CSC Common Service Centre सेंट्रल गवर्नमेंटचे कामे करण्यासाठी जसे की पिक विमा ,पॅन कार्ड यासाठी उपयुक्त आहे. तर mahaonline id / आपले सेतू/ आपले सरकार राज्य सरकारचे कामे जसे की,आधार kyc,डॉमिसील सर्टिफिकेट ,इन्कम सर्टिफिकेट ,नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट यांसारख्या कामांसाठी उपयुक्त आहे.
Aaple Sarkar Seva Kendra| आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यासाठीपहिला पर्याय :
ज्यांच्याकडे CSC सेंटर आहे त्यांना महाऑनलाईन आयडी मिळू शकते. दोन ते तीन वर्षातून यासाठी जिल्ह्यामध्ये फॉर्म सुटत असतात. समजा एखाद्या गावा मधून जास्त फॉर्म गेले तर ज्यांच्याकडे पहिल्यापासूनच सीएससी सेंटर आहे त्यांना एक्स्ट्रा 25 मार्क्स मिळतात.
आपल्या जिल्ह्यामध्ये जागा सुटलेल्या आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे नाव आणि त्यापुढे gov.in किंवा .nic.in असे सर्च करून पहिली जी लिंक येईल त्यावर क्लिक करावे आणि माहिती मिळवावी.
गावानुसार जाहिरात दिली जाते आणि गावामधील लोकसंख्येच्या अनुसार जागा निघत असतात.
जागा निघाल्यानंतर ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरले जाऊ शकतात.
पात्र उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाते तसेच काही ठिकाणी मुलाखत सुद्धा घेतली जाते.
सीएससी चालक किंवा ग्रामपंचायत ऑपरेटर यांना प्राधान्य दिले जाते.
जे उमेदवार पात्र ठरतील त्यांची यादी प्रसिद्ध केली जाते आणि आपले सरकार केंद्र चालवण्याची परवानगी दिली जाते यासाठी महाऑनलाईन आयडी किंवा VLE आयडी दिला जातो.
Aaple Sarkar Seva Kendra| आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यासाठीदुसरा पर्याय :
गावामधील ग्रामपंचायत मार्फत महा ऑनलाईन आयडी दिला जाऊ शकतो. हा आयडी दिल्याने ऑपरेटर म्हणून काम करता येते आणि सरकार मार्फत मानधन मिळत असते. परंतु यासाठी सुद्धा सीएससी सेंटर असणे आवश्यक आहे.
Aaple Sarkar Seva Kendra required documents | आवश्यक कागदपत्रे
पॅन कार्ड
आधार कार्ड
१० वी किंवा 12 वी मार्कशीट
शाळा सोडल्याचा दाखला
संगणक प्रमाणपत्र /MSCIT
चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र
सीएससी प्रमाणपत्र ( असल्यास )
सेंटर आतील बाहेरील फोटो ( लोकेशन सह )
भाडे करार ( जागा भाड्याने असेल तर )
Aaple Sarkar Seva Kendra eligibility | पात्रता
ज्या गावांमध्ये जागा निघालेली आहे तेथीलच उमेदवार असणे म्हणजेच रहिवासी असणे आवश्यक आहे तसे असल्यास प्राधान्य दिले जाईल.
उमेदवार शासकीय कर्मचारी नसावा आणि तसे प्रतिज्ञापत्र सादर करावे.
इच्छुक उमेदवार १० वी उतीर्ण असणे आवश्यक आहे.
उमेदवाराकडे आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यासाठी व नियमानुसार जागा स्वतःची किंवा भाडेतत्त्वावर असावी.
उमेदवाराकडे चारित्र्य प्रमाणपत्र असणे आवश्यक असेल.
ग्रामपंचायत ना हरकत प्रमाणपत्र किंवा शॉप ॲक्ट लायसेन्स असणे आवश्यक आहे.
आवश्यक साहित्य :
कॉम्पुटर / लॅपटॉप
बायोमेट्रिक डिव्हाइसेस
प्रिंटर
स्कॅनर
कॅमेरा
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत 15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पूर्णपणे मोफत
CSC आयडी (कॉमन सर्व्हिस सेंटर आयडी) मिळविण्यासाठी, तुम्हाला CSC ई-गव्हर्नमेंट वेबसाइटवर ग्रामस्तरीय उद्योजक Village Level Entrepreneur (VLE) म्हणून नोंदणी करावी लागेल आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, ज्यामध्ये तपशील भरणे, CSC नेटवर्कमध्ये सामील होणे आणि यशस्वी नोंदणी आणि गुणवत्ता तपासणी यांचा समावेश आहे.
१. पूर्व-आवश्यकता Prerequisites :
वय: तुमचे वय १८ वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे.
नागरिकत्व: तुम्ही भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे.
टीईसी प्रमाणपत्र (सामान्य व्हीएलईसाठी अनिवार्य): सीएससी व्हीएलई म्हणून अर्ज प्रकारासाठी, टेलीसेंटर उद्योजक अभ्यासक्रम (टीईसी) प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. तुम्ही टीईसी प्रमाणपत्रासाठी https://www.cscentrepreneur.in/register येथे नोंदणी करू शकता.
वैध आधार आणि पॅन कार्ड: नोंदणी प्रक्रियेदरम्यान प्रमाणीकरणासाठी तुम्हाला याची आवश्यकता असेल.
इतर कागदपत्रे: तुम्हाला तुमचा मतदार ओळखपत्र/EPIC, पॅन कार्ड, आधार कार्ड, अर्जदाराचा फोटो, भारतीय पासपोर्ट/पोलिस पडताळणी अहवाल, सर्वोच्च पात्रता दस्तऐवज, TEC प्रमाणपत्र आणि बँक BC प्रमाणपत्र यांच्या प्रती आवश्यक असतील. Whitelisted Groups: जर तुम्ही Whitelisted Groupsशी संबंधित असाल (जसे की SHG, FPO, FPS, RDD), तर तुमचे details तुमच्या जिल्हा व्यवस्थापक/राज्य प्रमुखांनी Whitelisted केले आहेत याची खात्री करा.