4 business ideas under Rs.10,000 | 4 असे व्यवसायिकीचे दहा हजार किंवा त्यापेक्षा कमी गुंतवणुकीत सुरू केले जाऊ शकतात…|Best Business opportunities 2024 –

4 business ideas under Rs.10,000 | 4 असे व्यवसायिकीचे दहा हजार किंवा त्यापेक्षा कमी गुंतवणुकीत सुरू केले जाऊ शकतात…| Business ideas 2024 –

      बऱ्याच व्यक्तींना काहींना काहीतरी व्यवसाय सुरू करावा असे वाटते परंतु त्यांच्याकडे भांडवलाची कमतरता असल्यामुळे नेमकी कोणता व्यवसाय सुरू करावा हा प्रश्न उभा राहतो. आजच्या लेखामध्ये आपण असे चार व्यवसाय बघणार आहोत की जे दहा हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी ( business ideas under Rs. 10,000 गुंतवणुकीमध्ये सुरू केले जाऊ शकतात. चला तर जाणून घेऊयात असे कोणकोणते व्यवसाय ( business ideas under Rs.10,000 ) आहेत)…

Business ideas under Rs.10000 | दहा हजार रुपयांपेक्षा कमी गुंतवणुकीमध्ये सुरू करता येणारे व्यवसाय –

4 business ideas under Rs.10,000

१. लोणच्याचा व्यवसाय –  

– भारतीय लोकांना जेवणासोबत एक किंवा विविध प्रकारचे लोणचे किंवा चटण्याचा चाखायला नक्की आवडते.

– परंतु प्रत्येक कुटुंब स्वतःसाठी घरीच लोणचे बनवेल असे नाही किंवा हल्लीच्या धावपळीच्या जगामध्ये असे प्रत्येकालाच शक्य होत नाही. 

– म्हणूनच लोणच्याचा व्यवसाय हा फायदेशीर ठरू शकतो आणि दहा हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी खर्चामध्ये हा व्यवसाय सुरू केला जाऊ शकतो. 

– यासाठी आपल्याला आवश्यकता आहे ती ताजा कच्चा मालाची, परफेक्ट रेसिपी आणि काही पॅकेजिंग मटेरियलची…

– वर्ड ऑफ माऊथ: एका ग्राहकाला आपल्या लोणच्याची चव आवडली तर नक्कीच दुसऱ्या  ग्राहकाला सुद्धा त्याबद्दल तो ग्राहक सांगतो आणि अशाप्रकारे आपली मार्केटिंग आपोआपच होते परंतु त्यासोबतच सोशल मीडिया मार्केटिंग ही पद्धत सुद्धा लोणच्याच्या व्यवसायासाठी आपण वापरू शकतो. 

– लोणच्याचा व्यवसाय करत असताना आपण लोणचे तयार करून व्यवस्थित रित्या पॅकेजिंग करून ते विकू शकतो किंवा ग्राहकाच्या ऑर्डर नुसार लोणचे बनवून त्यांना विक्री करू शकतो.

– मार्केटमध्ये मिळणाऱ्या लोणच्यापेक्षा घरगुती पद्धतीने बनवलेले लोणचे बऱ्याच लोकांना आवडते त्यामुळे हा व्यवसाय फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो. 

२.ब्लॉगिंग –

– हल्ली जास्त चर्चेमध्ये असणारा व्यवसाय म्हणजे ब्लॉगिंग करणे. 

– ब्लॉगिंग आपण वैयक्तिक रित्या सुरू करू शकतो किंवा अशा विविध कंपन्या आहेत की ज्यांना ब्लॉगरची आवश्यकता असते, ब्लॉगर्स मनोरंजक लेख किंवा कथा तयार करू शकतात तसेच कंपनीच्या आवश्यकतेनुसार विविध विषयांवर ब्लॉग लिहू शकतात. 

– जर एखाद्या व्यवसायासाठी आपण ब्लॉग लिहून देत असू तर तो व्यवसाय ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये त्याची मदत होते. 

– म्हणूनच इंटरनेटच्या युगामध्ये ब्लॉगिंग हा यशस्वी व्यवसायाचा कणा बनला आहे असे आपण म्हणू शकतो. 

– दहा हजार रुपयांपेक्षा कमी खर्चामध्ये हा व्यवसाय सुरू केला जाऊ शकतो यासाठी गरज आहे ती उत्तम लिखाण कौशल्य असण्याची…

३. टिफिन सेवा –

– दहा हजार रुपये पेक्षा कमी गुंतवणुकीमध्ये सुरू करता येणाऱ्या व्यवसायामध्ये टिफिन सेवा हा व्यवसाय आवर्जून येतो. 

– हल्ली बरेच लोक कामानिमित्त बाहेरगावी राहतात तसेच शिक्षणासाठी सुद्धा बरेच विद्यार्थी बाहेरगावी राहतात, त्यामुळे यांना नक्कीच घरगुती जेवणाची आवश्यकता असते. 

– हॉटेल किंवा रेस्टॉरंट मधून जेवण विकत घेण्यापेक्षा ज्यांना दैनंदिन जेवणाची आवश्यकता आहे ते लोक घरगुती अन्न खाणे पसंत करतात त्यामुळे नक्कीच टिफिन सेवा हा व्यवसाय फायदेशीर ठरतो. 

– टिफिन सेवा या व्यवसायामध्ये आपल्या जेवणाची गुणवत्ता आणि चव उत्तम ठेवणे खूप महत्त्वाचे आहे.

– टिफिन सेवा हा व्यवसाय दहा हजार रुपये पेक्षा कमी रकमेमध्ये नक्कीच सुरू केला जाऊ शकतो अगदी आपल्या स्वयंपाक घरामध्ये उपलब्ध असलेल्या सामग्री पासून सुद्धा हा व्यवसाय सुरू केला जाऊ शकतो. 

४ . ट्युशन क्लासेस

– पूर्वीपेक्षा हल्ली विद्यार्थी ट्युशन क्लासेस मोठ्या प्रमाणावर लावतात. 

– ट्युशन क्लासेस हा व्यवसाय सुद्धा दहा हजार रुपयांपेक्षा कमी गुंतवणुकीमध्ये सुरू केला जाऊ शकतो. 

– आपण ट्युशन क्लासेस हे शैक्षणिक अभ्यासक्रमाचे सुरू करू शकतो किंवा आपल्याकडे जर इतर कौशल्य असतील उदाहरणार्थ , पाककला, चित्रकला, गायन, नृत्य या प्रकारे तरीसुद्धा याचे क्लासेस आपण घेऊ शकतो. 

– ट्युशन क्लासेस सुरू करण्यासाठी आपल्याकडे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे, ट्युशन क्लास हे आपल्या घरामधून सुद्धा आपण सुरू करू शकतो. 

– आपल्याकडे चांगले ज्ञान आणि संवाद कौशल्य असतील तर नक्कीच आपल्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्याद्वारे दिले जाणारे नॉलेज चांगल्या पद्धतीने कळू शकते आणि हेच विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्या क्लासेस बद्दल सांगतात आणि अशा रीतीने आपली मार्केटिंग होते त्यासोबतच सोशल मीडिया मार्केटिंग ही पद्धत सुद्धा आपण वापरू शकतो. 

      अशा रीतीने हे काही व्यवसाय आहेत की जे दहा हजार रुपयांपेक्षा कमी गुंतवणुकीमध्ये ( business ideas under Rs.10,000 ) आपण सुरू करू शकतो. कुठलाही व्यवसाय सुरू करत असताना सातत्य आणि मेहनत खूप महत्त्वाची आहे.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Leave a Comment