HDFC scholarship | HDFC Bank Parivartan’s ECSS Programme 2024-25 | 75000 रुपयांपर्यंत स्कॉलरशिप मिळवण्याची संधी | HDFC scholarship program| HDFC बँक परिवर्तनचा ECSS प्रोग्रॅम 2024-25 | Best Scholarships 2024
आजच्या ब्लॉगमध्ये आपण एचडीएफसी मार्फत विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप दिली जाते ही स्कॉलरशिप 35 हजार रुपयांपासून ते 75 हजार रुपयांपर्यंत दिली जाते. तर या स्कॉलरशिप साठी नक्की पात्रता काय लागते, कोणकोणते कागदपत्रे लागतात तसेच अर्ज कसा करावा जाणून घेऊयात सविस्तर माहिती…
HDFC scholarship | HDFC Bank Parivartan’s ECSS Programme 2024-25 | 75000 रुपयांपर्यंत स्कॉलरशिप मिळवण्याची संधी | HDFC scholarship program| HDFC बँक परिवर्तनचा ECSS प्रोग्रॅम 2024-25 | Best Scholarships 2024
HDFC Bank Parivartan’s ECSS Programme 2024-25 | HDFC बँक परिवर्तनचा ECSS प्रोग्रॅम 2024-25
HDFC बँक परिवर्तनचा ECSS प्रोग्रॅम 2024-25 हा HDFC बँकेचा एक उपक्रम आहे ज्याचा उद्देश समाजातील वंचित घटकांतील गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना आधार देणे आहे. HDFC स्कॉलरशिप प्रोग्रॅम इयत्ता 1 ते 12 पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि डिप्लोमा, आयटीआय, पॉलिटेक्निक, यूजी आणि पीजी (सामान्य आणि व्यावसायिक) शिक्षण घेणाऱ्यांसाठी आहे.
ECSS प्रोग्राम अंतर्गत, जे विद्यार्थी वैयक्तिक किंवा कौटुंबिक संकटांमुळे किंवा इतर कोणत्याही आर्थिक समस्यांमुळे शिक्षणाचा खर्च उचलू शकत नाहीत त्यामुळे शिक्षण सोडावे लागू नये म्हणून अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासासाठी 75,000 रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 ऑक्टोबर 2024
HDFC बँक परिवर्तनचा ECSS प्रोग्रॅमसाठी पात्रता | Eligibility for HDFC Bank Parivartan’s ECSS Programme 2024-25 / HDFC scholarship
विद्यार्थ्यांनी भारतातील मान्यताप्राप्त महाविद्यालये किंवा विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम (सर्वसाधारण अभ्यासक्रम जसे की M.Com., M.A. इ. आणि व्यावसायिक अभ्यासक्रम जसे की M.Tech., M.B.A. इ.) केले पाहिजेत. अर्जदारांनी मागील पात्रता परीक्षा किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.
वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी किंवा समान असणे आवश्यक आहे.
ज्या अर्जदारांना मागील 3 वर्षामध्ये वैयक्तिक / कौटुंबिक संकटांचा सामना करावा लागला असेल आणि ज्यामुळे ते शिक्षणाचा खर्च उचलू शकत नसतील ,ज्यांचे शिक्षण अर्धवट राहण्याचा धोका आहे त्यांना प्राधान्य दिले जाईल.
स्कॉलरशिप फक्त भारतीय नागरिकांसाठी खुली आहे.
HDFC बँक परिवर्तनचा ECSS प्रोग्रॅमचे फायदे | Benefits of HDFC Bank Parivartan’s ECSS Programme 2024-25 / HDFC scholarship
सामान्य पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी: 35,000 रुपये
व्यावसायिक पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी: 75,000 रुपये
HDFC बँक परिवर्तनचा ECSS प्रोग्रॅमसाठी आवश्यक कागदपत्रे | documents required for HDFC Bank Parivartan’s ECSS Programme 2024-25
ग्रामपंचायत/वॉर्ड समुपदेशक/सरपंच यांनी जारी केलेला उत्पन्नाचा दाखला
एसडीएम/डीएम/सीओ/तहसीलदार यांनी जारी केलेला उत्पन्नाचा पुरावा
प्रतिज्ञापत्र
– कौटुंबिक/वैयक्तिक संकटाचा पुरावा (लागू असल्यास)
HDFC बँक परिवर्तनचा ECSS प्रोग्रॅमसाठी अर्ज कसा करावा | Application for HDFC Bank Parivartan’s ECSS Programme 2024-25
– पुढे एचडीएफसी स्कॉलरशिप साठी अर्ज करण्याकरिता लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करावे.
– त्यानंतर लॉगिन करावे जर समजा तुम्ही रजिस्ट्रेशन केलेले नसेल तर मोबाईल नंबर किंवा मेल आयडी वापरून किंवा गुगल अकाउंट वापरून लॉगिन करावे.
– त्यानंतर एचडीएफसी बँक परिवर्तनच्या ईसीएसएस प्रोग्रॅमच्या पेजवर रीडायरेक्ट केले जाईल.
– नंतर स्टार्ट अप्लिकेशन या बटणावर क्लिक करावे.
– आता अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित रित्या भरावी आणि त्यासोबतच या स्कॉलरशिप साठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे अपलोड करावी.
– आता एचडीएफसी स्कॉलरशिप साठी चा फॉर्म व्यवस्थित भरला आहे का हे काळजीपूर्वक चेक करावे आणि त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करून फॉर्म जमा करावा.
अशा रीतीने या स्कॉलरशिप साठी पात्र असणारे उमेदवार अर्ज करू शकतात.
HDFC बँक परिवर्तनचा ECSS प्रोग्रॅम 2024-25 | HDFC Bank Parivartan’s ECSS Programme 2024-25 याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि या स्कॉलरशिप साठी अप्लाय करण्याकरिता : येथे क्लिक करा.