मुलीच्या शिक्षणासाठी 15 ते 20 लाख रुपये | Chandan Kanya Yojana | Best Government schemes 

मुलीच्या शिक्षणासाठी 15 ते 20 लाख रुपये | Chandan Kanya Yojana | Best Government schemes 

      महाराष्ट्र सरकार तसेच भारत सरकार नागरिकांच्या हितासाठी विविध योजना राबवत असतात. आज अशा एका योजनेबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत की जी योजना बऱ्याच नागरिकांना माहिती नसेल.आजच्या लेखांमध्ये आपण त्या योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेचे नाव आहे , चंदन कन्या योजना

. चला तर जाणून घेऊयात या योजनेबद्दल अधिक माहिती…

Chandan Kanya Yojana | चंदन कन्या योजना –

Chandan Kanya Yojana | चंदन कन्या योजना माहिती –

– ज्या शेतकऱ्यांना मुलगी आहे अशा शेतकऱ्यांना त्यांच्या शेताच्या बांधावर चंदनाची लागवड करण्याकरता निशुल्क वीस रोपांचे वाटप करण्यात येते.( आता तालुकास्तरावर शंभर चंदन  रोपे मिळू शकतात )

– वाटप केलेल्या चंदनाच्या झाडांची देखभाल कशा रीतीने करायची याबद्दल मोफत मार्गदर्शन केले जाते. 

– चंदन लागवड केलेली ही रोपे एक वर्षाची पूर्ण झाल्यानंतर त्यांची नोंदणी सातबारावर घेण्यासाठी मोफत मदत केली जाते. 

–  त्याचबरोबर शासनामार्फत चंदनाच्या झाडांची वाढ पूर्ण झाल्यानंतर त्या झाडांची तोडणी तसेच वाहतूक परवाना यासाठी सुद्धा मदत केली जाते. 

– आपल्या राज्यामध्ये बरेच लोक आर्थिक दृष्ट्या गरीब आहेत आणि त्यामुळे बरेचसे लोक त्यांच्या मुलींचे शिक्षण करू शकत नाही परंतु बऱ्याच अशा मुली असतात की ज्या बुद्धिवान असून सुद्धा शिक्षणापासून दूर राहतात परंतु या योजनेअंतर्गत त्यांना मदत मिळू शकते ते कसे बघूया..

– जे चंदनाची झाडे शेताच्या बांधावर ती लावलेली असतात त्या झाडांचा ( किमान २० झाडे )  बारा वर्षे व्यवस्थित रित्या सांभाळ केल्यानंतर मुलीच्या शिक्षणासाठी 15 ते 20 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळू शकते.

चंदन कन्या योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ | Benefits of Chandan Kanya Yojana –

– चंदन लागवडीसाठी मोफत मार्गदर्शन मिळते. 

– तालुकास्तरावर मुलीच्या नावे 100 चंदन झाडांची लागवड करण्यासाठी रोपे मिळतील. 

– लागवड केल्यानंतर एक वर्षांनी चंदनाच्या झाडांची नोंदणी सातबारावर करण्यासाठी मोफत मदत मिळते. 

– तसेच चंदनाच्या झाडांची वाढ व्यवस्थित रित्या झाल्यानंतर झाडाची तोडणी तसेच वाहतूक परवाना काढण्याकरता सुद्धा मदत मिळते. 

– तसेच बांधावर आणि शेतामध्ये झाडे लागवडीसाठी असलेले सामाजिक वनीकरण विभागाच्या अनुदान योजनेचा फायदा मिळवण्यासाठी मार्गदर्शन मिळेल.

– महाराष्ट्र मधील ग्रोवर फार्मर्स प्रोडूसर कंपनी मार्फत चंदन झाडाची चांगल्या भावाने विक्री करण्यासाठी मदत मिळेल.

– ज्या तालुक्यांमध्ये कमीत कमी वीस शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे अशा ठिकाणी तालुकास्तरावर रोपे मिळतील. 

– जे चंदनाची झाडे शेताच्या बांधावर ती लावलेली असतात त्या झाडांचा ( किमान २० झाडे )  बारा वर्षे व्यवस्थित रित्या सांभाळ केल्यानंतर मुलीच्या शिक्षणासाठी 15 ते 20 लाख रुपये मिळू शकते.

* चंदन कन्या योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी प्रति शेतकरी १५०० रुपये याप्रमाणे सहभाग शुल्क असे परंतु बऱ्याच शेतकऱ्यांची वीस पेक्षा जास्त चंदन झाडे लावण्याची इच्छा असल्याकारणाने आता हे शुल्क ६५०० रुपये करण्यात आले आहे.( शंभर चंदनाच्या झाडांची नोंदणी करण्याची सुविधा दिली जाते.)

चंदन कन्या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे | Documents required for Chandan Kanya Yojana –

– मुलीचे आधार कार्ड किंवा जन्मदाखला 

– वडिलांचे आधार कार्ड 

– रहिवासी दाखला 

– मुलीचा पासपोर्ट साईज फोटो 

– वडिलांचा फोटो 

– जमिनीचा सातबारा उतारा व ८ अ

– शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र 

Chandan Kanya Yojana Terms and conditions | चंदन कन्या योजना नियम आणि अटी –

– चंदन कन्या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

– चंदन कन्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी असणे आवश्यक आहे म्हणजेच स्वतःच्या मालकीची शेत जमीन असणे आवश्यक आहे. 

– तसेच चंदन कन्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये मुलगी असणे आवश्यक आहे आणि या मुलीचे वय 1 ते 10 वर्षा दरम्यान असावे. 

– या योजनेमध्ये सहभाग घेऊ इच्छित असणाऱ्या शेतकऱ्यांनी चंदनाच्या झाडांचा बारा वर्ष व्यवस्थित रित्या सांभाळ करणे अनिवार्य असेल.

– चंदन कन्या योजनेचा लाभ शेतकऱ्याच्या मुलींनाच मिळणार आहे.

चंदन कन्या योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन –

चंदन कन्या योजनेसाठी नाव नोंदणी संस्थेच्या मोबाईल ॲप द्वारे करू शकतो.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Leave a Comment