Atal Pension Yojana | अटल पेंशन योजना | सरकारी योजना| Sarkari Yojana| Government schemes 2025 | Pension Schemes
अटल पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन देण्यात येत असून ही पेंशन त्या व्यक्तीने जमा केलेल्या वर्गणी नुसार आणि वेळेनुसार मिळते. अटल पेंशन योजनेअंतर्गत वर्गणीच्या प्रमाणामध्ये १००० रुपये,२००० रुपये,३००० रुपये,४००० रुपये,५००० रुपये अशाप्रकारे साठ वर्ष वय झाल्यानंतर पेंशन मिळेल. अटल पेन्शन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान वय 18 वर्ष आणि कमाल वय 40 वर्ष असेल. 1 जून 2015 पासून अटल पेंशन योजना ही कार्यान्वित आहे. आजच्या ब्लॉगमध्ये आपण अटल पेंशन योजनेचे फायदे, पात्रता तसेच यामध्ये सहभागी होण्यासाठी वय आणि इतरही माहिती बघणार आहोत…
Atal Pension Yojana | अटल पेंशन योजना | सरकारी योजना| Sarkari Yojana| Government schemes 2025 | Pension Schemes
Table of Contents
Atal Pension Yojana
Atal Pension Yojana Benefits | अटल पेंशन योजनेचे फायदे :
अटल पेन्शन योजनेअंतर्गत 18 ते 40 वर्ष वयोगटातील वर्गणीदार वर्गणी भरू शकतात आणि प्रतिमा 1000 ते 5000 रुपये या प्रमाणामध्ये पेन्शन वर्गणीदारांना मिळू शकते. या योजनेमध्ये वर्गणीदार जितक्या लवकर सहभागी होतील तितकी त्यांची वर्गणी कमी राहील आणि ही वर्गणी वयानुसार वाढत जाईल.
Atal Pension Yojana Eligibility | अटल पेंशन योजनेची पात्रता :
अटल पेन्शन योजना सर्व बँक खातेदारांसाठी खुली आहे.
अटल पेन्शन योजनेसाठी वयोमर्यादा 18 ते 40 वर्ष आहे.
फक्त पात्र पी आर एन धारकांना सरकारी वर्गणी दिली जाईल आणि जी पी एफ आर डी मार्फत दिली जाईल.
जर समजा वर्गणी उशिरा जमा केली तर लागणारा दंड :
अटल पेन्शन योजनेअंतर्गत सदस्य त्यांची वर्गणी मासिक हप्त्यामध्ये भरू शकतात, परंतु उशीर झाल्यास दंड घेण्याचा अधिकार असेल आणि ही रक्कम एक ते दहा रुपये दरमहा अशी असू शकते.
शंभर रुपये मासिक वर्गणीसाठी एक रुपया प्रति महिना
101 ते 500 रुपये मासिक वर्गणीसाठी दोन रुपया प्रति महिना
501 ते 1000 रुपये मासिक वर्गणीसाठी पाच रुपये प्रति महिना
1001 किंवा त्यावरील मासिक वर्गणी साठी दहा रुपये प्रति महिना
अशाप्रकारे एकत्रित करून जी काही रक्कम येईल ती एकत्रितपणे वजा केली जाईल.
जर समजा वर्गणी जमा करण्याचे बंद झाले तर पुढीलपैकी एक होऊ शकते :
सहा महिन्यांनंतर खाते फ्रीज करण्यात येईल.
बारा महिन्यानंतर खाते निष्क्रिय होईल
तर 24 महिन्यांनी खाते बंद करण्यात येईल.
महत्त्वाचे :
अटल पेन्शन योजनेअंतर्गत वयाच्या साठाव्या वर्षी संबंधित सदस्य निवृत्तीवेतनाची मागणी करू शकतात.
अटल पेन्शन योजने मधून साठ वर्षांपूर्वी बाहेर पडणे अशक्य आहे परंतु काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये जसे की लाभार्थ्याचा आजाराने किंवा काही आकस्मिक कारणाने मृत्यू होणे अशावेळी शक्य होईल.
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत 15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत
पुढे योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी, वर्गणीचे टप्पे तसेच ठराविक मासिक पेन्शन आणि वर्गणी दाराच्या वारसाला मिळणारी जमा राशी हे टेबल फॉरमॅटमध्ये दिलेले आहे :
निवृत्ती वेतन १००० रुपये हवे असल्यास
योजनेत सहभागी होण्याचे वय
वर्गणी भरावयाचे एकूण वर्ष
मासिक वर्गणी रुपयात
वर्गणीदार किंवा त्याच्या पत्नीला मिळणारे निवृत्ती वेतन रुपयांमध्ये