ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थ दर्शन यात्रेची संधी | Mukhymantri Teerth Darshan Yojana | मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना | Best Government schemes 2024

ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थ दर्शन यात्रेची संधी | Mukhymantri Teerth Darshan Yojana | मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना | Best Government schemes 2024

    आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक तीर्थक्षेत्रे आहे तसेच महाराष्ट्राला संतांची भूमी असे सुद्धा म्हणतात. महाराष्ट्राबरोबरच भारतामधील इतर राज्यांमध्ये सुद्धा विविध तीर्थक्षेत्रे आहेत. प्रत्येकाच्यासमनामध्ये विविध तीर्थक्षेत्रांना जावे किंवा तीर्थयात्रांना जावे अशी इच्छा असते मात्र आर्थिक अडचणींमुळे किंवा त्या ठिकाणी कसे जायचे याबद्दल पुरेसी माहिती नसल्याकारणाने बऱ्याच लोकांचे हे स्वप्न अपूर्ण राहते. परंतु महाराष्ट्र सरकारने आता एक नवीन योजना आणली आहे ज्या मार्फत 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्वधर्मीय ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्रातील तसेच भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत दर्शनाची संधी उपलब्ध होणार आहे, या योजनेची नाव आहे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ( Mukhymantri Teerth Darshan Yojana ). जाणून घेऊयात या योजनेबद्दल अधिक माहिती…

Advertisement

Mukhymantri Teerth Darshan Yojana | मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना –

Table of Contents

Mukhymantri Teerth Darshan Yojana

– महाराष्ट्र राज्यामध्ये साठ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या सर्व धर्मीय ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्रामध्ये तसेच आपल्या देशातील इतर तीर्थक्षेत्रांना मोफत दर्शनाची संधी उपलब्ध करून देणे हे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचे उद्दिष्ट आहे.

– मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत कोणत्या तीर्थस्थळांचा समावेश होणार आहे तर या तीर्थस्थळांची यादी शासन निर्णयामध्ये परिशिष्ट अ आणि ब याप्रमाणे असेल. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा शासन निर्णय पुढे देणारच आहोत. 

– शासन निर्णयामध्ये दिलेल्या यादींमध्ये जे तीर्थस्थळे आहेत त्या स्थळांमध्ये वाढ होऊ शकते किंवा ती स्थळे कमी सुद्धा होऊ शकतात. 

– मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत दिलेल्या तीर्थस्थळांपैकी एकाच तळाच्या यात्रेसाठी पात्र लाभार्थ्याला योजनेचा एक वेळ लाभ घेता येईल आणि प्रवास खर्चाची प्रति व्यक्ती कमाल मर्यादा 30 हजार रुपये राहणार आहे , यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, निवास, भोजन यांसारख्या गोष्टींचा समावेश असेल. 

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचे लाभार्थी :

– महाराष्ट्रामधील साठ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेले ज्येष्ठ नागरिक. 

Mukhymantri Teerth Darshan Yojana Eligibility | मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना पात्रता –

– मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. 

– महाराष्ट्रामधील साठ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेले ज्येष्ठ नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

– मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे. 

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ( Mukhymantri Teerth Darshan Yojana )अपात्रता –

– कुटुंबामधील सदस्य आयकर दाता असल्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही. 

– ज्या व्यक्तींच्या कुटुंबांमधील व्यक्ती नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम / मंडळ / राज्य सरकार किंवा भारत सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये काम करत असे किंवा रिटायरमेंट नंतर निवृत्ती वेतन घेत असेल तर असे सदस्य सुद्धा मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी अपात्र असतील. परंतु 2.50 लाखांपर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणा मार्फत काम करत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार तसेच कंत्राटी कर्मचारी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी पात्र ठरतील. 

– ज्या कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार असतील ते सुद्धा या योजनेसाठी अपात्र असतील.

– ज्या व्यक्तींच्या कुटुंबांमधील सदस्य राज्य सरकार किंवा भारत सरकारच्या बोर्ड किंवा कॉर्पोरेशन किंवा उपक्रमाचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष किंवा संचालक किंवा सदस्य आहेत असे व्यक्ती सुद्धा या योजनेसाठी अपात्र असतील. 

– ट्रॅक्टर वगळून ज्यांच्याकडे चार चाकी वाहने आहे किंवा कुटुंबातील सदस्याच्या नावे आहे असे व्यक्ती सुद्धा या योजनेसाठी अपात्र असतील. 

– प्रवास करण्यासाठी शारीरिक तसेच मानसिक दृष्ट्या सक्षम असणे अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर कोणत्याही संसर्गजन्य रोगाने जसे की टीबी, हृदयाशी संबंधित श्वसन रोग, कोरोनरी अपुरे पणा, करोनरी थ्रोम्बोसिस, मानसिक आजार संसर्गजन्य कुष्ठरोग यांसारख्या आजारांनी ग्रस्त नसावे. 

– सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याने संपूर्णपणे आरोग्य तपासणी केल्या नंतर सदर व्यक्ती शारीरिक दृष्ट्या निरोगी आणि प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र ज्येष्ठ नागरिकांना अर्जासोबत सादर करावे लागेल आणि हे प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखेपासून पंधरा दिवसांपेक्षा जास्त पूर्वीचे नसावे. 

– ज्या अर्जदारांची मागील वर्षी लॉटरीमध्ये निवड झाली होती परंतु प्रवासासाठी बोलावून सुद्धा त्यांनी प्रवास पूर्ण केला नाही अशा माझी अर्जदारांना या योजनेसाठी अपात्र ठरवले जाणार आहे.

– जर समजा अर्जदाराने खोटी माहिती देऊन किंवा काही तथ्य लपवून अर्ज केला असेल तर असे अर्जदार प्रवासासाठी अपात्र ठरतील आणि त्यांना कधीही या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवता येईल. 

* मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी असणारी पात्रता आणि अपात्रता यामध्ये सुधारणा करण्याची गरज भासल्यास शासन मान्यतेने कार्यवाही करता येईल. 

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे I Documents required for Mukhymantri Teerth Darshan Yojana

– ऑनलाइन अर्ज 

– आधार कार्ड / रेशन कार्ड 

– महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र / महाराष्ट्रातील जन्म दाखला ( जर समजा अधिवास प्रमाणपत्र नसेल तर त्या ऐवजी पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्मदाखला यापैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र गृहीत धरण्यात येईल.)

– उत्पन्नाचा दाखला ( वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपर्यंत असणे अनिवार्य ) किंवा पिवळे / केशरी रेशन कार्ड 

– वैद्यकीय प्रमाणपत्र 

– पासपोर्ट साईज फोटो 

– जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल नंबर 

– या योजनेच्या अटी शर्तींची पालन करण्याबाबतचे हमीपत्र. 

रेल्वे प्रवास तसेच बस प्रवासासाठी एजन्सी आणि टुरिस्ट कंपन्यांची निवड :

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत रेल्वे किंवा बस प्रवासाचे आयोजन करण्याकरता अधिकृत टुरिस्ट कंपन्या आणि रेल्वे प्रवासासाठी आय आर सी टी सी समकक्ष अधिकृत असणाऱ्या नोंदणीकृत कंपन्यांची निवड विहित निविदा प्रक्रिये मार्फत करण्यात येईल. 

लाभार्थ्यांची निवड :

जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीमार्फत प्रवाशांची निवड करण्यात येईल. 

– प्रत्येक ठिकाणासाठी जिल्हा निहाय कोटा निश्चित केला जाईल हा कोटा त्या जिल्ह्याच्या लोकसंख्येचे प्रमाणात अधीभार देऊन निश्चित केला जाईल.

– जर समजा जेवढा कोटा निश्चित केला आहे त्यापेक्षा अधिक अर्ज आले तर लॉटरी द्वारे प्रवाशांची निवड केली जाईल आणि उर्वरित लोकांसाठी प्रतीक्षा यादी तयार केली जाईल. 

– निवड झालेल्या प्रवाशांचा  जर प्रवासाला येण्यास नकार असेल तर प्रतीक्षा यादी मध्ये समावेश असलेले इतर व्यक्ती प्रवासास पाठवता येतील. 

–  प्रतीक्षा यादी आणि निवडलेले प्रवासी यांची यादी विभागाच्या पोर्टलवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय आणि समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या सूचना फलकावर यांसारख्या ज्या ठिकाणी योग्य वाटेल अशा माध्यमातर्फे प्रसारित केली जाईल. 

– ज्या व्यक्तीची निवड झाली आहे ती व्यक्ती प्रवासाला जाऊ शकते त्या व्यक्तीसोबत इतर व्यक्ती जाऊ शकत नाही. 

– जर समजा पती-पत्नी या दोघांनीही तीर्थयात्रेसाठी स्वतंत्रपणे अर्ज केलेला असेल आणि एकाची लॉटरीमध्ये निवड झाली आणि दुसऱ्या व्यक्तीची झाली नाही तर आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, पुणे हे इतर व्यक्तीला यात्रेसाठी पाठवण्याचा निर्णय घेऊ शकतील. 

प्रवास प्रक्रिया कशी असेल ?

– जिल्हास्तरीय समितीमार्फत निवड झालेल्या प्रवाशांची यादी आयुक्त, समाजकल्याण, पुणे यांच्याकडे सुपूर्त करण्यात येईल. 

– त्यानंतर निवड झालेल्या प्रवाशांची यादी अधिकृत टुरिस्ट कंपनी किंवा एजन्सीला दिली जाईल. 

– नियुक्त अधिकृत टुरिस्ट कंपनी किंवा एजन्सी प्रवाशांच्या गटाच्या प्रस्थानाची  व्यवस्था करतील.

– प्रवासासाठी कोणत्या सुविधा देण्यात याव्यात याचा निर्णय राज्य शासन घेईल. 

– या योजनेच्या लाभार्थ्यांनी प्रवासासाठी नियोजित स्थळी स्वखर्चाने पोहोचायचे आहे. 

रेल्वे किंवा बसने प्रवास –

– प्रवाशांची सुरक्षा तसेच आरोग्याशी संबंधित व्यवस्था जिल्हास्तरावर स्थापित केलेल्या समितीद्वारे करण्यात येईल. 

– समजा प्रवास सुरू झाला आणि प्रवासाच्या मध्यभागी किंवा एखाद्या ठिकाणी लाभार्थी व्यक्तीला प्रवास थांबवायचा असेल तर सरकारमार्फत तशी सुविधा दिली जाणार नाही परंतु विशेष परिस्थितीमध्ये प्रवास थांबवणे आवश्यक असल्यास उपस्थित असणाऱ्या मार्गदर्शकाच्या परवानगीने स्वखर्चाने तसे करण्याची परवानगी दिली जाऊ शकते. 

* मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी जो प्रवास आयोजित केला जाईल तो एकत्रितपणे करण्यात येईल आणि शासनामार्फत विहित केलेली किमान प्रवासी संख्या उपलब्ध झाल्यानंतरच कोणत्याही तीर्थदर्शनाचा प्रवास सुरू होईल. प्रवाशांचा गट राज्य शासन किंवा शासनाने अधिकृत केलेल्या प्राधिकरण किंवा एजन्सी मार्फत निश्चित केला जाईल. 

* प्रवासादरम्यान प्रवाशाला निश्चित केल्या गेलेल्या सुविधा मिळतील परंतु त्या व्यतिरिक्त इतर सुविधा घ्यायच्या असतील तर अतिरिक्त खर्च संबंधित प्रवाशाला करावा लागेल. 

प्रवासादरम्यान प्रवाशांकडून अपेक्षा –

– ज्वलनशील किंवा मादक पदार्थ कुठल्याही स्वरूपात वाहून नेण्यास प्रतिबंध राहील. 

– राज्याची किंवा देशाची प्रतिमा खराब होणार नाही असे वर्तन प्रवाशाचे असावे. 

– प्रवाशांना नियुक्त संपर्क अधिकारी / व्यवस्थापक यांच्या सूचनांचे पालन करावे लागेल. 

– वरील प्रमाणे आचारसंहितेचे पालन करण्याबाबतचे प्रतिज्ञापत्र प्रवाशांकडून घेतले जाईल. 

– प्रवाशांना शिस्तीमध्ये सहकार्य करावे लागेल तसेच इतर प्रवाशांची गैरसोय होणार नाही अशा प्रकारचे कुठलेही वर्तन करू नये. 

– ट्रेनमध्ये साधारणतः बर्थ वर झोपण्याची वेळ रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत असेल आणि प्रवासी त्यांच्या संबंधित बर्थ वर झोपतील. विभागीय आवश्यकतेनुसार यावेळी काही बदल केले जाऊ शकतात. 

अर्ज करण्याची प्रक्रिया I Application process of Mukhymantri Teerth Darshan Yojana :

– या योजनेसाठी पात्र जेष्ठ नागरिक ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. 

– ज्यांना ऑनलाईन अर्ज करता येत नसतील त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रामध्ये उपलब्ध असेल. 

– अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया फ्री आहे. 

– अर्जदाराने स्वतः अर्ज भरतेवेळी उपस्थित राहणे आवश्यक आहे जेणेकरून पात्र लाभार्थीचा फोटो काढता येईल तसेच केवायसी करता येईल. याकरता अर्जदाराकडे पुढील माहिती असणे आवश्यक आहे : 

कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र ( रेशन कार्ड ) आणि स्वतःचे आधार कार्ड. 

Mukhymantri Teerth Darshan Yojana GR | मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना शासन निर्णय वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

( तीर्थस्थळांची यादी शासन निर्णयामध्ये परिशिष्ट अ आणि ब याप्रमाणे असेल.)

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment