DPIIT Internship Scheme | दहा हजार रुपये प्रति महिना इंटर्नशिप | DPIIT Internship | Best internships 2024 | DPIIT इंटर्नशिप –
आजच्या ब्लॉगमध्ये आपण डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड (DPIIT), वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय यांच्यामार्फत असणाऱ्या इंटर्नशिप ( DPIIT Internship Scheme ) बद्दल जाणून घेणार आहोत. DPIIT इंटर्नशिप ( DPIIT Internship Scheme चा फायदा ग्रॅजुएट ,पोस्ट ग्रॅजुएट तसेच रिसर्च स्कॉलर्स ह्यांना होणार आहे. DPIIT इंटर्नशिप ( DPIIT Internship Scheme ही इंटर्नशिप नक्की कुणासाठी आहे, पात्रता काय, या इंटर्नशिपचे फायदे काय यांसारखी माहिती जाणून घेऊयात…
DPIIT Internship Scheme | दहा हजार रुपये प्रति महिना इंटर्नशिप | DPIIT Internship | Best internships 2024 | DPIIT इंटर्नशिप –
Table of Contents
DPIIT Internship Scheme | DPIIT इंटर्नशिप I दहा हजार रुपये प्रति महिना इंटर्नशिप –
डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड (DPIIT), वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय यांच्यामार्फत अंडर ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट पदवी घेत असलेल्या किंवा भारतामधील किंवा परदेशामधील मान्यताप्राप्त संस्थेत/विद्यापीठामध्ये नाव नोंदणी केलेले रिसर्च स्कॉलर असलेल्या विद्यार्थ्यांकरिता ही इंटर्नशिप आयोजित करण्यात येते.
DPIIT इंटर्नशिपचा उद्देश विद्यार्थ्यांना भारत सरकारचे वर्किंग कल्चर समजून घेणे आणि विभागा अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती देणे हा आहे.
विद्यार्थी त्यांच्या आवश्यकतेनुसार कालावधी १ महिना किंवा दोन महिने किंवा तीन महिने अशाप्रकारे निवडू शकतात.
DPIIT इंटर्नशिप या इंटर्नशिप साठी फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील.
स्टायपेंड I DPIIT Internship Stipend :
इंटर्नला 10,000/- रुपये इतकी रक्कम प्रति महिना स्टायपेंड दिली जाईल.
इंटर्नशिप कालावधी पूर्ण केल्यानंतर स्टायपेंडसाठी पेमेंट प्रक्रिया सुरू केली जाईल.
इंटर्नची संख्या I No. of interns DPIIT Internship :
एका वेळी निवडलेल्या इंटर्नची जास्तीत जास्त संख्या 20 असेल.
इंटर्नशिपचा कालावधी I DPIIT Internship duration :
इंटर्नशिपचा कालावधी कमीत कमी एक महिना तर जास्तीत जास्त तीन महिने असेल.
इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर, विद्यार्थ्यांना एक्सपीरियंस सर्टिफिकेट दिले जाईल.
जे विद्यार्थी इंटर्नशिपचा आवश्यक कालावधी व्यवस्थित रित्या पूर्ण करणार नाहीत त्यांना प्रमाणपत्र किंवा स्टायपेंड दिला जाणार नाही.
– अर्ज व्यवस्थित भरला आहे का हे काळजीपूर्वक तपासून अर्ज सबमिट करा.
* डीपीआयआयटीचे DPIIT ऑनलाइन पोर्टल , प्रत्येक वर्षी १ मार्च ते ३० एप्रिल आणि १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांकडून इंटर्नशिपसाठी ( DPIIT Internship ) अर्ज प्राप्त करण्यासाठी ओपन असतील.
*1 मार्च ते 30 एप्रिल या वेळेमध्ये प्राप्त झालेले अर्ज दरवर्षी जून-ऑगस्ट या कालावधीत इंटर्नशिपसाठी विचारात घेतले जातील. मार्च-एप्रिल दरम्यान अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचा डेटाबेस ऑगस्टच्या शेवटी सर्व्हरवरून डिलीट केला जाईल.
*1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर या दरम्यान प्राप्त झालेले अर्ज दरवर्षी नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत इंटर्नशिपसाठी विचारात घेतले जातील. सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचा डेटाबेस जानेवारीच्या अखेरीस सर्व्हरवरून डिलीट केला जाईल.
DPIIT Internship Scheme | DPIIT इंटर्नशिपसाठी अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.