Free Education Scheme Maharashtra | मोफत शिक्षण योजना | Mofat Shikshan Yojana | Best Government schemes 2024

Free Education Scheme Maharashtra | मोफत शिक्षण योजना | Mofat Shikshan Yojana | Best Government schemes 2024

    आजच्या ब्लॉग मध्ये आपण महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या एका महत्त्वपूर्ण योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत ती योजना आहे मोफत शिक्षण योजना ( Free Education Scheme Maharashtra ).आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गातील (SEBC) ,इतर मागासवर्ग प्रवर्गामधील मुलींना मोफत शिक्षण घेता यावे यासाठी मोफत शिक्षण योजना आहे. जाणून घेऊयात मोफत शिक्षण योजनेबद्दल अधिक माहिती…

Advertisement

Free Education Scheme Maharashtra | मोफत शिक्षण योजना | Mofat Shikshan Yojana –

Free Education Scheme Maharashtra

Free Education Scheme Maharashtra | मोफत शिक्षण योजना | Mofat Shikshan Yojana –

– 8 जुलै 2024 या दिवशी मुलींसाठी मोफत शिक्षण योजना ही योजना जाहीर करण्यात आली.

– मुलींसाठी मोफत शिक्षण योजनाही योजना पुढील प्रवर्गातील मुलींसाठी लागू आहे.

– आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (EWS)

– सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग (SEBC)

– इतर मागासवर्ग (OBC )

– मोफत शिक्षण योजनेमुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांना हातभार लागणार असून उच्च शिक्षणामध्ये मुलींच्या प्रवेश दरामध्ये वाढ होऊ शकते तसेच शिक्षणाद्वारे महिलांचे सक्षमीकरण करण्याचा उद्देश सुद्धा मोफत शिक्षण योजनेचा आहे.

–  ८ जुलै 2024 या दिवशी शासकीय आदेश GR महाराष्ट्र सरकार तर्फे जाहीर करण्यात आला आणि यानुसार आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग व इतर मागासवर्ग या प्रवर्गांमधील मुलींना मोफत शिक्षण दिले जाणार असून उच्च शिक्षण तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 100% माफी देण्यात येणार आहे.

Free Education Scheme Maharashtra Eligibility Criteria | मुलींसाठी मोफत शिक्षण योजना पात्रता –

आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (EWS):

  • वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी असणाऱ्या कुटुंबातील मुली पात्र असणार आहेत.
  • प्रवेश घेताना उत्पन्न प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग (SEBC):

  •  मराठा आरक्षण अंतर्गत येणाऱ्या मुलींचा यामध्ये समावेश आहे.
  • या प्रवर्गामधील मुलींना सुद्धा उत्पन्नाची अट पूर्ण करावी लागणार आहे.

इतर मागासवर्ग (OBC):

  • वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी असणाऱ्या ओबीसी प्रवर्गातील मुली.
  • मुलींना मोफत शिक्षण योजनेसाठी वयोमर्यादा निश्चित केलेली नाही.
  • पुढील शिक्षण घेणाऱ्या मुलींनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • मोफत शिक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे. 

पात्र संस्था –

राज्यातील शासकीय महाविद्यालये, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालये, अंशतः अनुदानित (टप्पा अनुदान) व कायम विनाअनुदानित महाविद्यालये / तंत्रनिकेतने / सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभिमत विद्यापीठे (खाजगी अभिमत विद्यापीठे / स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे वगळून) व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमांस,शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे (Centralized ission Process-CAP) (व्यवस्थापन कोट्यातील व संस्थास्तरावरील प्रवेश वगळून) प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी, पात्र असणारे विद्यार्थी मोफत शिक्षण योजनेचा लाभ घेऊ शकतात. 

मोफत शिक्षण योजनेअंतर्गत कव्हर होणारे कोर्सेस

मोफत शिक्षण योजना विविध उच्च शिक्षण आणि व्यवसायिक अभ्यासक्रमांसाठी लागू आहे:

-इंजिनिअरिंग

-ऍग्रीकल्चर

-फार्मसी

-मेडिकल कोर्सेस

-इतर व्यवसायिक कोर्सेस जे सेंट्रलाइज्ड ऍडमिशन प्रोसेस (CAP) मार्फत घेतले जात असतात.

मोफत शिक्षण योजनेअंतर्गत ऍडमिशन प्रोसेस कशी असू शकते ?

सेंट्रलाइज्ड ऍडमिशन प्रोसेस (CAP):

– मोफत शिक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलींना CAP राऊंडद्वारे शिक्षणासाठी प्रवेश घ्यावा लागेल.

– CAP राऊंडमध्ये मीरिट आणि प्राधान्यानुसार प्रवेश दिला जातो.

– CAP मार्फत प्रवेश घेतल्यावर पात्र लाभार्थींना 100% फी माफी मिळेल. यामध्ये ट्यूशन फी आणि परीक्षा फीचा समावेश असणार आहे.

Free Education Scheme Maharashtra | मोफत शिक्षण योजना | Mofat Shikshan Yojana शासन निर्णय ( GR ) डाऊनलोड करण्यासाठी : येथे क्लिक करा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment