दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना (DDU-GKY)| Deen Dayal Upadhyaya Grameen Kaushalya Yojana
आपल्या देशामध्ये शिक्षित तरुण-तरुणींची संख्या भरपूर आहे परंतु सर्वांनाच रोजगार उपलब्ध होतोच असे नाही त्यामुळे असंख्य तरुण-तरुणी बेरोजगार राहतात. त्यामुळेच आपल्या केंद्र सरकारने बेरोजगारांना त्यांचे कौशल्य ओळखण्यासाठी तसेच कौशल्य अधिक विकसित करण्यासाठी आणि त्या कौशल्याचा उपयोग योग्य मार्गाने करण्यासाठी विविध योजना सुरू केलेल्या आहेत. त्या योजनेपैकीच एक योजना म्हणजे दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना या योजनेबद्दलच आज आपण माहिती बघणार आहोत….
दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना (DDU-GKY) –
– ही योजना २५ सप्टेंबर २०१४ रोजी ग्रामीण युवकांच्या कौशल्य विकास आणि प्लेसमेंटसाठी सुरू करण्यात आलेली आहे,परंतु अजून सुद्धा ह्या योजनेबद्दलची माहिती बऱ्याच लोकांना नाही.
– आपल्या देशांमधील गरीब बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना सुरू केलेली आहे.
– जर युवकांना योग्यरीत्या प्रशिक्षण मिळाले आणि त्याद्वारे त्यांना रोजगार उपलब्ध करून देता आला तर नक्कीच भविष्यामध्ये देशाच्या विकास कामांमध्ये ते योगदान देऊ शकतील.
– या योजनेअंतर्गत विविध ट्रेडच्या किमान ७५ % प्रशिक्षणार्थींना नियुक्त करणे अनिवार्य आहे.
– दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण बेरोजगार तरुणांना कुशल बनवणे आणि विकास प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देणे असा आहे.
दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेचे फायदे –
· दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेमुळे बेरोजगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील तसेच ज्यांना स्वतःचे लघुउद्योग किंवा उद्योग सुरू करायचे आहे त्यांना सुद्धा योग्य ते मार्ग सापडण्यास मदत होईल.
· दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेमुळे तरुण-तरुणींना त्यांच्यामध्ये असणारे कौशल्य विकसित करण्यामध्ये तसेच नवनवीन कौशल्य शिकण्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर मदत होईल.
· दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेमुळे नक्कीच देशामधील बेरोजगारी कमी होण्यामध्ये बऱ्यापैकी मदत होऊ शकते.
· मोफत भोजन आणि निवास व्यवस्था सुद्धा प्रशिक्षण घेणाऱ्या व्यक्तींना दिली जाते.
· दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत घेतलेल्या प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र सुद्धा प्रशिक्षणार्थींना मिळणार असल्याकारणाने त्याचा फायदा देखील त्यांना नोकरी मिळवण्यामध्ये नक्कीच होईल.
दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेसाठी पात्रता / अटी –
· दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना ही फक्त दारिद्र्यरेषेखाली असणाऱ्या कुटुंबासाठीच लागू आहे.
· तसेच या योजनेसाठी १५ ते ३५ वर्ष वयोगट असणे गरजेचे आहे.
· SC/ST/महिला/PVTG/PWD साठी वयोमर्यादा अतिरिक्त ४ वर्षे दिली जाईल
· प्रशिक्षण सुरू असताना अर्जदारास कुठल्याही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही.
· तसेच जी व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करणार आहे त्या व्यक्तीच्या कुटुंबांमधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीस असल्यास अर्जदाराला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
· तसेच केंद्र किंवा राज्य सरकारने सुरू केलेले कोणतेही कौशल्य प्रशिक्षण जर अर्जदाराने घेतलेले असेल तर अशा परिस्थितीत या योजनेचा लाभ अर्जदारास दिला जाणार नाही.
दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे –
· आधार कार्ड
· पासपोर्ट आकाराचा फोटो
· शिधापत्रिका
· नागरिकत्व प्रमाणपत्र
· शिक्षण प्रमाणपत्र
· वय प्रमाणपत्र
· कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
· कुटुंबाचे बीपीएल प्रमाणपत्र
· मोबाईल नंबर
· ई – मेल आयडी
दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेसाठी अर्ज प्रक्रिया –
दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणे शक्य आहे त्यासाठी पुढील अधिकृत वेबसाईटवरून अर्ज करता येऊ शकतो.
अशाप्रकारे दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेमुळे बेरोजगार तरुण-तरुणींना स्वतःच्या पायावर उभे राहण्यामध्ये सुद्धा मदत होईल तसेच देशाच्या विकास कामांमध्ये सुद्धा त्यांचा हातभार लागेल आणि देशांमधील बेरोजगारी कमी होण्यामध्ये सुद्धा या योजनेमुळे मदत होईल.
जॉईन करा Whatsapp वर | https://whatsapp.com/channel/0029Va5dUWWD38CKDLebrs2j |
जॉईन टेलिग्राम ग्रुप | https://t.me/iconikMarathimotivation |
मला मेसेज करा | https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/ |
आपली वेबसाईट | https://iconikmarathi.com/ |
ai टूल्स साठी | https://yt.openinapp.co/iconik2 |
युट्युब | https://yt.openinapp.co/iconikMarathi |