तुमच्याकडे कोणतीही स्कील नाहीये तर चिंता करू नका कारण, Artificial Intelligence च revolution पूर्ण जगात सुरु आहे. आणि AI हि अशी technology आहे जिच्या मदतीने खूप जे काम करण्यासाठी तासंतास लागायचे ते आता मिनिटांमध्ये आणि सोप्या पद्धतीने होऊ लागले आहेत. त्यामुळे AI च्या मदतीने आपण घरबसल्या पैसे सुद्धा कमवू शकतोय.
AI च्या मदतीने घरबसल्या लाखो रुपये कमवा व्हिडिओ एडीट करून | Earn money with AI from video editing
AI सोबत पैसे कसे कमवू शकतात?
AI च्या मदतीने पैसे कमविण्याचे अनेक मार्ग आहेत. जिथे तुम्ही फ्रीलांसिंग करून, content लिहून, सोशल मिडिया मॅनेज करून AI सोबत पैसे कमवू शकतात. पण एक असा मार्ग ज्याद्वारे तुम्ही काम करताय तर कमी वेळेत तुम्ही खूप जास्त इन्कम करू शकणार आहात ते म्हणजे व्हिडीओ एडिटिंग किंवा कंटेंट क्रिएशन या दोघी वेगेवेगळ्या गोष्टी असतील पण याच दोन गोष्टींवर काम करून तुम्ही AI सोबत घरबसल्या लाखो रुपयांपर्यंत महिना कमवू शकणार आहात.
कंटेंट क्रिएशन किंवा व्हिडीओ एडीटिंग द्वारे पैसे कसे कमवावे?
सध्या कंटेंट क्रिएशन मध्ये टॉप असणारे platform म्हणजे युट्युब आणि इंस्टाग्राम जगभराच्या जर विचार केला तर जगात सर्वात जास्त युट्युब वर असणारे लोक हे भारतात आहे. भारतात ४६ कोटी एवढी संख्या युट्युब वर असणाऱ्या युझर्सची आहे. त्यासोबतच जगात सर्वात जास्त इंस्ताग्राम वापर करणाऱ्या लोकांमध्ये भारत अव्वल आहे. भारतात एकूण २३ करोड इंस्टाग्राम युझर्स आहे. म्हणजे रोज करोडोंच्या संख्येने युझर्स युट्युब आणि इंस्टाग्राम वापरत असतात. पण तुम्ही जर लोकांसाठी काही कंटेंट क्रिएट केल तर त्याद्वारे तुम्ही पैसे कमवू शकतात. तुम्हाला व्हिडीओ मध्ये चेहरा दाखवून बोलता येत नसेल किंवा voice over सुद्धा करता येत नसेल किंवा स्क्रिप्ट लिहिता येत नसेल तरी तुम्ही कंटेंट तयार करू शकतात. AI च्या मदतीने हे सर्व कामे तुम्ही सोप्या पद्धतीने करू शकतात. त्याबद्दल पुढे माहिती दिली आहे. त्याचसोबत दुसरा मार्ग म्हणजे जे क्रिएटर आधीपासून AI विषयी कंटेंट बनवताय. तुम्ही त्यांच्यासाठी व्हिडीओ एडीट करून देऊ शकताय आणि त्यांच्याकडून तुम्ही व्हिडिओ एडीटिंगचे चार्जेस घेऊन पैसे कमवू शकताय.
AI च्या मदतीने करा व्हिडीओ एडिटिंग
व्हिडीओ एडिटिंग करण्यासाठी तुमच्याकडे आधीपासून raw फुटेज असणे आवश्यक असते किंवा जर चेहरा न दाखवता फक्त voice देऊन व्हिडीओ सुद्धा एडीट करायचा असतो. त्यावर तुम्ही विविध elements, subtitle, टाईमलाईन, स्टॉक फुटेज, साऊंड इफेक्ट, ट्रान्झीशन टाकून तुम्ही घरबसल्या background music टाकून त्या व्हिडीओला इंगेजिंग बनवू शकतो ज्यामुळे लोकांना तो व्हिडीओ आवडेल. पण हे सर्व बनविण्यासाठी आधी वर सांगितलेले सर्व गोष्टी तुम्हाला प्रत्येक वेळेस वेगवेगळे डाऊनलोड करावे लागायचे पण AI च्या मदतीने एकाच ठिकाणी तुम्ही सर्व गोष्ठी मिळवू शकतात. त्यामुळे तुमचा वेळ वाचेल तुम्हाला जरी एडिटिंग येत नसेल तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हे करू शकणार आहात.
व्हिडीओ एडिटिंग कुठून करायची
veed.io हि AI ची वेबसाईट आहे जिथे तुम्ही elements, साऊंड इफेक्ट, फुटेज, फक्त drag आणि drop करून चांगला व्हिडिओ तयार करू शकतात. त्याबरोबरच जर तुमच्याकडे voice over करून व्हिडीओ बनवायचा नसेल तरी text to speech याद्वारे देखील फक्त तुम्ही text टाकून automatic कोणत्याही भाषेत voice तयार करू शकतात. किंवा जी स्क्रिप्ट तुम्ही तयार केली असेल ती याठिकाणी टाकून voice मध्ये covert केली तर तुमचा voice तयार होतो
स्क्रिप्ट कशी तयार करायची
chatGPT च्या मदतीने तुम्हाला ज्या विषयावर स्क्रिप्ट पाहिजे त्याबद्दल chatGPT वर जाऊन कमांड द्यायची आहे आणि लगेच ती सर्व माहिती तुम्हाला एका क्लिकवर तयार होऊन मिळेल. येथे तयार झालेली स्क्रिप्ट तुम्ही वापरून व्हिडिओ तयार करू शकतात किंवा स्क्रिप्टला voice मध्ये कन्व्हर्ट करू शकतात.
ग्राफिक्स कसे बनवावे
ग्राफिक्स बनविण्यासाठी Canva या वेबसाईट किंवा app वर तुम्ही बनवू शकतात. याठिकाणी देखील AI च्या मदतीने तुम्ही सोप्या पद्धतीने आधीपासून तयार असलेल्या टेम्प्लेट मधून प्रोफेशनल ग्राफिक्स तयार करू शकतात.
याविषयी संपूर्ण detail मध्ये माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील व्हिडीओ पहा
AI विषयी नवनवीन अपडेट ट्रिक्स पाहण्यासाठी icoNik Guide या channel ला subscribe करून ठेवा.