महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये तांत्रिक पदांच्या ८३ जागा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) यांच्या आस्थापनेवरील चंद्रपूर विभागात विविध पदांच्या एकूण ८३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
तांत्रिक पदांच्या एकूण ८३ जागा
शिकाऊ उमेदवार (मेकॉनिक मोटर व्हेईकल (एम.एम.व्ही), मोटर व्हेईकल बॉडी बिल्डर/ शिट मेटल (एम.एम.बी.बी.), ऑटो इलेक्ट्रिशियन, वेल्डर, पेंटर आणि मेकॉनिक डिझेल पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
यांत्रिक पदाकरिता फक्त सरकारमान्य आय. टी. आय. चे प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल. यापूर्वी ज्यांनी रा.प. मध्ये किंवा इतर ठिकाणी शिकाऊ उमेदवारी पूर्ण केली असेल किंवा सध्या करित असेल, त्यांनी अर्ज सादर करू नये.
दि.२८.११.२०२२ रोजी उमेदवारांचे वय १८ वर्षापेक्षा कमी व ३३ वर्षापेक्षा जास्त नसावे. मागसवर्गीयांसाठी वयोमर्यादा ०५ वर्षे शिथील आहे.) त्याकरिता शासनाच्या सुधारित नमुण्यातील १९९५ नंतरची दाखल्याची प्रमाणित केलेली छायांकित (झेरॉक्स प्रत जातीच्या प्रमाणपत्राची छायांकित प्रत सादर करावी. विहित रा.प. नमुण्यातील अपील अर्ज विभागीय कार्यालय, दे.. तुकूम, चंद्रपूर येथून घेउन त्यासोबत मागासवर्गीय उमेदवार असल्यास रु.२९५ /- (जि.एस.टी. सह) (शासनाचा सुधारित नमुण्यातील १९९५ नंतरची जातीच्या दाखल्याची प्रमाणित (अटेस्टेड) असणे आवश्यक) व बिगर मागासवर्गीय उमेदवारास रु.५९० /- (जि.एस.टी. सह) या एम.एस.आर.टी.सी. फंड अकाउंट, चंद्रपूर यांचे नावे काढलेला चंद्रपूर जिल्हा स्तरावरील बँकेत अभिदानित होणारा राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट जोडणे आवश्यक आहे. डिमांड ड्राफ्टच्या मागे उमेदवारांनी त्यांचे नाव व पत्ता आणि पदाचे नाव ठळक अक्षरात लिहिणे अत्यंत आवश्यक आहे. उमेदवाराने पाठविलेले शुल्क परत केले जाणार नाही. अर्ज सादर करतांना अर्जावर उमेदवाराचा फोटो चिटकविणे आवश्यक राहिल. भरती प्रक्रिये दरम्यान उमेदवाराने राजकिय किंवा इतर अधिका-याकडून दबाव आणल्यास आपली अमेदवारी रद्द करण्यात येईल यांची नोंद घ्यावी. सदरच्या भागात नमूद केलेल्या सर्व व्यवसायातील शिकाऊ उमेदवारांची पदे कमी किंवा जास्त अथवा रद्द करण्याचे अधिकार रा.प. महामंडळास राहील.
दि.२८.११.२०२२ पर्यंत सायंकाळी १७.३० पर्यंत अर्ज स्विकारले जातील. अर्जासोबतच्या औदयोगिक प्रशिक्षण संस्था प्रमाणपत्र (चार सेमिस्टर गुणपत्रिका), जन्मतारखेकरिता शाळा सोडल्याचा दाखला. जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड व इतर आवश्यक प्रमाणपत्राच्या साक्षांकित केलेल्या झेरॉक्स प्रती जोडाव्यात.
ऑफलाईन अर्ज करण्याची तारीख – दिनांक २० नोव्हेंबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.