Mother name mandatory in Maharashtra | आपल्या नावापुढे आईचे नाव लावणे बंधनकारक… | Mother Name On Government Documents | Maharashtra Government Best Decisions 2024 –

Mother name mandatory in Maharashtra | आपल्या नावापुढे आईचे नाव लावणे बंधनकारक… | Mother Name On Government Documents | Maharashtra Government Decision 2024 –

Mother name mandatory in Maharashtra

     आजच्या ब्लॉगमध्ये आईचे नाव आपल्या नावापुढे लावणे ( Mother name mandatory in Maharashtra ) हे महाराष्ट्रामध्ये बंधनकारक झालेले आहे याबद्दलच अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. जन्म झाल्यापासून अगदी सर्व कागदपत्रांवर यापूर्वी आणि हल्लीची जी पिढी आहे तोपर्यंत सुद्धा स्वतःच्या नावापुढे वडिलांचे नाव आणि त्यानंतर आडनाव असे नाव लिहिण्याची पद्धत होती परंतु आता महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे, हा निर्णय असा आहे की स्वतःच्या नावापुढे आईचे नाव त्यानंतर वडिलांचे नाव आणि त्यानंतर आडनाव या स्वरूपामध्ये सर्व कागदपत्रांवर याप्रकारे संपूर्ण नाव असणे बंधनकारक आहे. परंतु हा नियम कधीपासून लागू होणार आहे तसेच पूर्वीचे कागदपत्र बदलणे आवश्यक असणार आहे का याबद्दलच माहिती पुढे आपण जाणून घेणार आहोत. 

      महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी महाराष्ट्र दिनापासून म्हणजेच 1 मे 2024 पासून करण्यात आलेली आहे. 2024 च्या महाराष्ट्र दिनापासून स्वतःच्या नावापुढे आईचे नाव ,त्यानंतर वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव याप्रकारे नाव लावणे बंधनकारक आहे परंतु हा निर्णय 1 मे 2024 नंतर जन्मलेल्या सर्व बालकांसाठी बंधनकारक असेल. 1 मे 2024 नंतर जन्म झालेल्या बाळांच्या नावाची नोंदणी करताना बाळाच्या नावानंतर आईचे नाव, नंतर वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव या प्रकारे नोंदणी करायची आहे.

      महसुली दस्ताऐवज, सेवा पुस्तक, सॅलरी स्लिप, इतर सर्व कागदपत्रे, विविध परीक्षांच्या अर्जाचे नमुने तसेच इतर शासकीय दस्तऐवज यामध्ये आईचे नाव लावणे बंधनकारक आहे यास मान्यता दिली गेलेली आहे. जन्म मृत्यू नोंदवहीत आवश्यक त्या सुधारणा करण्यासाठी व नोंद घेण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने केंद्र शासनाशी विचारविनिमय करावा. केंद्र शासनातर्फे याबद्दल आदेश मिळाल्यानंतर जन्म मृत्यू नोंदवही मध्ये बालकाचे नाव नंतर आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व त्यानंतर आडनाव या स्वरूपामध्ये नोंद करण्याची मान्यता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देण्यात आलेली होती. शैक्षणिक कागदपत्रे, शासकीय कागदपत्रे, विविध परीक्षा तसेच महसूल अशा सर्व कागदपत्रांसाठी हा नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे. या निर्णयाचे सगळीकडेच स्वागत होत असून हा ऐतिहासिक असा निर्णय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाची अंमलबजावणी करून त्यांच्या कार्यालयाबाहेर असलेल्या पाटीवर आईचे नाव लावले आहे.

Mother name mandatory in Maharashtra शासन निर्णय :-

पूर्वी काही कागदपत्रांवर आईचे नाव असायचे परंतु ते वेगळ्या कॉलम मध्ये दर्शविले जायचे परंतु आता तसे न करता उमेदवाराचे नाव त्यानंतर आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व शेवटी आडनाव या स्वरूपामध्ये नाव नोंदविणे बंधनकारक असणार आहे. हा महत्वपूर्ण निर्णय 1 मे 2024 नंतर जन्मलेल्या बालकांसाठी लागू राहील.

कागदपत्रे –

१. जन्म दाखला

२. शाळा प्रवेश आवेदनपत्र

३. सर्व शैक्षणिक कागदपत्रे

४. जमिनीचा सातबारा, प्रॉपर्टीचे सर्व कागदपत्रे

५. शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक

६. सर्व शासकीय किंवा निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या सॅलरी स्लीपमध्ये (वेतन चिठ्ठी)

७. शिधावाटप पत्रिका (रेशनकार्ड)

८. मृत्यु दाखला

विवाहित स्त्रियांच्या बाबतीमध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतीप्रमाणे त्यांच्या विवाहानंतरचे म्हणजे विवाहित स्त्रीचे नाव नंतर तिच्या पतीचे नाव व शेवटी आडनाव अशा स्वरूपामध्ये नाव नोंदविण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात यावी. तसेच महिलेला विवाहपूर्वीच्या नावाने मालमत्तेच्या दस्तऐवजामध्ये नोंदवण्याची मुभा ठेवण्यात येत आहे.

अनाथ आणि तत्सम अपवादात्मक प्रकरणांमध्ये मुलांच्या जन्म आणि मृत्यु दाखल्यात नोंद घेण्याबाबत सुट देण्यात येत आहे.

Mother name mandatory in Maharashtra | आपल्या नावापुढे आईचे नाव लावणे बंधनकारक… | Mother Name On Government Documents याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी : आईचे-नाव-बंधनकारक-1.5.2024-पासूनDownload

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Leave a Comment