बृहन्मुंबई महानगरपालिका भरती | 1846 जागा | BMC clerk recruitment 2024 I best government opportunities
बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 1846 जागांसाठी “कार्यकारी सहायक ” (पूर्वीचे नाव : लिपिक )पदासाठी मेगा भरती होत असल्याचे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे,इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि ९ सप्टेंबर २०२४ या शेवटच्या तारखेपर्यंत पात्र उमेदवार अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात बृहन्मुंबई महानगरपालिका भरती या भरतीबद्दल अधिक माहिती …
1)i]उमेदवार मान्यताप्राप्त मंडळामार्फत माध्यमिक शाळांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नामध्ये उत्तीर्ण असावा.
ii]उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान ,कला ,वाणिज्य ,विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा आणि 45% गुणांसह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा.
iii] ज्या मान्यताप्राप्त विद्यापिठामध्ये सत्र पद्धत अवलंबिली जात असेल त्या विद्यापिठातील उमेदवाराची टक्केवारी खालीलप्रमाणे गणण्यात येऊन, सदर टक्केवारी 45% गुणांसह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
• 7 Point Grading System (CB GS) प्रमाणे श्रेणी देण्यात येणाऱ्या विद्यापिठातील उमेदवाराच्या सर्व विषयांच्या गुणांची एकत्रित टक्केवारी गणण्यात येईल.
• तसेच, 10 Point Grading System (CB CS) प्रमाणे श्रेणी देण्यात येणाऱ्या विद्यापिठातील उमेदवाराची टक्केवारी पुढील सुत्राप्रमाणे गणण्यात येईल.
टक्केवारी (%) = 7.1 X CGPA (Cumulative Grade Point Average) + 11.
टक्केवारीची गणना वरील सूत्र वापरून अपूर्णांकात आल्यास पुढील पूर्णाकात गणण्यात येईल.
2) उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
3) उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे.
4)(1) उमेदवाराजवळ ‘एम.एस.सी.आय.टी’ परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र किंवा शासन निर्णय क्र.मातंस / 2012/प्र.क्र.277/39 दि.04.02.2013 आणि शासन पुरकपत्र क्र. मातंस / 2012/प्र.क्र.277/39 दि.08.01.2018 तसेच, शासन पुरकपत्र क्र. मातंस / 2012/प्र.क्र.217/39 दि.16.07.2018 मध्ये नमूद केलेल्या संगणक/माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचानलयाने यासंदर्भात यापुढे वेळोवेळी निर्गमित केलेल्या व बृहन्मुंबई महानगरपालिकेने अंमलात आणलेल्या परिपत्रकातील तरतुदी लागू होतील.
(1) उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीम, वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशिट, प्रेझेंटेशन, डेटाबेस सॉफ्टवेअर, ई-मेल आणि इंटरनेट इत्यादीविषयी उत्तम ज्ञान असावे.
टीपः- कार्यकारी सहायक संवर्गात नेमणूकीसाठी उपरोक्त नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे. तथापि, उमेदवाराजवळ उपरोक्त 4) मध्ये नमूद केलेली संगणक विषयक अर्हता नसल्यास नियुक्ती दिनांकापासून दोन वर्षाच्या आत सदर अर्हता प्राप्त करणे आवश्यक राहील. अन्यथा त्याची सेवा समाप्त करण्यात येईल
बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 1846 जागांसाठी “कार्यकारी सहायक ” (पूर्वीचे नाव : लिपिक )पदासाठी मेगा भरती होत असल्याचे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे,इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि ९ सप्टेंबर २०२४ या शेवटच्या तारखेपर्यंत पात्र उमेदवार अर्ज करू शकतात.