Zepto Delivery job | झेप्टो डिलिव्हरी जॉब २५ हजार ते 40 हजार रुपयांपर्यंत कमावण्याची संधी पार्ट टाईम/फुल टाईम | How to join Zepto Delivery Job | Best job opportunities 2024 –
Zepto Delivery job | झेप्टो डिलिव्हरी जॉब २५ हजार ते 40 हजार रुपयांपर्यंत कमावण्याची संधी पार्ट टाईम/फुल टाईम | How to join Zepto Delivery Job | Best job opportunities 2024 –
झेप्टो ( Zepto ) या कंपनीबद्दल तुम्ही सर्वांनी ऐकलेलेच असेल, बऱ्याच जणांना या कंपनीसोबत नोकरी करण्याची सुद्धा इच्छा असेल परंतु ती नोकरी कशी मिळवायची याबद्दल माहिती नसेल तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण जे झेप्टो सोबत डिलिव्हरी जॉब (Zepto Delivery job
) आपण कशाप्रकारे करू शकतो त्याची पूर्ण जॉइनिंग प्रोसेस बघणार आहोत.झेप्टो या कंपनीसोबत आपण पार्ट टाइम किंवा फुल टाइम जॉब करू शकतो आणि 25000 ते 40 हजार रुपयांपर्यंत कमाई करू शकतो. या कंपनीसोबत जॉब करण्यासाठी आपल्याकडे वेहिकल असणे सुद्धा आवश्यक नाही आपण त्यांच्याकडूनच व्हेईकल रेंट ने घेऊ शकतो आणि जॉब करू शकतो. चला तर जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती…
Zepto Delivery job | झेप्टो डिलिव्हरी जॉब २५ हजार ते 40 हजार रुपयांपर्यंत कमावण्याची संधी पार्ट टाईम/फुल टाईम | How to join Zepto Delivery Job –
Table of Contents
झेप्टो सोबत कशाप्रकारे नोकरी करू शकतो ?
झेप्टो या कंपनीसोबत आपण पार्ट टाइम किंवा फुल टाइम जॉब करू शकतो आपल्या टायमिंग अनुसार लॉगिन करून आपण जॉब करू शकतो.
झेप्टो सोबत काम करण्यासाठी आपल्याकडे वेहिकल असणे आवश्यक आहे का ?
झेप्टो सोबत काम करण्यासाठी आपल्याकडे वेहिकल असणे आवश्यक नाही, जर आपल्याकडे वेहिकल नसेल तर आपण त्यांच्या मार्फत वेहिकल रेंट ने घेऊ शकतो आणि चांगली कमाई करू शकतो. त्यामुळे खरोखरच ज्यांना जॉब करण्याची इच्छा आहे परंतु घरी टू व्हीलर किंवा इतर वेहिकल नाही अशा उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी असणार आहे.
आता, जाणून घेऊयात झेप्टोसोबत काम करण्याची जॉइनिंग प्रोसेस.
Zepto Delivery job | झेप्टो डिलिव्हरी जॉब जॉईन करण्यासाठी आवश्यक असणारी प्रोसेस | How to join Zepto Delivery Job –
आपल्याला झेप्टो सोबत काम करायचे असल्यास आपला आयडी ऍक्टिव्हेट असणे आवश्यक आहे आणि त्यासाठीच पुढील प्रोसिजर करायची आहे.
– सर्वप्रथम Play Store वरून Zepto delivery partner हे ॲप डाऊनलोड करायचे आहे.
– त्यानंतर हे ॲप ओपन करून नेक्स्ट करायचे आहे.
– आता तुमचा फोन नंबर टाकायचा आहे त्यानंतर मोबाईलवर ओटीपी मिळेल हा ओटीपी एंटर करून सबमिट करायचे आहे.
– आता वेलकम स्क्रीन येईल त्या ठिकाणी कंटिन्यू करायचे आहे.
– नंतर पर्सनल डिटेल्स, वर्क डिटेल्स आणि डॉक्युमेंट्स असा इंटरफेस ओपन होईल.
– पर्सनल डिटेल्स यामध्ये आपली सिटी निवडायची आहे आणि त्यानंतर कंटिन्यू करायचे आहे.
– आता त्या ठिकाणी रेफरल कोड टाकण्यासाठी येईल आपल्याकडे रेफरल कोड असेल तर तो टाकायचा आहे नसेल तर हा कोड ऑप्शनल आहे पुढे क्लिक करायचे आहे.
– झेप्टोसाठी जॉइनिंग बोनस मिळतो परंतु जे उमेदवार त्यांचा आयडी ऍक्टिव्ह झाल्यानंतर लगेचच काम सुरू करतात त्यांना हा जॉइनिंग बोनस मिळू शकतो. जॉईनिक बोनस हा सिटी आणि राज्यानुसार वेगवेगळा असू शकतो (5000,7000,10,000 रुपये ) परंतु जे उमेदवार आयडी ऍक्टिव्ह झाल्यानंतर लगेच काम सुरु करत नाही त्यांचा आयडी ब्लॉक होऊ शकतो तसेच त्यांना जॉइनिंग बोनस न मिळण्याची सुद्धा शक्यता असते.
– आता मरायटल स्टेटस निवडायचे आहे.
– त्यानंतर स्टोअर सिलेक्ट करायचे आहे. स्टोअर सिलेक्ट करायचे असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ज्या स्टोअरवर जास्तीत जास्त ऑर्डर्स मिळण्याची शक्यता असते असे स्टोअर निवडायचे आहे त्यानंतर कंटिन्यू करायचे आहे.
– आता डिलिव्हरी व्हेईकल निवडायचे आहे. या ठिकाणी सायकल, बाईक, इलेक्ट्रिक बाइक, इलेक्ट्रिक सायकल आणि आय डोन्ट ओन वेहिकल असे पर्याय दिसतील आपल्याकडे वेहिकल असल्यास जे वेहिकल आहे तो पर्याय निवडायचा आहे आणि जर व्हेईकल नसेल तर आय डोन्ट ओन वेहिकल पर्याय निवडायचा आहे.
– ज्यांच्याकडे व्हेईकल नाही त्यांना त्या वेहिकलचे रेंट द्यावे लागते हे रेंट आपण जी अर्निंग करतो त्यामधून वजा केले जाते आणि रेंटने वेहिकल घेण्यासाठी मिनिमम डिपॉझिट जमा करावे लागते.
– आता जॉब टाईप निवडायचा आहे. या पर्यायांमध्ये फुल टाइम आणि पार्ट टाइम असे दोन ऑप्शन आहेत आपल्या सोयीनुसार पर्याय निवडायचा आहे.
– आता शिफ्ट सिलेक्ट करायची आहे. तुम्हाला हवी असलेली शिफ्ट या ठिकाणी निवडू शकता ,30 मिनिटांचा ब्रेक असतो.
– आता वीक ऑफ निवडायचा आहे, तुम्हाला कोणत्या दिवशी सुट्टी हवी आहे त्यानुसार तुम्ही वार निवडू शकता यामध्ये सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार असे पर्याय उपलब्ध आहेत.
– आता आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचे आहे, सेल्फी घेऊन अपलोड करायची आहे त्यानंतर आधार कार्ड, जन्मतारीख, पॅन कार्ड ,RC यांसारखे आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचे आहेत. सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर सबमिट हा पर्याय निवडायचा आहे.
– या ठिकाणी इन्शुरन्स हा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे तुम्हाला इन्शुरन्स हवा असल्यास तो ऑप्शन निवडू शकता.
– आता स्टार्ट ट्रेनिंग हा ऑप्शन निवडायचा आहे या ठिकाणी छोटे छोटे व्हिडिओज आहेत ते बघायचे आहे आणि त्यानंतर स्टार्ट डूइंग ऑर्डर्स हा पर्याय निवडायचा आहे. झेप्टोचे दोन टी-शर्ट्स आणि डिलिव्हरी बॅक आपल्याला घ्यावी लागते काही शहरांमध्ये किंवा राज्यांमध्ये हे फ्री मध्ये दिले जाते तसेच नसल्यास आपल्या अर्निंग मधून याची अमाऊंट वजा केली जाऊ शकते. आता एक डेमो ऑर्डर कम्प्लीट करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमचे काम सुरू करू शकता.
अशाप्रकारे ज्या उमेदवारांना झेप्टो डिलिव्हरी जॉब ( Zepto Delivery job ) करायचा आहे त्यांनी या प्रकारे जॉइनिंग प्रोसेस पूर्ण करू शकता.