Amrut Yojana Typing | संगणक टंकलेखन व लघुलेखन प्रशिक्षण योजना | GCC-TBC Amrut Yojana for Typing | Best schemes 2025

Amrut Yojana Typing | संगणक टंकलेखन व लघुलेखन प्रशिक्षण योजना | GCC-TBC Amrut Yojana for Typing | Best schemes 2025

संगणक टंकलेखन व लघुलेखन प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना  रु.६,५००/-  प्रोत्साहनात्मक मिळणार आहेत तर  जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना रु.५,३००/- प्रोत्साहनात्मक मिळणार आहेत. या योजनेसाठी नक्की पात्रता काय आहे तसेच अर्ज कसा करायचा अशी सविस्तर माहिती आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणून घेणार आहोत…

Amrut Yojana Typing | संगणक टंकलेखन व लघुलेखन प्रशिक्षण योजना | GCC-TBC Amrut Yojana for Typing | Best schemes 2025

Amrut Yojana Typing
Amrut Yojana Typing

Amrut Yojana Typing | संगणक टंकलेखन व लघुलेखन प्रशिक्षण योजना

उद्देश:

शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) आणि Online लघुलेखन परीक्षेद्वारे महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील अमृत योजनेंतर्गत लक्षित गटातील आर्थिक दुर्बल घटकांमधील उमेदवारांना उद्योगाभिमुख स्वयंरोजगार आणि रोजगारक्षम बनविणे हा आहे.

अमृतचा लक्षगट:

खुल्या प्रवर्गामधील ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग किंवा संस्था किंवा महामंडळा द्वारे समकक्ष योजनांचा लाभ होत नाही, अशा खुल्या प्रवर्गामधील अमृतच्या लक्षीत गटातील जातींचा, आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील विद्यार्थी, युवक, युवती जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) व online लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत असे उमेदवार.

Amrut Yojana Typing Eligibility | संगणक टंकलेखन व लघुलेखन प्रशिक्षण योजना लाभार्थी पात्रता निकष:

1. अमृत योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अमृत संस्थेचे पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक असेल.

2. या परीक्षासाठी अर्जदाराने कोणत्याही संस्थेकडून प्रोत्साहन पर अर्थसहाय्य घेतलेले नाही असे स्वयंघोषणापत्र आणि संस्थाचालकांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल.

3.  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या (MSCE) शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) व ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या निकालाची प्रत अर्जदाराने स्वस्वाक्षरीत प्रत सादर करणे आवश्यक असेल.

4. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासनमान्य टंकलेखन संस्थेमध्ये कोर्स साठी जमा केलेल्या फीची स्वस्वाक्षरीत (Self-attested) पावती असणे गरजेचे आहे.

5. उमेदवाराचे वैयक्तिक आधार संलग्न बँक अकाउंट डिटेल्स (बँकेचे नाव, शाखा, खाते क्रमांक, IFSC कोड) आणि रद्द केलेल्या चेकची प्रत जोडणे गरजेचे आहे.

लाभाचे स्वरूप:

1. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) (कॉम्पुटर टायपिंग मराठी / हिंदी, इंग्रजी ४०, ५० व ६० शब्द प्रति मिनिट) जे उमेदवार उत्तीर्ण होणार आहेत त्यांना  रु.६,५००/- प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य मान्य असेल.

2.  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची ऑनलाईन लघुलेखन (मराठी / हिंदी ६०, ८०, १०० व १२० शब्द प्रति मिनिट तसेच, इंग्रजी लघुलेखन ६०, ८०, १००, १२०, १३०, १४०, १५० व १६० शब्द प्रति मिनिट) जे उमेदवार परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना रु.५,३००/- प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य मान्य असेल.

3. अमृत संस्थे मार्फत प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य  लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक अकाउंट मध्ये थेट जमा केले जाईल.

4. या व्यतिरिक्त कोणतेही शुल्क लाभासाठी मान्य राहणार नाही.

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पूर्णपणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

Amrut Yojana Typing Application | संगणक टंकलेखन व लघुलेखन प्रशिक्षण योजना अर्ज:

पात्र उमेदवारांनी www.mahaamrut.org.in या वेबसाईटवरून अर्ज करावा.

अर्जासोबत आवश्यक सर्व कागदपत्रे अपलोड करावेत. अर्जाची एक प्रत आवश्यक कागदपत्रांसह सेल्फ अटेस्टेड करून दिलेल्या मुदतीमध्ये अमृतच्या पुणे येथील ऑफिसला  पाठविणे आवश्यक राहील.

अर्ज करण्याची लिंक : येथे क्लिक करा.

उमेदवारांचे-स्वयंघोषणापत्र : येथे क्लिक करा

संस्थांचालकांचे-स्वयंघोषणपत्र : येथे क्लिक करा.

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment