5 High-Demand Side Income Ideas for 2024 | जास्त मागणी असणाऱ्या इन्कम आयडियाज | Best income opportunities for 2024 –

5 High-Demand Side Income Ideas for 2024 | जास्त मागणी असणाऱ्या इन्कम आयडियाज | Best income opportunities for 2024 –

         आजच्या ब्लॉगमध्ये आपण 2024 मध्ये जास्त मागणी असणाऱ्या इन्कम आयडियाज ( High-Demand Side Income Ideas ) बद्दल जाणून घेणार आहोत. आपण आपल्याकडे जे स्किल आहे किंवा आपल्याला ज्या क्षेत्राबद्दल आवड आहे ते स्किल डेव्हलप करून त्या क्षेत्रामध्ये प्रवेश करू शकतो. चला तर सुरुवात करूयात…

Advertisement

5 High-Demand Side Income Ideas for 2024 | जास्त मागणी असणाऱ्या इन्कम आयडियाज –

High-Demand Side Income Ideas
High-Demand Side Income Ideas

1.Thumbnail Design | थंबनेल डिझाईन –

– डिजिटल कन्टेन्ट साठी थम्बनेल डिझाईन खूप महत्त्वाची असते कारण प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यामध्ये थंबनेल महत्त्वाची भूमिका बजावते.

– लक्ष वेधून घेणारे आणि आकर्षक असे थंबनेल आपल्या कंटेटच्या यशावर खूप परिणाम करू शकतात कारण चांगले थंबनेल असेल तर चांगली एंगेजमेंट आणि जास्तीत जास्त क्लिक्स मिळतात.

– थंबनेल बनवत असताना टायपोग्राफी ,डिझाईन, कलर या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात.

– चांगल्या थंबनेल डिझायनरची डिमांड नक्कीच जास्त आहे आणि त्या डिझायनरकडे थंबनेल डिझाईन करण्याची जी क्वालिटी आहे त्यानुसार डिझायनरला मिळणाऱ्या पेमेंट मध्ये चेंज होऊ शकतो, तसेच ज्या क्रिएटर सोबत आपण थंबनेल डिझाईनर म्हणून काम करत आहोत त्याच्या किंवा तिच्या चॅनल साईज वर सुद्धा पेमेंट अवलंबून राहू शकते. 

– त्यामुळे नक्कीच कुठल्याही कंटेंट क्रियेटर साठी थंबनेल मेकर एक मौल्यवान असेट असू शकते.

2.Podcast Editing | पॉडकास्ट एडिटिंग – 

– आजच्या डिजिटल युगामध्ये विविध नवनवीन संधी करिअर घडवण्यासाठी निर्माण होत आहेत त्यामधीलच एक संधी म्हणजे पॉडकास्ट एडिटिंग. 

– हल्ली बरेच चॅनल पॉडकास्ट करताना दिसतात. 

– इतर व्हिडिओज पेक्षा पॉडकास्टसाठी जी व्हिडिओ एडिटिंग केली जाते ती थोडीशी वेगळी असते. इतर व्हिडिओजची साईज छोटी असते तर पॉडकास्ट व्हिडिओज लेन्दी असतात. पॉडकास्टची एडिटिंग करत असताना एक्सप्रेशन्स तसेच इतर काही फीचर्स वर काम करावे लागते.

– कंटेंटची कॉम्प्लेक्सिटी तसेच कंटेटची लेंथ यानुसार पॉडकास्ट एडिटर्सचे रेट्स बदलू शकतात.

3.Chatbot Marketing | चाट बोट मार्केटिंग –

– कम्युनिकेशन आणि लीड जनरेशन साठी चाट बोट मार्केटिंग हे फिल्ड वेगाने वाढत आहे.

– जर तुमच्याकडे हे स्किल असेल तर तुमच्या क्लाइंटला इंटरॅक्टिव्ह असे चाट बोट सेट करून देऊन त्या क्लायंटला त्यांच्या ऑडियन्स सोबत कनेक्ट करता येईल तसेच कन्टेन्ट डिस्ट्रीब्यूट करता येईल आणि महत्त्वपूर्ण लीड्स सुद्धा मिळवता येतील.

– चाट बोट सेट अप मॅनेज करणे हे काम करून सुद्धा चांगली अर्निंग करता येऊ शकते. 

– ज्यांना ऑडियन्स एंगेजमेंटची चांगली समज आहे त्यांच्यासाठी चाट बोट हे पॅसिव्ह इनकम मिळवण्याचा चांगला स्रोत ठरू शकते.

4.Short /Reels Video Editing | शॉर्ट किंवा रील्स व्हिडिओ एडिटिंग – 

– युट्युब वर आपण शॉर्ट व्हिडिओ बघतो तसेच इंस्टाग्राम वर रील बघत असतो या अशा प्रकारच्या व्हिडिओची हल्ली खूप क्रेझ आहे तसेच बरेच लोक अशा प्रकारचे व्हिडिओज बघतात आणि यामुळेच ज्यांच्याकडे व्हिडिओ एडिटिंग करण्याचे स्किल आहे त्यांच्यासाठी ही सुद्धा चांगली संधी आहे. 

– ज्यांच्याकडे व्हिडिओ एडिटिंगचे चांगले स्किल्स आहेत तसेच अटेंशन मिळवणारे व्हिडिओज बनवता येऊ शकतात, आय कॅचिंग व्हिडिओज तसेच व्हिडिओमध्ये साऊंड इफेक्ट चांगल्या प्रकारे युज करता आले पाहिजे अशा व्हिडिओ एडिटरची सध्या या क्षेत्रात मागणी आहे.

– या प्रकारचे व्हिडिओ एडिटिंगसाठी सुद्धा आपल्याकडे असणाऱ्या स्किल्सवरून तसेच आपण कोणासाठी काम करत आहोत यावर आपल्याला किती पेमेंट मिळू शकते हे ठरेल.

5.Content Writing | कन्टेन्ट रायटिंग –

– सध्याच्या डिजिटल युगामध्ये हाय क्वालिटी आणि SEO फ्रेंडली कंटेंटची मागणी जास्त आहे यामध्ये ब्लॉग पोस्ट, सोशल मीडिया कॅप्शन्स यासारख्या कंटेंटसाठी क्रियेटर्स तसेच व्यावसायिक चांगले स्किल असणाऱ्या रायटर च्या शोधामध्ये असतात. 

– एंगेजिंग आणि माहितीपूर्ण कंटेंट तयार करता येणे हे चांगल्या कंटेंट रायटरकडे असणारे स्किल आहे.

– कन्टेन्ट रायटरला ब्लॉग किंवा स्क्रिप्टनुसार तसेच शब्दांनुसार म्हणजेच पर वर्ड याप्रमाणे पेमेंट मिळते. 

  अशाप्रकारे ह्या काही जास्त मागणी असणाऱ्या इन्कम आयडियाज ( High-Demand Side Income Ideas ) आहेत. आता बरेच लोक या इन्कम आयडिया च्या बाबतीत सातत्य ठेवत नाहीत म्हणजेच अशा फिल्डमध्ये यशस्वी झालेले लोक हे कमी दिवसात यशस्वी झालेले नसतात तर त्यांनी सुद्धा त्यामागे सातत्य ठेवलेलं असतं, तसेच मेहनत घेतलेली असते त्यामुळे या इन्कम आयडियाची (High-Demand Side Income Ideas ) निवड करत असताना त्याबद्दल आपल्याकडे स्किल्स आहेत का तसेच क्लाइंट शोधण्यासाठी वेळ देणे सुद्धा आवश्यक आहे. आपण आपल्याजवळ जे स्किल आहे त्यानुसार या इन्कम आयडियाची निवड करू शकतो.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment