Nikon Scholarship| Nikon स्कॉलरशिप Program 2024-25 | एक लाख रुपयांपर्यंतची स्कॉलरशिप मिळवण्याची संधी | निकॉन स्कॉलरशिप | Best scholarships 2024 –
आजच्या ब्लॉगमध्ये आपण निकॉन मार्फत बारावी उत्तीर्ण आणि फोटोग्राफी कोर्ससाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरिता जी स्कॉलरशिप दिली जाते त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. निकॉन स्कॉलरशिप साठी पात्रता काय लागते, कागदपत्रे कोणकोणती लागतात तसेच अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात…
Nikon Scholarship | Nikon स्कॉलरशिप Program 2024-25 | एक लाख रुपयांपर्यंतची स्कॉलरशिप मिळवण्याची संधी | निकॉन स्कॉलरशिप | Best scholarships 2024 –
Table of Contents
– नीकॉन स्कॉलरशिप प्रोग्रॅम हा निकोन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचा एक उपक्रम असून इयत्ता बारावी उत्तीर्ण असलेल्या आणि सध्या तीन महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचा फोटोग्राफी संबंधी मध्ये अभ्यासक्रम घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी डिझाईन केला गेलेला आहे.
– 1,00,000 रुपयांपर्यंत स्कॉलरशिप पात्र विद्यार्थ्यांना मिळू शकते.
निकॉन स्कॉलरशिप या स्कॉलरशिप साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 ऑक्टोबर 2024
– शिष्यवृत्ती अर्जदाराचे बँक अकाऊंट डिटेल्स (रद्द केलेला चेक/पासबुक प्रत)
– आधीच्या वर्गाची मार्कशीट किंवा ग्रेड कार्ड
– अपंगत्व आणि जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
– लेटेस्ट फोटो
Nikon Scholarship | निकॉन स्कॉलरशिप बद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि याकरिता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.
Nikon स्कॉलरशिप Online Apply| निकॉन स्कॉलरशिपसाठी अर्ज कसा करावा –
– निकॉन स्कॉलरशिप साठी अर्ज करण्याकरिता सर्वप्रथम वरील लिंक वर क्लिक करा.
– त्यानंतर ऑनलाईन एप्लीकेशन फॉर्म पेज ओपन होईल, जर समजा तुम्ही रजिस्टरर्ड असाल तर लॉगिन करा जर तसे नसेल तर ई-मेल आयडी किंवा मोबाईल नंबर किंवा google अकाउंट वापरून लॉगिन करू शकता.
– यानंतर स्टार्ट एप्लीकेशन या बटणावर क्लिक करा.
– आता निकॉन स्कॉलरशिपसाठीचा फॉर्म ओपन होईल त्या फॉर्ममध्ये आवश्यक ती सर्व माहिती व्यवस्थित रित्या भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
– फॉर्म भरून झाल्यानंतर पुन्हा व्यवस्थितरीत्या चेक करा आणि सबमिट या बटनावर क्लिक करून फॉर्म जमा करा.