गूगल पे कडून मिळणार लोण….नक्की कसे आणि  कुणाला मिळणार, हे जाणून घ्या…. | Google Pay loan

गूगल पे कडून मिळणार लोण….नक्की कसे आणि  कुणाला मिळणार, हे जाणून घ्या…. | Google Pay loan –

     प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी काही ना काही आर्थिक अडचणी सुरूच असतात. परंतु कधी एखादी आर्थिक अडचण अचानक येते आणि त्यावेळी बँकेकडून सुद्धा अचानकपणे लोन मिळणे कठीण होऊन बसते .रक्कम भलेही छोटी असो परंतु तिचा पाठपुरावा करण्यासाठी खूप कागदपत्रे किंवा बऱ्याच गोष्टींना सामोरे जावे लागते. परंतु आता गुगल पे ने लोन मिळवून देण्याची सुविधा सुरू केली आहे. नक्की किती हजारांपर्यंत लोन मिळू शकते याची माहिती देखील आपण पुढे बघणारच आहोत….

    बऱ्याच दिवसांपासून ऑनलाईन पद्धतीने ट्रांसॅक्शनस करण्याची सुविधा उपलब्ध होतीच. परंतु कोरोना नंतर तर या पद्धतींचा किंवा उपलब्ध असलेल्या ॲप्सचा उपयोग जास्त प्रमाणामध्ये वाढला आणि त्यामध्ये गुगल पे या ॲपचा सुद्धा समावेश आहे. बरेचसे लोक गुगल पे चा वापर नक्कीच करत असणार.

     व्यापाऱ्यांना त्यांच्या भांडवलाच्या छोट्या गरजा पूर्ण करण्यासाठी गुगल पे ने ही सुविधा सुरू करून दिली आहे.

अनेक भारतीय बँका आणि वित्तीय कंपन्यांशी गुगल पे ने करार केले आहेत. गूगल पे छोट्या व्यापाऱ्यांना १५,००० रुपयांपर्यंतचे सॅशे लोन देणार आहे. आणि ह्या लोण साठी मासिक हप्ता १११ रुपयांपासून सुरू होईल. Sachet कर्ज देण्यासाठी गुगल पे ने DMI Finance सोबत सुध्दा हातमिळवणी केली आहे.UPI वर क्रेडिट लाइनसाठी ICICI बँकेशी करार केला आहे.

      तसेच गूगल पे ने व्यापाऱ्यांना क्रेडिट देण्यासाठी ePaylater सोबत सुद्धा भागीदारी केली आहे. गुगल पे ने त्यांच्या वैयक्तिक कर्ज पोर्ट पोलिओचा विस्तार करण्यासाठी ॲक्सिस बँकेसोबत सुद्धा भागीदारी केली आहे. 

गूगल पे कडून व्यवसायासाठी कर्ज कसे मिळवता येईल ?

– सर्वप्रथम तुमचे Google Pay for Business ॲप वर अकाउंट असणे आवश्यक आहे.Google Pay for Business ॲप उघडा.

– यानंतर लोन्स या विभागामध्ये जा आणि ऑफर्स टॅबवर क्लिक करा.

– ह्या ठिकाणी  कर्जाची रक्कम निवडा आणि त्या नंतर Get start वर क्लिक करा. 

– यानंतर तुमच्या Google अकाउंट मध्ये लॉगिन करा. त्या ठिकाणी तुमची वैयक्तिक माहिती द्यावी लागेल. त्याच बरोबर कर्जाची रक्कम किती आहे आणि किती कालावधीसाठी कर्ज घेतले, हे सुद्धा ठरवावे लागेल.

– यानंतर तुम्ही तुमच्या कर्जाला रिव्ह्यू करा आणि ई-साईन करा.

 – तुम्हाला काही आवश्यक केवायसी कागदपत्रे सबमिट करावी लागतील. त्या द्वारे तुमची पडताळणी केली जाईल.

त्या नंतर  EMI पेमेंटसाठी तुम्हाला Setup eMandate किंवा Setup NACH वर क्लिक करावे लागेल.

आणि नंतर तुम्हाला कर्ज मिळू मिळेल. हे तुम्ही गूगल पे च्या My loan section मध्ये पाहू सकता.

हे लोण कुणाला मिळू शकते ?

सध्या गूगल पे ने ह्या लोनची सुविधा टियर २ शहरामध्ये सुरू केली आहे. 

ज्या लोकांचे मंथली इनकम ३०,००० रुपये आहेत ते सहजतेने हे लोण मिळवू शकतात.

नक्कीच या लोनमुळे छोट्या व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय पुढे घेऊन जाण्यामध्ये मदत होऊ शकते.

Google Pay – Link

जॉईन करा Whatsapp वर- https://whatsapp.com/channel/0029Va5dUWWD38CKDLebrs2j
जॉईन टेलिग्राम ग्रुप- https://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा- https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/

Leave a Comment