Indira Gandhi National Disability Pension Scheme | इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना | best government schemes 2024 –
केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने फेब्रुवारी 2009 मध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंगत्व योजना ( Indira Gandhi National Disability Pension Scheme ) देशांमधील अपंगांना आधार देण्याकरिता सुरू केलेली आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंगत्व योजनेअंतर्गत अपंग व्यक्तींना दरमहा पेन्शन दिले जाते. इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग योजना नक्की कोणासाठी आहे, या योजनेचे फायदे काय, या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात तसेच अर्ज कसा करायचा जाणून घेऊयात ही संपूर्ण माहिती….
Indira Gandhi National Disability Pension Scheme | इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना
Table of Contents
Indira Gandhi National Disability Pension Scheme Benefits| इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना फायदे –
– असे दिव्यांगजन ज्यांचे वय 18 ते 79 वर्षा दरम्यान आहे त्यांना दरमहा 300/- रुपये पेन्शन दिली जाते.
– 80 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या पात्र अपंग व्यक्तींना पाचशे रुपये दरमहा पेन्शन दिली जाते.
Indira Gandhi National Disability Pension Scheme Eligibility | इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना पात्रता –
– अर्जदाराचे वय 18 ते 79 वर्षा दरम्यान असावे
– अर्जदार व्यक्ती भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
– अर्जदारास 80 टक्के पेक्षा जास्त अपंगत्व असणे आवश्यक आहे तरच या योजनेसाठी अर्ज करता येऊ शकतो.
– दारिद्र्यरेषेखालील व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
– अर्जदार व्यक्ती मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या अक्षम असावी.
Indira Gandhi National Disability Pension Scheme required documents| इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना आवश्यक कागदपत्रे –
– आधार कार्ड
– बीपीएल कार्ड
– वयाचा पुरावा ( जन्म प्रमाणपत्र किंवा शाळेचे प्रमाणपत्र. हे दोन्ही नसेल तर शिधापत्रिका आणि ईपीआयसीचा विचार केला जाऊ शकतो. कोणतेही वैध डॉक्युमेंट नसेल तर , कोणत्याही सरकारी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला वय प्रमाणपत्र जारी करण्यासाठी अधिकृत केले जाऊ शकते.
– अपंगत्व प्रमाणपत्र ( मुख्य वैद्यकीय अधिकारी, सामुदायिक आरोग्य केंद्र किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत जारी केलेले अपंगत्व प्रमाणपत्र (80% आणि त्याहून अधिक) स्वीकारले जाईल.
– पासपोर्ट साईज फोटो
Indira Gandhi National Disability Pension Scheme Application| इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना अर्ज –
इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेसाठी ऑनलाईन तसेच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो.
इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा करावा ?
इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेसाठी अधिकृत वेबसाईटला विजिट करा किंवा उमंग ॲप डाऊनलोड करू शकता.
अर्जदारांनी मोबाईल नंबर आणि ओटीपी टाकून लॉगिन करायचे आहे.
त्यानंतर उमेदवारांनी “ऑनलाइन अर्ज करा” या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.
इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेचा अर्ज व्यवस्थित रित्या भरा त्यासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा.
इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज कसा करावा ?
– ग्रामीण भागातील व्यक्ती भरलेले अर्ज ग्रामपंचायत किंवा ब्लॉक कार्यालयामध्ये तर शहरी भागातील व्यक्ती नगरपालिका किंवा नगरपरिषदेमध्ये सादर करतील.
- पडताळणी अधिकाऱ्यांकडून अर्जाची व्यवस्थितरित्या पडताळणी केली जाईल.
– पडताळणी अधिकारी आणि इतर सर्व टीमकडून व्यवस्थितरित्या पडताळणी झाल्यानंतर आणि मंजुरी मिळाल्यानंतर ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्यांची यादी ग्रामपंचायत किंवा ब्लॉक कार्यालयामध्ये तर शहरी भागातील लाभार्थी व्यक्तींची यादी नगरपालिका किंवा नगर परिषदेमध्ये जाहीर केली जाते.
– पात्र लाभार्थ्यांना पेन्शनची रक्कम डीबीटी मार्फत बँक खात्यामध्ये किंवा पोस्ट खात्यामध्ये जमा केली जाते.
इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरिता : येथे क्लिक करा.