Ladka shetkari Yojana | लाडका शेतकरी योजना | आता शेतकऱ्यांसाठी सुद्धा सरकारची मोठी घोषणा …
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र सरकारने विविध योजनांच्या घोषणा केल्या त्यापैकी काही योजना सुरू सुद्धा झाले आहेत त्या योजना म्हणजे लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, अन्नपूर्णा योजना आणि आता महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुद्धा ” लाडका शेतकरी योजना ( Ladka shetkari Yojana ) ” या योजनेची नुकतीच घोषणा केली आहे. जाणून घेऊयात याबद्दलच अधिक माहिती…
– राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन बीडमध्ये करण्यात आलेले होते या कृषी महोत्सवामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी एका योजनेची घोषणा केली ती योजना म्हणजे लाडका शेतकरी योजना. बीड मधील कृषी महोत्सवासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान हे उपस्थित होते.
सोयाबीन आणि कापसासाठी हेक्टरी 5 हजार रुपयांची घोषणा :
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे म्हणाले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे ते मागणी करणार आहेत की, शेतकऱ्यांच्या पिकाला सोयाबीन आणि कापसाला चांगला भाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांचे सुद्धा कल्याण झालं पाहिजे. त्यांनी सोयाबीनला पाच हजार रुपये हेक्टरी आणि कापसाला सुद्धा पाच हजार रुपये हेक्टरी देण्याचा निर्णय घेत आहोत असे सांगितले आणि ही मर्यादा दोन हेक्टर पर्यंत लागू असणार आहे.
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे असेही म्हणाले की ते आता ई पीक पाहणी बाजूला ठेवून ज्या शेतकऱ्यांच्या सातबारावर कापूस आणि सोयाबीन ची नोंद आहे त्यांना पाच हजार रुपये हेक्टरी देण्याचा निर्णय घेत आहेत. तसेच इतकच नाही तर शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे विज बिल सुद्धा माफ करत आहेत. तसेच मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला सोलर अशा विविध योजना सुद्धा सरकारने सुरू केलेल्या आहेत.
कांदा आणि दूध प्रश्नावर बैठक :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे म्हणाले की एक रुपयांमध्ये विमा देणार हे पहिलं राज्य आहे. किसान सन्मान निधी मधून केंद्र आणि राज्यातून निधी दिला आहे, राज्यामधील शेतकऱ्यांचा कांद्याचा आणि दुधाचा प्रश्न सोडवायचा आहे त्यासाठी तुम्ही सुद्धा थोडासा प्रयत्न करा अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवराज सिंह चौहान यांना केली.
लाडका शेतकरी योजना या योजनेचे कोणकोणते फायदे असणार आहेत, या योजनेचा लाभ कोणाला घेता येईल तसेच कागदपत्रे काय लागतील पात्रता काय यांसारखी माहिती उपलब्ध झाल्यानंतर कळवण्यात येईल.