Biodegradable plates manufacturing business | बायोडिग्रेडेबल प्लेट्स बनवण्याचा व्यवसाय –
आजच्या ब्लॉगमध्ये बायोडिग्रेडेबल प्लेट्स बनवण्याचा व्यवसाय ( Biodegradable plates manufacturing business ) कसा सुरू करायचा याबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. प्लास्टिक पासून किंवा इतर मटेरियल पासून बनणाऱ्या प्लेट्स किंवा इतर वस्तू आरोग्यासाठी तसेच पर्यावरणासाठी घातक असतात परंतु त्या ऐवजी बायोडिग्रेडेबल प्लेट्स वापरल्या तर अशावेळी आरोग्यासाठी सुद्धा या प्लेट्स चांगल्या आहेत आणि इको फ्रेंडली सुद्धा असतात. हल्ली अरेकाच्या पानांपासून बनवल्या जाणाऱ्या प्लेट्स आकर्षण ठरत आहेत, या प्लेट्स दिसायला सुद्धा अतिशय सुरेख दिसतात त्यासोबतच इको फ्रेंडली असून आरोग्यासाठी सुद्धा हानिकारक नाहीत.
Biodegradable plates manufacturing business | बायोडिग्रेडेबल प्लेट्स बनवण्याचा व्यवसाय –
– बायोडिग्रेडेबल प्लेट्स अगदी सहजपणे कुजतात ( decompose ).
– बायोडिग्रेडेबल प्लेट्स केमिकल फ्री असतात.
– बायोडिग्रेडेबल प्लेट्स वजनाने हलक्या असतात, त्यामुळे हाताळण्यास सुद्धा सोपे पडते. त्यामुळेच या प्लेट्स प्रवासामध्ये किंवा इव्हेंटच्या वेळी कॅरी करणे सोयीस्कर ठरते.
– बायोडिग्रेडेबल प्लेट्स विविध व्हरायटीज मध्ये उपलब्ध आहेत जसे की सर्क्युलर प्लेट्स, कंपार्टमेंट प्लेट्स, बाऊल्स आणि इतरही.
असे विविध फायदे असल्याकारणाने बायोडिग्रेडेबल प्लेट्स बनवण्याचा व्यवसाय सुरू करणे फायदेशीर ठरू शकते.
जाणून घेऊयात या व्यवसायाबद्दल अधिक माहिती…
बायोडिग्रेडेबल प्लेट्स बनवण्यासाठी आवश्यक कच्चामाल | raw material required for biodegradable plates –
– अरेकाची पाने ( areca leaves ) बायोडिग्रेडेबल प्लेट्स बनवण्यासाठी वापरली जातात.
Process | बायोडिग्रेडेबल प्लेट्स बनवण्याची प्रक्रिया –
– अरेकाची पाने वॉशिंग सेंटर मध्ये नेऊन हाय प्रेशर वर व्यवस्थित रित्या वॉश केली जातात.
– आता ही पाने सूर्यप्रकाशामध्ये व्यवस्थितरित्या कोरडी केली जातात, त्यामध्ये मॉईश्चर राहणार नाही याची काळजी घेतली जाते.
– ही पाने सुकल्यानंतर या पानांचे निरीक्षण केले जाते आणि ज्या पानांवर काळे डाग किंवा इतर काही डिफेक्ट आहे ती पाने वेगळी केली जातात. थोडक्यात, खराब पाने वेगळी केली जातात.
– त्यानंतर ही पाने प्रोडक्शन डिपार्टमेंट मध्ये नेली जातात. मशीनला आवश्यक डाय माउंट केली जाते. यामध्ये विविध प्रकार येतात :
सिंगल डाय, डबल डाय, ट्रिपल डाय.
आपल्या आवश्यकतेनुसार आपण योग्य मशीन वापरू शकतो.
– या डाय योग्य तापमानावर हिट केल्या जातात आणि त्यानंतर मशीन मध्ये अरेकाचे पान ठेवले जाते आणि हवे असणाऱ्या आकारामध्ये कट केले जाते.
– तयार झालेल्या कटलरी किंवा प्लेट्स इन्स्पेक्शन करून कॉन्टिटी मध्ये व्यवस्थित रित्या पॅक करून मार्केटमध्ये विकण्यासाठी अशा रीतीने तयार असतात.
Machines required for Biodegradable plates manufacturing business | बायोडिग्रेडेबल प्लेट्स बनवण्यासाठी आवश्यक मशीन आणि उपकरणे –
बायोडिग्रेडेबल प्लेट्स बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी आवश्यक जागा –
– 1300 ते 1500 स्क्वेअर फुट ( हा व्यवसाय दोन मशीन सोबत सुरू केल्यास )
– 800-1000 स्क्वेअर फिट जागा ( हा व्यवसाय एका मशीन सोबत सुरू केल्यास )
इलेक्ट्रिक लोड कनेक्शन –
– दोनमशीन साठी 12 KW इलेक्ट्रिक लोड कनेक्शन आवश्यक असेल.
– परंतु जर आपण एका मशीन सोबत हा व्यवसाय सुरू केला तर 5-7 kw इलेक्ट्रिक लोड कनेक्शन आवश्यक असेल.
बायोडिग्रेडेबल प्लेट्स बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक गुंतवणूक | investment required for biodegradable plates making business –
बायोडिग्रेडेबल प्लेट्स बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी अंदाजे 6 ते 8 लाख रुपये गुंतवणूक लागू शकते.
Manpower| आवश्यक मनुष्यबळ –
बायोडिग्रेडेबल प्लेट्स बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 3 ते 5 व्यक्तींची आवश्यकता असेल.
नफा | profit margin for biodegradable plates –
– 10-15%
* बायोडिग्रेडेबल प्लेट्स बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी गुंतवणूक ही आपण हा व्यवसाय किती मोठ्या प्रमाणावर सुरू करत आहोत म्हणजेच आपण किती मशीन विकत घेत आहोत तसेच लागणारी जागा ,मनुष्यबळ यावर अवलंबून असेल.
बायोडिग्रेडेबल प्लेट्स बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारे आवश्यक लायसन्स | licence required for biodegradable plates making business –
-जीएसटी
– उद्यम
बायोडिग्रेडेबल प्लेट्स बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा इतर कुठलाही व्यवसाय सुरू करण्यासाठी आपण सरकारतर्फे चालवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतो.
अशा रीतीने बायोडिग्रेडेबल प्लेट्स बनवण्याचा व्यवसाय हा सुरू केला जाऊ शकतो.