कोटक कन्या शिष्यवृत्ती ही कोटक महिंद्रा ग्रुपच्या विविध कंपन्या आणि कोटक एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त CSR प्रकल्पाचा भाग आहे. या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील हुशार मुलींना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत देणे, त्यांचे शैक्षणिक स्वप्न पूर्ण करणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे हा आहे.
Kotak Kanya Scholarship 2025-26 शिष्यवृत्तीबद्दल माहिती
कोटक कन्या शिष्यवृत्ती 2025-26 अंतर्गत, बारावी उत्तीर्ण झालेल्या व इंजिनियरिंग, MBBS, इंटिग्रेटेड LLB (5 वर्षे), इंटिग्रेटेड BS-MS/BS-Research, IISER, IISC (बंगळूर), किंवा इतर व्यावसायिक अभ्यासक्रम (डिझाईन, आर्किटेक्चर इ.) मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींना वार्षिक ₹1.5 लाख पर्यंत शिष्यवृत्ती दिली जाईल. ही रक्कम पदवी अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत मिळेल.
अधिक माहितीसाठी Buddy4Study वेबसाइटला भेट द्या किंवा अधिकृत संपर्क क्रमांक/ईमेलद्वारे चौकशी करा.
निष्कर्ष
कोटक कन्या शिष्यवृत्ती 2025-26 ही आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या पण शैक्षणिकदृष्ट्या गुणवान मुलींसाठी एक सुवर्णसंधी आहे. योग्य वेळी अर्ज करून ही संधी गमावू नका.
HDFC Bank Scholarship Scheme 2025-26 | HDFC बँक परिवर्तन ECSS शिष्यवृत्ती योजना 2025-26 | गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांसाठी एक संधी यासाठी अप्लाय करायचं असेल तर खाली आपला ब्लॉग दिलेला आहे. संपूर्ण ब्लॉग मराठी मध्ये दिला आहे. काही प्रश्न असेल तर आपल्याला टेलिग्राम आणि इंस्टाग्राम वर मॅसेज करू शकता