शेतकऱ्यांसाठी आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बातमी… मोफत वीज | Mukhyamantri Baliraja Mofat Veej Yojana | मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना | Best Government schemes 2024 –
आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की भारत हा कृषिप्रधान देश आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. शेती पाण्यावर अवलंबून असते, पाऊस जर व्यवस्थित झाला तर उत्तमच परंतु हल्ली हवामानामधील बदलामुळे पाऊस कमी जास्त प्रमाणामध्ये होत असतो. शेतकरी विहीर, बोर किंवा तळे यांसारख्या माध्यमांमार्फत कृषी पंपाच्या सहाय्याने शेतीला पाणीपुरवठा करत असतात परंतु वीजपुरवठा खंडित होणे तसेच विज बिल जास्त प्रमाणामध्ये येणे यांसारख्या काही कारणांमुळे शेतकऱ्यांना शेतीमध्ये अडचणी येत असतात. राज्य सरकारने एका नवीन योजनेची घोषणा केलेली आहे ती योजना आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना ( Mukhyamantri Baliraja Mofat Veej Yojana ). ही योजना नक्की काय आहे याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणून घेणार आहोत…
शेतीला पाण्याची आवश्यकता नक्कीच असते परंतु गेल्या काही वर्षापासून वातावरणामध्ये तसेच हवामानामध्ये झालेल्या बदलामुळे पाऊस योग्य प्रमाणामध्ये पडत नसल्याने शेतीमध्ये दुष्परिणाम भोगावे लागतात. महाराष्ट्र राज्यामधील 7.5 एचपी पर्यंतच्या कृषी पंप ग्राहकांना एप्रिल 2024 पासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेला मान्यता दिली गेलेली आहे.
– परंतु तीन वर्षानंतर या योजनेचा आढावा घेऊन त्यापुढील कालावधीसाठी ही योजना राबविण्या संबंधित निर्णय घेतला जाणार आहे.
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेसाठी महाराष्ट्रामधील 7.5 hp पर्यंत शेतीपंपाचा मंजूर भार असलेले सगळे शेतीपंप ग्राहक पात्र असतील.
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा शासन निर्णय 25 जुलै 2024 रोजी जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आलेला आहे.
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेसाठी कागदपत्रे काय लागतील तसेच या योजनेसाठी अर्ज कसा करायचा याबद्दल अद्याप माहिती उपलब्ध नाही.