Ladaki Bahin Yojana | आनंदाची बातमी… लाडकी बहीण योजना तिसरा हप्ता आला | लगेच चेक करा…| लाडकी बहिण योजना | Best Government schemes 2024 –
नमस्कार, आपल्या सर्वांना माहीतच आहे की महाराष्ट्रामध्ये गेल्या काही महिन्यांपासून लाडकी बहिण योजना (Ladaki Bahin Yojana ) सुरू करण्यात आलेली आहे. लाडकी बहीण योजना (Ladaki Bahin Yojana ) ही विशेषतः महिलांसाठी असून या योजनेसाठी सुद्धा काही अटी आणि पात्रता आहेत त्या जवळपास सर्वांना माहीतच आहे आपण यापूर्वीच्या काही ब्लॉगमध्ये सुद्धा त्याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत त्या अनेक महिलांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले होते त्यापैकी बऱ्याच महिलांना या योजनेचे पैसे सुद्धा मिळाले.
Ladaki Bahin Yojana | लाडकी बहिण योजना
ज्या महिलांनी (Ladaki Bahin Yojana ) योजना सुरू झाल्यानंतर अगदी सुरुवातीलाच फॉर्म भरले होते त्यांना रक्षाबंधनच्या वेळी पैसे मिळाले एकूण आत्तापर्यंत दोन हप्ते पात्र महिलांच्या अकाउंटवर जमा झालेले होते आणि आता ज्या महिलांनी फॉर्म भरलेले होते त्या महिला तिसरा हप्ता येण्याची वाट बघत होत्या तर ज्या महिलांनी फॉर्म उशिरा म्हणजेच ऑगस्टच्या शेवटी भरलेले होते अशा महिलांना सुरुवातीचे हप्ते मिळालेले नव्हते आणि या महिला एकूण 4500 रुपये त्यांच्या अकाउंटवर येतील अशी वाट बघत होत्या आणि आज म्हणजेच 25 सप्टेंबर 2024 रोजी पात्र महिलांच्या अकाउंटवर पैसे येण्याला सुरुवात झालेली आहे.
सुरुवातीला लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची तारीख 31 ऑगस्ट 2024 होती परंतु नंतर ही तारीख 30 सप्टेंबर 2024 करण्यात आली तरी अद्याप पर्यंत ज्या पात्र महिलांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला नसेल त्यांनी लवकरात लवकर अधिकृत वेबसाईटवरून हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. नक्कीच ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत, ज्यांनी फॉर्म व्यवस्थित रित्या भरला आहे , लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड केली आहेत अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ होईल.
लाभ न मिळण्याची काही कारणे :
तसेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत बऱ्याच महिलांना त्यांच्या अकाउंट वर पैसे आले परंतु काही महिलांना फॉर्म भरून बरेच दिवस झाले असून सुद्धा त्यांच्या अकाउंटवर लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभ अद्याप पर्यंत जमा झालेला नाही याची काही कारणे पुढील प्रमाणे आहेत :
– लाडकी बहीण योजनेसाठी असणारी पात्रता तपासून आपण पात्र असू तरच हा फॉर्म भरला असेल तर अशावेळी अकाउंट वर नक्कीच या योजनेचा लाभ जमा होईल.
– लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना काही आवश्यक कागदपत्रे अपलोड केली गेलेली नसल्यास लाडकी बहीण योजनेचा लाभ न मिळण्याची शक्यता आहे.
– लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना त्या फॉर्ममध्ये ज्या बँक अकाउंटचे डिटेल्स दिलेले आहे ते बँक सीडींग असणे आवश्यक आहे किंवा त्या व्यतिरिक्त तुमचे इतर अकाउंट सीडींग असेल तरीसुद्धा ज्या बँक अकाउंटचे डिटेल्स फॉर्म भरतेवेळी दिलेले आहे त्या ऐवजी इतर सीडींग असणाऱ्या बँक अकाउंट वर पैसे जमा होतील. आपले बँक अकाउंट सीडिंग नसल्यास आपल्या बँकेमध्ये संपर्क साधावा किंवा NPCI च्या वेबसाईटवरून त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या बँकेसाठी seeding बँकेमध्ये न जाता करू शकता.
NPCI च्या अधिकृत वेबसाईटवरून सीडींग कसे करावे ?
– NPCI च्या https://www.npci.org.in या अधिकृत वेबसाईटवर जा.
– त्यानंतर Consumer हा ऑप्शन निवडा.
– नंतर Bharat Aadhaar Seeding Enabler (BASE) या ऑप्शन वर क्लिक करा.
– त्यानंतर त्या ठिकाणी आधार नंबर टाकून उर्वरित सर्व माहिती व्यवस्थित रित्या भरून घ्या.
– या ठिकाणी लिमिटेड बँक उपलब्ध आहेत त्यापैकी एखाद्या बँकेमध्ये तुमचे अकाउंट असल्यास बँकेमध्ये न जाता सीडींग करता येऊ शकते परंतु त्या बँकेमध्ये तुमचे अकाउंट नसेल तर बँकेमध्ये संपर्क साधून सीडींग करून घेऊ शकता.
आपले बँक अकाउंट सीडिंग आहे की नाही किंवा आपले जास्त बँक अकाउंट असतील तर त्यापैकी कोणते बँक अकाउंट सीडिंग झालेले आहे हे कसे चेक करावे ?
How to check aadhar link with bank account ?How to check bank seeding status ?
– सर्वप्रथम https://uidai.gov.in/en/ या आधारच्या अधिकृत वेबसाईटवर व्हिजिट करा किंवा गुगल वर My Aadhar असे सर्च करा आणि जी पहिली लिंक येईल त्यावर क्लिक करा.
– त्यानंतर Aadhar services हा ऑप्शन निवडा.
– नंतर Aadhar linking status हा ऑप्शन निवडा.
– आता आधार नंबर, कॅपचा आणि आधार नंबरशी लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर जो ओटीपी येईल तो त्या ठिकाणी टाका आणि लॉगिन करा.
– आता या ठिकाणी बँक सीडींग स्टेटस दिसेल. तुमचे एकापेक्षा जास्त बँक अकाउंट असतील तर त्यापैकी कोणते बँक अकाउंट आधार कार्ड सोबत लिंक आहे त्याचे नाव त्या ठिकाणी दिसेल , डीबीटी एनेबल आहे की नाही हे सुद्धा दिसेल.
*लाडकी बहीण योजनेचा ( Ladaki Bahin Yojana ) लाभ मिळवण्यासाठी सीडींग आवश्यक असून डीबीटीएनेबल असणे अत्यंत आवश्यक आहे तरच लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळू शकतो आणि पैसे अकाउंट वर जमा होऊ शकतात.
जॉईन करा Whatsapp वर | https://wa.openinapp.link/ufn1x |
जॉईन टेलिग्राम ग्रुप | https://t.me/iconikMarathimotivation |
मला मेसेज करा | https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/ |
आपली वेबसाईट | https://iconikmarathi.com/ |
ai टूल्स साठी | https://yt.openinapp.co/iconik2 |
युट्युब | https://yt.openinapp.co/iconikMarathi |