त्यांना विश्वास आहे की ते ब्रॉडर मार्केटला मागे टाकतील. दुसरीकडे, पॅसिव्ह म्युच्युअल फंड, जसे की इंडेक्स फंड, निफ्टी 50 सारख्या विशिष्ट मार्केट इंडेक्स परफॉर्मन्सची प्रतिकृती बनवण्याचे उद्दिष्ट ठेवतात म्हणजेच पॅसिव्ह म्युच्युअल फंड मार्केट इंडेक्स परफॉर्मन्सची नक्कल करण्यासाठी ऑटोमेटेड सिस्टीम वापरतात.

5 Tata Mutual Funds | टाटा म्युचल फंड्स –

 1. Tata Digital India Fund – Direct Growth | टाटा डिजिटल इंडिया फंड डायरेक्ट ग्रोथ –

– टाटा डिजिटल इंडिया फंड – डायरेक्ट ग्रोथने मागील वर्षात 36.8% परतावा दिला आहे आणि गेल्या 3 वर्षात 25.59% परतावा आणि मागील 5 वर्षात 21.95% रिटर्न्स दिले आहे. 

– लम्सम इन्वेस्टमेंट करायची असल्यास मिनिमम 5000 रुपये पासून सुरू करता येते तर सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) कमीत कमी 500 रुपयांपासून सुरू करता येईल.

– ॲसेट अंडर मॅनेजमेंट (AUM) : रू.1841 करोड 

2. Tata Equity PE Fund – Direct Growth | टाटा इक्विटी PE फंड – डायरेक्ट ग्रोथ –

– टाटा इक्विटी PE फंड – डायरेक्ट ग्रोथने मागील एक वर्षात 49% रिटर्न्स दिला आहे तर मागील तीन वर्षात 23.71% तर मागील पाच वर्षात 20.32% इतका रिटर्न्स दिला आहे.

– या फंडामध्ये लम्सम मिनिमम इन्वेस्टमेंट 5000 रुपयांची करू शकतो तर एसआयपी 100 रुपयापासून करू शकतो.

– ॲसेट अंडर मॅनेजमेंट (AUM) : रू.7916 करोड 

3. Tata India Consumer Fund – Direct Growth | टाटा इंडिया कंजूमर फंड – डायरेक्ट ग्रोथ –

– टाटा इंडिया कंजूमर फंड – डायरेक्ट ग्रोथने मागील एक वर्षात 40.1% रिटर्न्स दिला आहे तर मागील तीन वर्षात 20.32% तर मागील पाच वर्षात 18.05 % इतका रिटर्न्स दिला आहे.

– या फंडामध्ये लम्सम मिनिमम इन्वेस्टमेंट 5000 रुपयांची करू शकतो तर एसआयपी 500 रुपयापासून करू शकतो.

– ॲसेट अंडर मॅनेजमेंट (AUM) : रू.1841 करोड

 4. Tata Ethical Direct Plan Growth | टाटा एथिकल डायरेक्ट प्लॅन ग्रोथ –

– टाटा एथिकल डायरेक्ट प्लॅन ग्रोथने मागील एक वर्षात 30.9% रिटर्न्स दिला आहे तर मागील तीन वर्षात 19.27% तर मागील पाच वर्षात 19.73 % इतका रिटर्न्स दिला आहे.

– या फंडामध्ये लम्सम मिनिमम इन्वेस्टमेंट 5000 रुपयांची करू शकतो तर एसआयपी 100 रुपयापासून करू शकतो.

– ॲसेट अंडर मॅनेजमेंट (AUM) : रू.2273 करोड

5. Tata ELSS Tax Saver Fund Direct Growth | टाटा ई एल एस एस टॅक्स सेवर फंड डायरेक्ट ग्रोथ –

– टाटा ई एल एस एस टॅक्स सेवर फंड डायरेक्ट ग्रोथने मागील एक वर्षात 32.4% रिटर्न्स दिला आहे तर मागील तीन वर्षात 18.09% तर मागील पाच वर्षात 18.72 % इतका रिटर्न्स दिला आहे.

– या फंडामध्ये चांगली गोष्ट अशी आहे की ,लम्सम मिनिमम इन्वेस्टमेंट 500 रुपयांची करू शकतो तर एसआयपी 500 रुपयापासून करू शकतो.

– ॲसेट अंडर मॅनेजमेंट (AUM) : रू.3986 करोड

  अशाप्रकारे हे काही पाच बेस्ट टाटा म्युच्युअल फंड्स ( Tata Mutual Funds ) आहेत. या ब्लॉगमध्ये आम्ही टाटाचे बेस्ट म्युच्युअल फंड्स कोणते वाटले त्याबद्दल फक्त माहिती दिलेली आहे परंतु त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा कुठलाही सल्ला आम्ही देत नाही. परंतु टाटा या ब्रँड बद्दल सर्वांच्याच मनामध्ये एक खात्री आणि विश्वास आहे.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Leave a Comment