Mukhyamantri Annapurna Yojana  | वर्षाला तीन मोफत सिलेंडर…GR आला…| मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 | Best Government schemes 2024 –

Mukhyamantri Annapurna Yojana  | वर्षाला तीन मोफत सिलेंडर…GR आला…| मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 | Best Government schemes 2024 –

    आपल्या सर्वांनाच माहीतच असेल की 28 जून 2024 रोजी जो अर्थसंकल्प सादर केला गेला त्यामध्ये सरकार मार्फत विविध योजनांची घोषणा करण्यात आली आणि त्यामध्ये एका महत्त्वपूर्ण अशा योजनेची घोषणा करण्यात आली होती ती योजना आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना (Mukhyamantri Annapurna Yojana).

Advertisement
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत राज्यांमधील पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा जीआर 30 जुलै 2024 या दिवशी जाहीर करण्यात आलेला आहे, याबद्दलच सविस्तर माहिती आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणून घेणार आहोत. 

Mukhymantri Annapurna Yojana  | मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 –

Mukhyamantri Annapurna Yojana

– 2016 मध्ये शासनामार्फत प्रधानमंत्री उज्वला योजना सुरू करण्यात आलेली होती. या योजनेचा उद्देश देशांमधील गरीब परिवारांना स्वयंपाकासाठी इंधन पुरवणे व कुटुंबामधील महिलांच्या आरोग्यमानांमध्ये सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे असा उद्देश या योजनेचा होता.

– प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत विविध कुटुंबांना गॅस कनेक्शन मिळाले परंतु गॅस सिलेंडर पुन्हा भरणे हे आर्थिक दृष्ट्या बऱ्याच लाभार्थ्यांना शक्य होत नाही आणि त्यामुळे सिलेंडर संपल्यानंतर स्वयंपाकाकरता काही ठिकाणी वृक्षतोड सुद्धा केली जाते आणि पर्यावरणाची हानी होते तसेच प्रदूषणामुळे स्वयंपाक करणाऱ्या स्त्रियांना सुद्धा त्रास होतो अशा काही बाबी लक्षात आल्यामुळे महाराष्ट्र सरकार तर्फे 2024 – 25 चा अर्थसंकल्प सादर करतेवेळी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेची घोषणा करण्यात आली. 

– मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यांमधील प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना त्यासोबतच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा तीन गॅस सिलेंडर वर्षाला मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

– आता असा निर्णय घेण्यात आलेला आहे की केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्वला योजनेचे राज्यांमधील जवळपास 52.16 लक्ष लाभार्थी त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पात्र लाभार्थी यांच्या कुटुंबांना तीन गॅस सिलेंडर दर वर्षाला मोफत उपलब्ध करून देण्यात येतील आणि ही योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबविण्यात येणार आहे.

Mukhyamantri Annapurna Yojana Eligibility Criteria | मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 पात्रता –

– मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी गॅस कनेक्शन हे महिलेच्या नावाने असणे आवश्यक असणार आहे. 

– सध्याच्या स्थितीमध्ये राज्यामधील प्रधानमंत्री उज्वला योजने साठी पात्र असलेले जवळपास 52.16 लक्ष लाभार्थी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र असणार आहेत. 

– त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी पात्र असलेले लाभार्थी सुद्धा या योजनेसाठी पात्र असणार आहेत.

– एका कुटुंबामध्ये ( रेशन कार्ड नुसार ) फक्त एक लाभार्थी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र असणार आहे.

– मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेचा लाभ फक्त 14.2 किलोग्राम वजनाच्या गॅस सिलेंडर कनेक्शन असणाऱ्या लाभार्थ्यांना मिळणार आहे. 

Mukhyamantri Annapurna Yojana Procedure | मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 कार्यपद्धती –

– ज्याप्रमाणे प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे वितरण हे तेल कंपन्यांद्वारे करण्यात येते त्याचप्रमाणे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने मार्फत दिल्या जाणाऱ्या तीन मोफत सिलेंडरचे वितरण सुद्धा तेल कंपन्यांमार्फत करण्यात येणार आहे. 

– सध्या प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या गॅस सिलेंडरची किंमत सरासरी 830 रुपये घेतली जाते, त्यानंतर केंद्र शासनामार्फत प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत दिली जाणारी सबसिडी ( तीनशे रुपये ) थेट लाभार्थ्याच्या बँक अकाउंट मध्ये जमा केली जाते.

– याच धरतीवर तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडून द्यावयाची अंदाजे रक्कम 530 रुपये प्रति सिलेंडर ग्राहकांच्या बँक अकाउंट मध्ये जमा करावी. तेल कंपन्यांमार्फत राज्य शासनाच्या योजनेच्या लाभ देण्यात आलेल्या लाभार्थ्यांची यादी ही सदर कंपन्यांनी त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करावी. दर आठवड्याला लाभार्थ्यांची माहिती शासनाला उपलब्ध करून द्यावी. 

– मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाभार्थ्यास एका महिन्यामध्ये एकापेक्षा जास्त सिलेंडर साठी सबसिडी देण्यात येणार नाही.

Mukhyamantri Annapurna Yojana  | मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 अधिक माहिती वाचण्यासाठी : येथे क्लिक करा. 

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा जीआर : येथे क्लिक करा.

इछुक उमेदवारांनी अटी आणि पात्रता व्यवस्थित जाणून घेऊन पात्र असल्यास मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना (Mukhyamantri Annapurna Yojana) या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment