NACO Internship 2024 | National AIDS Control Organization (NACO) Internship Programme 2024 | नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन इंटर्नशिप
आजच्या ब्लॉगमध्ये आपण नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन (National AIDS Control Organization –NACO Internship 2024) इंटर्नशिप प्रोग्राम 2024 याबद्दल माहिती बघणार आहोत. अशा प्रकारच्या इंटर्नशिप केल्यामुळे आपल्या रिझ्युममध्ये नक्कीच भर पडते तसेच आपल्याला अनुभव सुद्धा मिळतो आणि नोकरी मिळण्यामध्ये सुद्धा नक्कीच मदत होऊ शकते. चला तर जाणून घेऊयात या इंटर्नशिप साठी पात्रता काय आहे, कागदपत्रे कोणते लागतात आणि इतर माहिती….
NACO Internship 2024 | National AIDS Control Organization (NACO) Internship Programme 2024 | नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन इंटर्नशिप
–
Table of Contents
नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन (National AIDS Control Organisation -NACO) इंटर्नशिप प्रोग्राम 2024 ही भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ( Ministry of Health & Family Welfare, Government of India ) पदवी, पदव्युत्तर, एम.फिल. आणि पीएच.डी.चे शिक्षण घेणाऱ्या विविध विषयांतील पदवी अभ्यासक्रम असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑफर केलेली एक चांगली संधी आहे. निवड झालेल्या इंटर्न्सना इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर 8,000 रुपयांचा मासिक स्टायपेंड मिळेल.2018 मध्ये NACO ने सरकारशी एंगेज होऊ इच्छिणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांसाठी हा इंटर्नशिप प्रोग्रॅम सुरू केला.
NACO Internship 2024Eligibility | पात्रता –
– भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
– पदवी, पदव्युत्तर, एम.फिल.
– आणि पीएच.डी. विविध विषयांतील पदवी अभ्यासक्रम मान्यताप्राप्त आणि नामांकित विद्यापीठातून प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन , सार्वजनिक आरोग्य, आरोग्य व्यवस्थापन, स्टॅटिस्टिक्स, सोशल सायन्सेस इत्यादींसह .
टीप:- उत्कृष्ट अकॅडमीक अचीवमेंट्स असलेल्या अर्जदारांना, विशेषत: रिसर्च स्कॉलर्सला प्राधान्य दिले जाईल. तसेच, NACO च्या ऍक्टिव्हिटीज संबंधित किंवा NACP सह अलाईन प्रोजेक्ट अनुभव असलेले उमेदवार.
NACO Internship 2024Benefits | फायदे –
– निवड करण्यात आलेल्या इंटर्न्सना इंटर्नशिप पूर्ण झाल्यावर 8,000 रुपयांचा मासिक स्टायपेंड आणि कॉम्प्लिशन सर्टिफिकेट मिळेल.
( संबंधित अधिकाऱ्यांकडे इंटर्नशिप रिपोर्ट सादर करणे , इंटरची कामगिरी समाधानकारक असणे या गोष्टी सर्टिफिकेट आणि स्टायपेंड मिळण्यासाठी महत्त्वाच्या आहेत.)
– सीटिंग अरेंजमेंट, स्टेशनरी आणि फोटोकॉपीर/प्रिंटरचा एक्सेस यासारख्या फंक्शनल आवश्यकता लक्षात घेऊन ऑन-साइट इंटर्नना ऑफिस लॉजिस्टिकल सपोर्ट दिला जाईल. परंतु उमेदवारांना स्वतःसाठी लॅपटॉप आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीची व्यवस्था करावी लागेल.
* बोर्डिंग आणि लॉजिंग : इतर कोणतेही खर्च जसे की ट्रॅव्हलिंग खर्च इत्यादी स्वीकारले जाणार नाहीत आणि इतर कोणतेही क्लेम्स स्वीकारले जाणार नाहीत.
*दिल्ली/नवी दिल्ली बाहेरून येणाऱ्या इंटर्न्सना स्वतःच्या खर्चाने राहण्याची/निवासाची व्यवस्था स्वतः करावी लागते.
Documents required for NACO Internship 2024 | कागदपत्रे –
– व्यवस्थित भरलेला अर्ज
– करिक्युलम विटा ( Curriculum Vitae CV)
– अधिकृत स्टेशनरीवर संस्थेच्या प्रमुखांचे परिचय पत्र जेथे अर्जदाराने शिक्षण घेतले/शिकत आहे.
– विद्यापीठ/संस्थेकडून ना-हरकत प्रमाणपत्र ( NOC ) , जर इंटर्नशिप चालू अभ्यासक्रमासोबत एकाच वेळी करावयाची असेल तर
– शैक्षणिक पात्रतेसाठी अर्जामध्ये नमूद केलेल्या सर्व अकंप्लिशमेंट्ससाठी सेल्फ अटेस्टेड सर्टिफिकेट्स आणि ट्रान्सस्क्रिप्ट्स .
– “विद्यार्थ्याच्या शैक्षणिक पाठपुराव्याला तसेच राष्ट्रीय एड्स कंट्रोल प्रोग्रॅमला या इंटर्नशिपचा कसा फायदा होईल” या विषयावर लिहणे, 500 शब्दांपेक्षा जास्त नको.
(टीप:- या लेखनाशिवाय अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.)
– ओळखीच्या किमान तीन कागदोपत्री पुराव्याची प्रत, ज्यात भारतीय नागरिकांसाठी पासपोर्ट आणि आधार कार्ड/मतदार आयडी/पॅन कार्डची प्रत आणि OCI कार्डधारकांसाठी पासपोर्ट, OCI कार्ड आणि राष्ट्रीय ओळखपत्र यांचा समावेश असावा.
* ज्या उमेदवारांची इंटर्नशिप पूर्ण केली आहे किंवा ज्यांनी नियोजित कालावधी पूर्वी इंटर्नशिप मध्येच थांबवली आहे त्यांचा भविष्यातील बॅचेससाठी विचार केला जाणार नाही.
इंटर्नची संख्या | Number of Interns NACO Internship 2024–
इंटर्नची संख्या NACO च्या अर्ज आणि आवश्यकतांवर अवलंबून बदलू शकते. परंतु, कोणत्याही वेळी, इंटर्नची संख्या 10 पेक्षा जास्त नसावी.
नावनोंदणी | Enrolment-
इंटर्नशिपसाठी एनरोलमेंट वर्षभर खुली ठेवले आहे आणि विविध प्रोग्रॅमच्या आवश्यकतेनुसार ऑफर केले जाईल.
कालावधी | NACO Internship 2024Duration –
इंटर्नशिप किमान 6 आठवडे आणि कमाल 3 महिन्यांच्या कालावधीसाठी असेल,स्टडी प्रोग्रॅमच्या पूर्व शर्तींनुसार.
प्लेसमेंट | NACO Internship 2024Placement –
इंटर्नना NACO अंतर्गत निवडलेल्या प्रोग्राम डिव्हिजन मध्ये पेस्टड केले जाईल किंवा अभ्यास कार्यक्रमाच्या पूर्वतयारीनुसार ( prerequisites of the study programme ) वेगवेगळ्या विभागांमधून रोटेट केले जाईल.
टीप: इंटर्नशिप प्रोग्राम हा नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन किंवा भारत सरकारमधील इतर कोणत्याही मंत्रालय/विभागात नोकरी किंवा नोकरीसाठीचे असे कोणतेही आश्वासन नाही.
NACO Internship 2024Terms and Conditions | नियम आणि अटी –
– NACO कोणतेही कारण न देता कोणत्याही वेळी इंटर्नची इंटर्नशिप संपुष्टात आणू शकते.
– याबाबत NACO चा निर्णय अंतिम असेल. एखाद्या इंटर्नला इच्छा असल्यास, Ministry ला एक आठवड्याची पूर्वसूचना देऊन प्रोग्रॅम सोडणे निवडू शकतात. अशा परिस्थितीत, त्यांना कोणतेही स्टायपेंड किंवा सर्टिफिकेट मिळू शकणार नाही.
– योग्यरित्या भरलेला आणि आवश्यक कागदपत्रांसह अर्ज इंटर्नशिप सुरू होण्याच्या किमान एक महिना आधी पाठवले जावेत.
Contact Details | कॉन्टॅक्ट डिटेल्स –
राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना (National AIDS Control Organisation – NACO)
आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग ( Department of Health & Family Welfare ) भारत सरकार