किमान 1 लाख ते कमाल 25 लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य I Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana | पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना I Best Government Schemes 2024 –
Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana | पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना –
आजच्या ब्लॉगमध्ये आपण अशा एका योजनेबद्दल माहिती बघणार आहोत ज्या योजनेमुळे महिलांचे उद्योग क्षेत्रामधील प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. या योजनेचे नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना ( Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana ). जाणून घेऊया पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना या योजनेबद्दल अधिक माहिती…
Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Scheme | पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना
– बऱ्याच महिला व्यवसाय सुरू करून इच्छित असतात किंवा त्यांचा व्यवसाय सुरू सुद्धा असतो परंतु आर्थिक निधीच्या अभावामुळे व्यवसाय चांगल्या पद्धतीने करणे शक्य होत नाही परंतु पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेमुळे हे शक्य होऊ शकते.
– जर समजा महिलांच्या स्टार्टअपला आर्थिक सहाय्य मिळाले तर त्यांचा व्यवसाय तर भरभराटीस येईल त्यासोबतच इतर महिलांसाठी सुद्धा रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण होते.
– जर महिलांनी स्टार्टअप सुरू केले तर स्टार्टअप विकासामुळे महिलांमध्ये आत्मनिर्भरता वाढेल आणि उद्योगाचा व्यावसायिक दृष्टिकोन सुद्धा विकसित होईल.
– महाराष्ट्र राज्यांमधील महिला नेतृत्वामध्ये स्टार्टअप्सला पाठबळ देण्यासाठी ” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना ” राबवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे.
Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Scheme| पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचे उद्दिष्टे व स्वरूप :
– महाराष्ट्र राज्यामधील महिला नेतृत्वामधील स्टार्टअपला पाठबळ देणे.
– महिला नेतृत्वातील स्टार्टअप तसेच नाविन्यपूर्ण अशा संकल्पना असलेले स्टार्टअप यांना व्यवसाय वाढीसाठी तसेच विस्तार करण्यासाठी एक वेळेस आर्थिक सहाय्य करणे.
– राज्यामधील महिला स्टार्टअप ला आत्मनिर्भर व स्वावलंबी बनवणे.
– महाराष्ट्राची ओळख देशांमधील सर्वाधिक महिला स्टार्टअप असलेले राज्य म्हणून निर्माण करणे.
– जास्तीत जास्त महिला स्टार्टअप मुळे रोजगार निर्मितीला सुद्धा चालना मिळू शकते यामुळे बेरोजगारी कमी करणे.
– या योजनेमधील एकूण तरतुदीच्या 25% एवढी रक्कम शासनातर्फे वीरनिर्दिष्ट करण्यात आलेल्या मागासवर्गीय महिला आणि आर्थिक दृष्ट्या मागास वर्गातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात येईल.
– महिला नेतृत्वांमधील प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअपला त्यांच्या उलाढालिनुसार किमान 1 लाख ते कमाल 25 लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल.
– महिला नेतृत्वातील स्टार्टअप कमीत कमी एका वर्षापासून कार्यरत असणे आवश्यक आहे.
– महिला नेतृत्वातील स्टार्टअपची वार्षिक उलाढाल ही १० लाख रुपये ते १ कोटी रुपये पर्यंत असावी.
– लाभार्थी स्टार्ट अपने शासनाच्या इतर कोणत्याही योजनेमधून अनुदान स्वरूपात आर्थिक लाभ घेतलेला नसावा.
– स्टार्ट अप मध्ये महिला संस्थापक / सह संस्थापक यांचा किमान ५१ % इतका वाटा असणे गरजेचे आहे.
– उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग, भारत सरकार ( department for promotion of industry and internal trade ) मान्यता प्राप्त महाराष्ट्र नोंदणीकृत महिला नेतृत्वातील स्टार्टअप.
* महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी यांना ही योजना राबवण्यासाठी अंमलबजावणी संस्था म्हणून घोषित करण्यात आले आहे.
– www.msins.in या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने निशुल्क अर्ज करता येईल.
– अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
कंपनीचा प्रस्ताव
कंपनी नोंदणी प्रमाणपत्रे ( MCA)
DPIIT मान्यता प्रमाणपत्र
– पुढील स्टार्टअपला प्राधान्य देण्यात येईल :
आश्वासक, नाविन्यपूर्ण आणि प्रभावी असे स्टार्टअप.
– तसेच मिळालेल्या अर्जांपैकी रोजगार निर्मिती करणाऱ्या स्टार्टअपला प्राधान्य देण्यात येऊ शकते.
* निवड प्रक्रिया करण्यासाठी शासनाकडून विविध प्रकारच्या समित्या नेमण्यात येणार आहे.
Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana- Apply Link
Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana GR | पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना शासन निर्णय ( GR ) वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.