तरुणांसाठी निर्णय महिन्याला १०,००० रुपये मिळणार | लाडका भाऊ योजना | Ladka Bhau Yojana | मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना | CM youth work training scheme I New opportunities 2024

तरुणांसाठी निर्णय महिन्याला १०,००० रुपये मिळणार | लाडका भाऊ योजना | Ladka Bhau Yojana | मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना | CM youth work training scheme 

     आजच्या ब्लॉगमध्ये आपण शासनातर्फे घेण्यात आलेल्या निर्णयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेचे नाव आहे ‘” मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ” परंतु लाडका भाऊ योजना ( Ladka Bhau Yojana ) या नावाने ही योजना सध्या ओळखली जात आहे. या योजनेअंतर्गत तरुणांना दहा हजार रुपयांपर्यंत दर महिन्याला विद्या वेतन मिळणार आहे, ते कसे त्यासाठी काय पात्रता लागते तसेच इतर सर्व माहिती जाणून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया..

Advertisement

लाडका भाऊ योजना | Ladka Bhau Yojana | मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना –

ladka bhau yojana

मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेचे स्वरूप :

– मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही योजना महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य,रोजगार, उद्योगता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत राबवली जाणार आहे. 

– या प्रोजेक्ट अंतर्गत निर्माण केलेल्या वेबसाईट द्वारे रोजगार उपलब्ध करून देणारी उद्योजक तसेच रोजगार हवे असलेले उमेदवार जोडले जाणार आहेत. 

– ज्या उमेदवारांना रोजगार हवा आहे अशा उमेदवारांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रत्यक्षरीत्या कामाचा अनुभव मिळेल आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये क्षमता वाढ होऊन उद्योजकांना सुद्धा त्यांच्या उद्योगासाठी लागणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेमार्फत उपलब्ध करून देण्यात येईल. 

– ज्यांना रोजगार हवा आहे असे उमेदवार तसेच प्रशिक्षण देऊ इच्छिणारे उद्योजकांना वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक असेल. 

– या योजनेसाठी विभागाच्या वेबसाईटवर आवश्यक असणारी माहिती ( योजनेचे कामकाज ) उपलब्ध करून देण्यात येईल.

  • उमेदवारांची नोंदणी 
  • आस्थापनांची नोंदणी 
  • कार्य प्रशिक्षण व्यवसाय नोंदणी 
  • उपस्थिती नोंदवणे 
  • विद्या वेतन अदा करणे 
  • प्रशिक्षण रुजू व समाप्ती अहवाल 
  • अनुभव प्रमाणपत्र 

हे सर्व ऑनलाईन पद्धतीने करण्यात येईल. 

– पुढील शैक्षणिक पात्रता असलेले इच्छुक उमेदवार यांना रोजगार आवश्यक आहे ते ऑनलाईन नोंदणी करू शकतील :

  • बारावी 
  • आयटीआय 
  • पदविका 
  • पदवी 
  • पदव्युत्तर 

– कमीत कमी 20 रोजगार देणाऱ्या आस्थापना या कार्य प्रशिक्षणासाठी सहभागी होण्याकरता पात्र ठरतील. 

– प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये या योजनेमार्फत सुमारे 10 लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील.

– ज्यांना मनुष्यबळाची आवश्यकता आहे ते मनुष्यबळाची मागणी करू शकतील. 

उमेदवारांची पात्रता |Ladka Bhau Yojana Eligibility –

– इच्छुक उमेदवाराचे वय किमान 18 ते कमाल 35 वर्ष असावे. 

– उमेदवार महाराष्ट्राचा अधीवासी असणे आवश्यक आहे. 

– उमेदवाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. 

– उमेदवाराचे बँक खाते आधार कार्डला जोडलेले असावे.

उमेदवाराची शैक्षणिक पात्रता :

  • बारावी पास 
  • आयटीआय 
  • पदविका 
  • पदवी
  • पदव्युत्तर 

– शिक्षण सुरू असलेले उमेदवार या योजनेमध्ये सहभाग घेण्यास पात्र असणार नाहीत. 

– उमेदवाराकडे कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या वेबसाईटवर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक असावा.

आस्थापना / उद्योगासाठीची पात्रता I Ladka Bhau Yojana Eligibilty :

– उद्योग / आस्थापना महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यरत असावे. 

– उद्योग / आस्थापनेने  कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या वेबसाईटवर नोंदणी केलेली असावी. 

– उद्योग / आस्थापनेची स्थापना कमीत कमी तीन वर्षांपूर्वीची असणे आवश्यक आहे. 

– उद्योग / आस्थापनांनी ईपीएफ, ESIC, सर्टिफिकेट ऑफ इन कॉर्पोरेशन, DPIT आणि उद्योग आधारची नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.

कार्य प्रशिक्षण कार्यक्रम कशाप्रकारे राबवला जाईल? 

– इच्छुक उमेदवारांनी वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे. 

– इच्छुक उमेदवार परंतु ज्यांना अनुभव नाही अशा उमेदवारांना कार्य प्रशिक्षण देण्यात येईल. या योजने अंतर्गत उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीमध्ये कुशल / अर्धकुशल प्रकारचे प्रत्यक्षरीत्या प्रशिक्षण देणे अपेक्षित आहे. 

– प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने इतका असेल. या सहा महिन्यांमध्ये उमेदवारांना योजनेअंतर्गत शासनातर्फे विद्या वेतन देण्यात येणार आहे. 

– तसेच प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले असल्याचे प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येईल. 

– प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर जर संबंधित उद्योग किंवा आस्थापनेंना तो उमेदवार योग्य वाटल्यास व उमेदवाराची इच्छा असल्यास रोजगार देण्याचा निर्णय सुद्धा संबंधित उद्योग किंवा आस्थापना घेऊ शकतात. 

* या योजनेअंतर्गत प्रशिक्षण मिळत असलेल्या उमेदवारांना कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा, किमान वेतन कायदा, कामगार नुकसान भरपाई कायदा व औद्योगिक विवाद कायदा, राज्य कामगार विमा कायदा लागू असणार नाही.

या योजनेअंतर्गत शासनामार्फत दिले जाणारे विद्यावेतन :

१. बारावी पास : 6000 रुपये 

२. आयटीआय / पदविका : 8000 रुपये

३. पदवीधर / पदव्युत्तर : 10,000 रुपये 

विद्या वेतन प्रशिक्षणार्थीच्या अकाउंट मध्ये ऑनलाईन पद्धतीने दरमहा करण्यात येईल. 

प्रशिक्षणार्थीची दैनिक हजेरी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल आणि ऑनलाईन उपस्थितीच्या आधारे प्रशिक्षणार्थीचे विद्यावेतन ऑनलाइन पद्धतीने दरमहा देण्यात येईल. 

* उद्योजक जर उमेदवारांना विद्यावेतनाव्यतिरिक्त अधिक विद्या वेतन देऊ इच्छित असतील तर वाढीव रक्कम अतिरिक्त स्वरूपामध्ये उमेदवारांना ते देऊ शकतील.

* जर प्रशिक्षणातील महिन्यामध्ये दहा दिवस किंवा त्यापेक्षा जास्त गैरहजर असेल तर त्या महिन्याचे विद्यावेतन अनुज्ञेय राहणार नाही. 

* जर प्रशिक्षणार्थी पहिल्याच महिन्यामध्ये प्रशिक्षण सोडून गेला तर असा प्रशिक्षणार्थी सुद्धा विद्या वेतनास पात्र राहणार नाही. 

* या योजनेअंतर्गत शिकाऊ उमेदवारी ( NAPS/ MAPS ) पूर्ण केलेली तसेच करत असलेले उमेदवार अपात्र असतील. 

* उमेदवाराला या योजनेचा लाभ एकदाच घेता येईल.

लाडका भाऊ योजना | Ladka Bhau Yojana | मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना शासन निर्णय ( GR ) वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Watch full video Apply process Ladka bhau yojna-

Advertisement

Leave a Comment