Corteva Agriscience Scholarship Program 2024-25 | 50000 रुपयांपर्यंत स्कॉलरशिप मिळवण्याची संधी | Best Scholarships 2024 –

Corteva Agriscience Scholarship Program 2024-25 | 50000 रुपयांपर्यंत स्कॉलरशिप मिळवण्याची संधी | Best Scholarships 2024 –

    आजच्या ब्लॉगमध्ये आपण Corteva Agriscience Scholarship Program बद्दल माहिती जाणून घेणार आहोत, या स्कॉलरशिप अंतर्गत शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. अकरावी बारावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या तसेच ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करत असलेल्या मुलींना या स्कॉलरशिपचा लाभ मिळणार आहे. जाणून घेऊयात या स्कॉलरशिप साठी नक्की पात्रता काय आहे, या स्कॉलरशिप मार्फत नक्की किती आर्थिक लाभ मिळणार आहे तसेच कोणकोणती कागदपत्रे या स्कॉलरशिपसाठी लागतात व इतर माहिती…

Corteva Agriscience Scholarship Program 2024-25 | 50000 रुपयांपर्यंत स्कॉलरशिप मिळवण्याची संधी | Best Scholarships 2024 –

Table of Contents

Corteva Agriscience Scholarship Program 2024-25 | कोर्टेव्हा ऍग्रिसायन्स स्कॉलरशिप प्रोग्राम 2024-25 – 

Corteva Agriscience Scholarship Program for Postgraduate Students 2024-25 | पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी कोर्टेव्हा कृषी विज्ञान शिष्यवृत्ती प्रोग्रॅम –

पात्रता :

– भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR – Indian Council of Agricultural Research) द्वारे मान्यताप्राप्त एग्रीकल्चर, बायोटेक्नॉलॉजी, एंटोमोलोजी, ब्रेडिंग इत्यादी सारख्या स्ट्रीम मधील पदव्युत्तर (MBA/M.Sc./M.Tech.) किंवा पीएचडी अभ्यासक्रमाच्या कोणत्याही वर्षातील महिला विद्यार्थ्यांसाठी ही स्कॉलरशिप खुली आहे ).

– अर्जदार विद्यार्थिनी सरकारी महाविद्यालयात शिकत असाव्यात.

– भारतभरातील विद्यार्थी सहभागी होण्यास पात्र आहेत.

– अर्जदाराचे एकूण वार्षिक कौटुंबिक उत्पन्न  6,00,000 रुपये किंवा त्याहून कमी असणे आवश्यक आहे.

– Corteva Agriscience आणि Buddy4Study च्या कर्मचाऱ्यांची मुले या स्कॉलरशिप साठी पात्र नाहीत.

फायदे :

 50,000 हजार रुपयांची शिष्यवृत्ती. 

टीप: 

– शिष्यवृत्ती निधीचा उपयोग फक्त शैक्षणिक खर्चासाठी केला जाऊ शकतो, ज्यामध्ये शिक्षण शुल्क, वसतिगृह शुल्क, भोजन, प्रवास, पुस्तके, स्टेशनरी, रिसर्च वर्क इत्यादींचा समावेश आहे.

– स्कॉलरशिप फक्त प्रायोजित अभ्यासक्रमासाठी उपयोगात आणली जाईल आणि इतर कोणत्याही हेतूसाठी नाही असे हमीपत्र विद्यार्थ्यांनी देणे आवश्यक असेल.

कागदपत्रे –

– सरकार मार्फत जारी केलेला ओळखीचा पुरावा (आधार कार्ड/मतदार ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायसन्स/पॅन कार्ड) 

– चालू वर्षाचा प्रवेश पुरावा (प्रवेश पत्र/संस्थेचे ओळखपत्र/बोनाफाईड प्रमाणपत्र) 

– अर्जदाराचे बँक अकाउंट डिटेल्स

– अर्जदाराचा फोटो

टीप : 

विद्यार्थ्यांनी त्यांच्या बँक अकाउंट मध्ये निधीचे वितरण केल्यानंतर शिक्षण शुल्काच्या पावत्या देणे आवश्यक असेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2024

Corteva Agriscience Scholarship Program for Undergraduate Students 2024-25 | अंडरग्रेजुएट विद्यार्थ्यांसाठी कोर्टेव्हा कृषी विज्ञान शिष्यवृत्ती प्रोग्रॅम – 

पात्रता – 

– भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) द्वारे मान्यताप्राप्त कृषी-संबंधित अभ्यासक्रमांमध्ये पदवीच्या कोणत्याही वर्षात शिकणाऱ्या महिला विद्यार्थ्यांसाठी ही स्कॉलरशिप खुली आहे. 

– सरकारी महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत. 

– Corteva Agriscience मार्फत स्पेसिफाय केलेल्या निवडक ठिकाणांवरील विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत.

– अर्जदाराचे एकूण वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 6,00,000 रुपये किंवा त्याहून कमी असणे आवश्यक आहे. 

– Corteva Agriscience आणि Buddy4Study च्या कर्मचाऱ्यांची मुले या स्कॉलरशिप साठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.

फायदे : 

पंचवीस हजार रुपयांची स्कॉलरशिप. 

टीप: 

स्कॉलरशिप निधीचा उपयोग फक्त शैक्षणिक खर्चासाठी केला जाऊ शकतो, यामध्ये शिक्षण शुल्क, वसतिगृह शुल्क, भोजन, प्रवास, पुस्तके, स्टेशनरी, संशोधन कार्य इत्यादींचा समावेश आहे. शिष्यवृत्तीचा निधी फक्त प्रायोजित अभ्यासक्रमासाठी वापरले जातील आणि इतर कोणत्याही हेतूसाठी नाही असे हमीपत्र विद्यार्थ्यांनी देणे आवश्यक असेल.

कागदपत्रे –

–  सरकारने जारी केलेला ओळखीचा पुरावा (आधार कार्ड/मतदार ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायसन्स/पॅन कार्ड) 

– चालू वर्षीय प्रवेश पुरावा (प्रवेश पत्र/संस्थेचे ओळखपत्र/बोनाफाईड प्रमाणपत्र) 

– अर्जदाराचे बँक अकाउंट डिटेल्स 

– अर्जदाराचा फोटो 

 टीप:

विद्यार्थ्यांनी त्यांच्या बँक अकाउंटमध्ये निधीचे वितरण केल्यानंतर शिक्षण शुल्काच्या पावत्या देणे आवश्यक आहे.

Corteva Agriscience Scholarship Program for School Students 2024-25 | शालेय विद्यार्थ्यांसाठी कोर्टेव्हा ऍग्रिसायन्स शिष्यवृत्ती प्रोग्रॅम –

पात्रता –

– STEM विषयांसह इयत्ता 11 आणि 12 मधील महिला विद्यार्थ्यांसाठी खुले आहे. 

– सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत. 

– विद्यार्थ्यांनी मान्यताप्राप्त बोर्ड (CBSE, ICSE, आणि राज्य बोर्ड) अंतर्गत शिक्षण घेतले पाहिजे.

– Corteva Agriscience मार्फत स्पेसिफाय केलेल्या निवडक ठिकाणांवरील विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत.

– अर्जदाराचे एकूण वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 6,00,000 रुपये किंवा त्याहून कमी असणे आवश्यक आहे. Corteva – Agriscience आणि Buddy4Study च्या कर्मचाऱ्यांची मुले या स्कॉलरशिप साठी पात्र नाहीत.

फायदे : 

 १०,००० रुपयांची शिष्यवृत्ती.

टीप: 

स्कॉलरशिप निधीचा उपयोग फक्त शैक्षणिक खर्चासाठी केला जाऊ शकतो, यामध्ये शिक्षण शुल्क, वसतिगृह शुल्क, भोजन, प्रवास, पुस्तके, स्टेशनरी, संशोधन कार्य इत्यादींचा समावेश आहे. शिष्यवृत्तीचा निधी फक्त प्रायोजित अभ्यासक्रमासाठी वापरले जातील आणि इतर कोणत्याही हेतूसाठी नाही असे हमीपत्र विद्यार्थ्यांनी देणे आवश्यक असेल.

कागदपत्रे –

–  सरकारने जारी केलेला ओळखीचा पुरावा (आधार कार्ड/मतदार ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायसन्स/पॅन कार्ड) 

– चालू वर्षीय प्रवेश पुरावा (प्रवेश पत्र/संस्थेचे ओळखपत्र/बोनाफाईड प्रमाणपत्र) 

– अर्जदाराचे बँक अकाउंट डिटेल्स 

– अर्जदाराचा फोटो 

 टीप: विद्यार्थ्यांनी त्यांच्या बँक अकाउंटमध्ये निधीचे वितरण केल्यानंतर शिक्षण शुल्काच्या पावत्या देणे आवश्यक आहे.

Corteva Agriscience Scholarship Program 2024-25 | कोर्टेव्हा ऍग्रिसायन्स स्कॉलरशिप प्रोग्राम 2024-25 या स्कॉलरशिप बद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि यासाठी अप्लाय करण्याकरता : येथे क्लिक करा. 

स्कॉलरशिप साठी अर्ज कसा करावा ?

  • या स्कॉलरशिप साठी अर्ज करण्याकरिता वरील लिंक वर क्लिक करा. 
  • त्यानंतर apply now या ऑप्शन वर क्लिक करा.
  • नंतर तुम्ही रजिस्टरर्ड असल्यास तुमचा आयडी वापरून लॉगिन करा तसे नसेल तर तुमचा ईमेल आयडी ,मोबाईल नंबर किंवा गुगल अकाउंट च्या साह्याने रजिस्ट्रेशन करून लॉगिन करा.
  • आता एप्लीकेशन फॉर्म पेज ओपन होईल. 
  • अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरा त्यासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि फॉर्म व्यवस्थित पडताळून सबमिट करा.
जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment