New Election Jobs | निवडणुकीमुळे 9 लाख लोकांना नोकरीच्या संधी मिळण्याची शक्यता…
Table of Contents
सध्या निवडणुकीमुळे नऊ लाख लोकांना नोकरीच्या संधी ( New Election Jobs ) मिळण्याची शक्यता आहे अशी चर्चा सगळीकडे सुरू आहे.
सध्या निवडणुकीमुळे नऊ लाख लोकांना नोकरीच्या संधी ( New Election Jobs ) मिळण्याची शक्यता आहे अशी चर्चा सगळीकडे सुरू आहे.
देशामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू केलेल्या मतदान केंद्रातून विविध कामांचे नियोजन करावे लागते आणि याचसाठी जास्त प्रमाणावर मनुष्यबळ सुद्धा नियुक्त करावे लागते. म्हणूनच या काळामध्ये नऊ लाख लोकांच्या हाताला काम मिळणार आहे. असे वर्क इंडिया या संस्थेचे सीईओ आणि संस्थापक निलेश डुंगरवाल यांनी सांगितले.
देशभरामध्ये २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये तयार झालेल्या तात्पुरत्या नोकऱ्यांची नेमकी संख्या ही निवडणुकीचे प्रमाण, मतदान केंद्रांची संख्या तसेच निवडणुकीशी संबंधित हालचालींची आवश्यकता यांसारख्या अनेक घटकांवर अवलंबून असेल. त्यांच्या व्यासपीठावर त्यांनी निवडणुकीदरम्यान किमान ९ लाख नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा बाळगतो,असे निलेश डुंगरवाल ( WorkIndia चे CEO आणि सह संस्थापक ) यांनी सांगितले.
निवडणुकांमुळे निर्माण होणाऱ्या या नऊ लाख नोकऱ्या निवडणुकीच्या घोषणेच्या दोन आठवडे आधीपासून सुरू झाले आहे आणि निवडणूक संपेपर्यंत हे सुरू राहू शकते. निवडणुकीचे विविध टप्पे आहे त्यामध्ये 19 एप्रिल आणि 26 एप्रिल या दिवशीचे दोन टप्पे झाले आहेत आणि इतर टप्पे अजूनही बाकी आहेत.
– निवडणुकीच्या काळामध्ये विविध कामांसाठी मनुष्यबळाची नियुक्ती करावी लागते मग त्यामध्ये मतदान केंद्र अधिकारी, डेटा एन्ट्री ऑपरेटर, वाहन चालक, क्लार्क, सोशल मीडिया प्रचारक, ग्राफिक्स डिझायनर्स, कंटेट रायटर्स, सुरक्षा अधिकारी तसेच इतर अनेक प्रशासकीय कामांसाठी मनुष्यबळाची आवश्यकता असते.
– छपाई, सर्वेक्षण, साहित्य डिझाईन, मीडिया समन्वय, सोशल मीडिया संचालन, डेटा विश्लेषण, जनसंपर्क, नियोजन अशा विविध क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत तसेच कर्मचाऱ्यांच्या खाण्यापिण्याच्या सोयीसाठी सुद्धा मनुष्यबळाची आवश्यकता असते.
– अशाप्रकारे निवडणुकी विविध नोकरीच्या (New Election Jobs) संधी उपलब्ध झाल्या आहेत.
– निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून ते अंतिम टप्प्यापर्यंत हे मनुष्यबळ आवश्यक असतं, त्यासोबतच नेमलेल्या मनुष्यबळाने वेळेवर आणि व्यवस्थित रित्या काम पार पाडणे हे सुद्धा आवश्यक आहे.
– आगामी निवडणुकीसाठी स्पर्धक तयारी करीत असताना मागील सहा महिन्यांपासून जवळपास दोन लाख तात्पुरत्या स्वरूपातील नोकऱ्यांची संधी उपलब्ध झाली आहे.
निवडणुकीच्या काळामध्ये निर्माण झालेल्या या नोकऱ्या खरच चांगली संधी आहे ,परंतु निर्माण झालेल्या या नोकऱ्या किंवा पुढील काळामध्ये निर्माण होणाऱ्या नोकऱ्या या तात्पुरत्या स्वरूपामध्ये असण्याची शक्यता असू शकते परंतु तरीसुद्धा बेरोजगारांसाठी किंवा इतर नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी चांगली संधी निवडणुकांमुळे निर्माण झाली आहे. तरी बऱ्याच बेरोजगार तरुणांना निवडणुकांमुळे निर्माण झालेल्या नोकऱ्यांचा ( New Election Jobs )लाभ होऊ शकतो फक्त नोकरीच नाही तर ज्यांचा काही व्यवसाय आहे उदाहरणार्थ प्रिंटिंग बिझनेस किंवा ग्राफिक डिझाईनिंग बिझनेस त्यांना सुद्धा कामाची अधिक संधी उपलब्ध झाली आहे.
जॉईन करा Whatsapp वर | https://wa.openinapp.link/ufn1x |
जॉईन टेलिग्राम ग्रुप | https://t.me/iconikMarathimotivation |
मला मेसेज करा | https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/ |
आपली वेबसाईट | https://iconikmarathi.com/ |
ai टूल्स साठी | https://yt.openinapp.co/iconik2 |
युट्युब | https://yt.openinapp.co/iconikMarathi |