AFCAT Recruitment I AFCAT Notification 2024 I AFCAT नोटिफिकेशन अधिकृत वेबसाइटवर 304 रिक्त पदांसाठी प्रसिद्ध I Best Job Opportunities
IAF ने AFCAT 2 2024 नोटिफिकेशन अधिकृत वेबसाइटवर 304 रिक्त पदांसाठी प्रसिद्ध केले आहे. आजच्या ब्लॉग मध्ये आपण AFCAT भरतीबद्दल ( AFCAT Recruitment ) माहिती बघणार आहोत. AFCAT 2 2024 ची अधिकृत नोटिफिकेशन भारतीय वायुसेनेने प्रसिद्ध केले असून भारतीय वायुसेनेचा भाग होण्यासाठी पुरुष आणि महिलांना फ्लाइंग ब्रांच आणि ग्राउंड ड्युटी शाखांमध्ये कमिशन्ड अधिकारी (commissioned officers)म्हणून भरती होतआहे. IAF मध्ये सामील होण्यास इच्छुक असलेले उमेदवार 30 मे 2024 पासून भारतीय हवाई दलाच्या अधिकृत वेबसाइट https://afcat.cdac.in/AFCAT/ वर AFCAT 2 2024 फॉर्म भरणे सुरू करू शकतात. परीक्षा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख २८ जून २०२४ आहे.
एएफसीएटी म्हणजे एअर फोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट (Air Force Common Admission Test). IAF च्या फ्लाइंग आणि ग्राउंड ड्यूटी (Technical and Non Technical) शाखांमध्ये अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी वर्षातून दोनदा ही ग्रॅज्युएट लेवल वरील परीक्षा घेतली जाते.
AFCAT Recruitment I AFCAT Notification 2024 I AFCAT नोटिफिकेशन अधिकृत वेबसाइटवर 304 रिक्त पदांसाठी प्रसिद्ध –
Table of Contents
AFCAT Recruitment Overview I AFCAT भरती ओव्हरविव्ह –
परीक्षेचे नाव
एअर फोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट
पेरिओडीसिटी
वर्षातून दोनदा
एक्साम लेवल
नॅशनल
एकूण जागा
३०४
अर्ज करण्याची पद्धत
ऑनलाईन
एकूण प्रश्न
१००
एकूण मार्क्स
३००
एक्साम राऊंड्स
३ स्टेजेस (Written + AFSB + DV)
एक्सपेक्टेड उमेदवार
२ लाख अँप्रोक्स.
अधिकृत वेबसाईट
afcat.cdac.in
AFCAT Recruitment Notification I AFCAT नोटिफिकेशन –
उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत नोटिफिकेशन pdf द्वारे रिक्त जागा, प्रशिक्षण कालावधी, निवड प्रक्रिया आणि इतर माहितीसह डिटेल्स तपासू शकतात.
AFCAT Recruitment Notification वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.
AFCAT 2 तारखा 2024 I Important dates –
AFCAT 2/2024 साठी अधिकृत AFCAT नोटिफिकेशन 2024 भारतीय वायुसेनेने (IAF) ऑनलाइन नोंदणी सोबत इतर पूर्ण वेळापत्रक देखील जारी केले आहे. AFCAT 2 ऑनलाइन फॉर्म 2024 30 मे ते 28 जून 2024 पर्यंत उपलब्ध करून दिले जातील.
AFCAT 2 नोटिफिकेशन प्रसिद्ध झाल्याची तारीख: 20 मे 2024 AFCAT 2 अर्ज सुरू होण्याची तारीख : 30 मे 2024 अर्ज भरण्याची शेवटची तारीख: 28 जून 2024 परीक्षेची तारीख: सप्टेंबर २०२४
पात्रता निकष /Eligibility Criteria
फ्लाइंग ब्रँचसाठी – – 20 ते 24 वयोगटातील पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवार फ्लाइंग शाखेसाठी पात्र आहेत. – CPL (कमर्शियल पायलट लायसन्स) धारक उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 26 वर्षे आहे. ग्राउंड ड्युटी (Technical and Non Technical) शाखांसाठी – 20 ते 26 वर्षे वयोगटातील पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवार ग्राउंड ड्युटी शाखेसाठी अर्ज करू शकतात.
Educational Qualification / शैक्षणिक पात्रता –
फ्लाइंग शाखा –
10+2 स्तरावर गणित आणि भौतिकशास्त्रात किमान 50% गुण.
पदवी (तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम) किमान ६०% गुणांसह किंवा समतुल्य.
बीई/बी टेक पदवी (चार वर्षांचा अभ्यासक्रम) किमान ६०% गुणांसह किंवा समतुल्य.
ज्या उमेदवारांनी असोसिएट मेंबरशिप ऑफ इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स (इंडिया) किंवा एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाची विभाग A आणि B परीक्षा किमान 60% गुणांसह किंवा समतुल्य उत्तीर्ण केली आहे.
10+2 स्तरावर भौतिकशास्त्र आणि गणितात प्रत्येकी किमान 50% गुण आणि किमान 60% गुणांसह अभियांत्रिकी/तंत्रज्ञानात चार वर्षांची पदवी.
वैमानिक अभियंता (मेकॅनिकल): 10+2 स्तरावर भौतिकशास्त्र आणि गणितात प्रत्येकी किमान 50% गुण आणि किमान 60% गुणांसह अभियांत्रिकी/तंत्रज्ञानात चार वर्षांची पदवी.
ग्राउंड ड्यूटी (नॉन-टेक्निकल) शाखा:
प्रशासन आणि लॉजिस्टिक: पदवी (तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम) किमान ६०% गुणांसह किंवा समतुल्य.
अकाउंट्स ब्रान्च : बी.कॉम पदवी किंवा किमान ६०% गुणांसह समतुल्य.
शिक्षण: 50% गुणांसह पदव्युत्तर आणि किमान 60% गुणांसह पदवी.
हवामानशास्त्र: B.Sc. भौतिकशास्त्र आणि गणितासह किमान 60% गुणांसह किंवा किमान 60% गुणांसह अभियांत्रिकी/तंत्रज्ञानात चार वर्षांची पदवी
AFCAT 2024 साठी निवड प्रक्रियेत लेखी परीक्षा आणि त्यानंतर पात्र ठरलेल्यांसाठी हवाई दल निवड मंडळ ( Air Force Selection Board – AFSB) टेस्टिंग समाविष्ट असते. अंतिम गुणवत्ता यादी कंम्बाईन लेखी परीक्षा आणि AFSB टेस्ट परफॉर्मन्सच्या आधारे तयार केली जाते.
लेखी परीक्षा –
AFCAT लेखी परीक्षेत जेनेरल अवेअरनेस , इंग्रजीतील व्हर्बल क्षमता,नुमेरिकेल ऍबिलिटी आणि रिजनिंग आणि मिलिटरी अँटिट्यूड टेस्ट समाविष्ट करणारे वस्तुनिष्ठ-प्रकारचे प्रश्न असतात. परीक्षेचा कालावधी दोन तासांचा आहे आणि कमाल 300 गुण आहेत.
AFSB टेस्टिंग – लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना AFSB चाचणीसाठी बोलावले जाईल, ज्यामध्ये हे समाविष्ट आहे:
स्टेज-I: पिक्चर परसेप्शन आणि डिस्कशन टेस्टसह ऑफिसर इंटेलिजन्स रेटिंग टेस्ट. टप्पा-II: मानसशास्त्रीय टेस्ट , ग्रुप टेस्ट आणि मुलाखत.
फ्लाइंग शाखेसाठी:
Computerised Pilot Selection System(CPSS).
AFCAT 2 फॉर्म 2024 –
AFCAT 2 परीक्षेसाठी पात्र उमेदवारांसाठी AFCAT 2 ऑनलाइन फॉर्म 2024 30 मे 2024 रोजी www.afcat.cdac.in वर सुरू होईल.