BSF Bharti 2025 | हेड कॉन्स्टेबल (RO & RM) भरती 2025| १०वी १२वी पास विध्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी
🔹 BSF Bharti 2025 महत्वाच्या तारखा
- ऑनलाईन अर्जाची सुरुवात: 24 ऑगस्ट 2025 (रात्री 11:00 वाजता)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 सप्टेंबर 2025 (रात्री 11:59 वाजता)
अर्ज करण्याची पद्धत: फक्त ऑनलाईन – https://rectt.bsf.gov.in
🔹 BSF Bharti 2025 पदांची माहिती व पगारश्रेणी
- पद:
- हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) – HC(RO)
- हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) – HC(RM)
- पगारश्रेणी: लेव्हल-4 (₹25,500 – ₹81,100, सातवा वेतन आयोगानुसार) + विविध भत्ते (DA, HRA, प्रवास भत्ता, रेशन मनी, LTC, युनिफॉर्म इ.)
सेवा अटी: उमेदवाराची नेमणूक भारतातील कुठेही अथवा परदेशात केली जाऊ शकते.
🔹 रिक्त पदे
एकूण पदे: 1,121
यात थेट प्रवेश, माजी सैनिक (10%), सहानुभूती नियुक्ती (5%), आणि विभागीय LDCE (25%) आरक्षण समाविष्ट आहे.
👉 पुरुष व महिला दोन्ही अर्ज करू शकतात.
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.
BSF Bharti 2025 पात्रता
1. शैक्षणिक पात्रता
- HC(RO):
- 12 वी उत्तीर्ण (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित – एकूण 60% गुण)
किंवा
- 10 वी उत्तीर्ण + 2 वर्षांचा ITI (Radio/TV, Electronics, COPA, Data Entry, General Electronics इ.)
- HC(RM):
- 12 वी उत्तीर्ण (PCM – 60% गुण)
किंवा
- 10 वी उत्तीर्ण + 2 वर्षांचा ITI (Electronics, Fitter, IT, Hardware, Networking, Data Entry इ.)
2. BSF Bharti 2025 वयोमर्यादा (23.09.2025 पर्यंत)
- UR: 18 – 25 वर्षे
- OBC: 18 – 28 वर्षे
- SC/ST: 18 – 30 वर्षे
👉 माजी सैनिक, सरकारी कर्मचारी, BSF कर्मचारी (LDCE), विधवा/घटस्फोटित महिला, 1984 दंगल पीडित यांना वयोमर्यादेत सवलत लागू आहे
🔹 शारीरिक पात्रता
पुरुष उमेदवारांसाठी:
- उंची: 168 से.मी. (आदिवासी/डोंगराळ भागासाठी सूट)
- छाती: 80–85 से.मी. (ST/आदिवासींसाठी सूट)
वजन: उंचीनुसार
महिला उमेदवारांसाठी:
- उंची: 157 से.मी. (आदिवासी/डोंगराळ भागासाठी सूट)
- छाती: लागू नाही
- वजन: उंचीनुसार
🔹 BSF Bharti 2025 निवड प्रक्रिया
- पहिला टप्पा – शारीरिक चाचणी (PST & PET)
- पुरुष:
- 1.6 किमी धाव – 6.5 मिनिटांत
- लांब उडी – 11 फूट (3 संधी)
- उंच उडी – 3.5 फूट (3 संधी)
- महिला:
- 800 मीटर धाव – 4 मिनिटांत
- लांब उडी – 9 फूट
- उंच उडी – 3 फूट
माजी सैनिक व LDCE उमेदवारांना सूट.
- दुसरा टप्पा – संगणक आधारित परीक्षा (CBT)
- कालावधी: 2 तास
- प्रश्न: 100 MCQ (200 गुण)
- भौतिकशास्त्र: 40 प्रश्न (80 गुण)
- गणित: 20 प्रश्न (40 गुण)
- रसायनशास्त्र: 20 प्रश्न (40 गुण)
- इंग्रजी व सामान्यज्ञान: 20 प्रश्न (40 गुण)
- निगेटिव्ह मार्किंग: चुकीच्या उत्तराला -0.25 गुण
- पात्रता गुण:
- UR/OBC/EWS: 38%
- SC/ST: 33%
सहानुभूती कोटा: 20%
- तिसरा टप्पा – कागदपत्र पडताळणी व इतर चाचण्या
- HC(RO): डिक्टेशन टेस्ट (50 गुण) + Paragraph Reading (फक्त पात्रतेसाठी)
- HC(RM): फक्त कागदपत्र पडताळणी
- वैद्यकीय तपासणी (DME/RME)
🔹 अंतिम गुणवत्ता यादी (Final Merit)
- HC(RO): CBT (200) + Dictation (50) = 250 गुण
- HC(RM): CBT (200 गुण)
- प्रत्येक श्रेणी, पद व कोट्यासाठी स्वतंत्र यादी.
Tie-breaking नियम: जास्त गुण → वय जास्त → नावाचे पहिले अक्षर → PCM मध्ये जास्त गुण → ITI मध्ये जास्त गुण.
✅ महत्वाच्या सूचना
- उमेदवाराला दोन्ही पदांसाठी (RO व RM) अर्ज करण्याची परवानगी आहे, पण प्राधान्यक्रम द्यावा लागेल.
- कोणतीही वेटिंग लिस्ट तयार केली जाणार नाही.
- सर्व अपडेट्स फक्त BSF अधिकृत वेबसाइट व BSF भरती पोर्टल वर उपलब्ध असतील.
🔹 अर्ज फी (Examination Fee)
- UR/OBC/EWS पुरुष उमेदवार: ₹100/- प्रति पद
- SC/ST, महिला उमेदवार, BSF कर्मचारी, माजी सैनिक, Compassionate Appointment: फी नाही
- CSC Service Charge: ₹59/- (सर्व उमेदवारांसाठी अनिवार्य)
- पेमेंट पद्धती:
- Net Banking
- Debit/Credit Card
- Common Service Centre (CSC)
👉 फी एकदा भरल्यावर परत केली जाणार नाही.
✅ सारांश:
- HC(RO) साठी अंतिम मेरिट = CBT + Dictation Test गुण
- HC(RM) साठी अंतिम मेरिट = फक्त CBT गुण
- निवड प्रक्रियेत सर्व टप्पे (PST, PET, CBT, Documents, Medical) पार करणे अनिवार्य.
Mira Bhayandar Municipal Corporation Bharti | मिरा-भाईंदर महानगरपालिका गट-क संवर्गातील ३५८ पदांसाठी भरती