NPS Vatsalya Scheme I एनपीएस वात्सल्य योजना I मुलांची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठीची योजना…मुलांच्या पेन्शनचीही सोय I Best Government Scheme 2024

NPS Vatsalya Scheme I एनपीएस वात्सल्य योजना I मुलांची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठीची योजना…मुलांच्या पेन्शनचीही सोय I Best Government Scheme 2024

आजच्या ब्लॉगमध्ये आपण एनपीएस वात्सल्य योजना ( NPS Vatsalya Scheme ) या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी (18 सप्टेंबर) रोजी  NPS वात्सल्य योजना सुरू केली, एनपीएस वात्सल्य योजना ही मुलांची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. एनपीएस वात्सल्य योजनेत गुंतवणुकीसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मही सुरू करण्यात आला.

NPS Vatsalya Scheme I एनपीएस वात्सल्य योजना I मुलांची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठीची योजना…मुलांच्या पेन्शनचीही सोय I Best Government Scheme 2024

NPS Vatsalya Scheme

NPS Vatsalya Scheme I एनपीएस वात्सल्य योजना 

  • अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी (18 सप्टेंबर) रोजी  NPS वात्सल्य योजना सुरू केली.
  • नॅशनल पेन्शन सिस्टम (National Pension System NPS) मार्फत एनपीएस वात्सल्य योजना ही डिझाईन करण्यात आलेली आहे. 
  • एनपीएस वात्सल्य योजना या योजनेअंतर्गत, अल्पवयीन मुलांना पर्मनंट रिटायरमेंट अकाऊंट नंबर (PRAN) दिले जातील.
  • अल्पवयीन मुलांचे आई वडील किंवा पालक त्यांच्या साठी खाते उघडू शकतात,एनपीएस वात्सल्य योजना या योजनेअंतर्गत वर्षभरामध्ये किमान 1000 रुपये गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
  • बँका, पोस्ट ऑफिस, नॅशनल पेन्शन फंड तसेच e-NPS अंतर्गत खाते उघडू शकतात,मुले जोपर्यंत अल्पवयीन आहेत तोपर्यंत त्यांचे आईवडील किंवा पालक हे खाते हाताळू शकतात नंतर मुले 18 वर्षाचे झाल्यानंतर ते स्वतः त्यांचे खाते सांभाळू शकतात.
  • NPS वात्सल्य मध्ये किमान योगदान प्रतिवर्ष रु. 1,000 आहे आणि जास्तीत जास्त योगदानावर मर्यादा नाही.
  • NPS वात्सल्य मध्ये प्रारंभिक नावनोंदणीचे योगदान रु. 1,000 आहे.

NPS Vatsalya Scheme Eligibility I एनपीएस वात्सल्य योजना पात्रता

  • वयोमर्यादा: ही योजना अल्पवयीन (18 वर्षाखालील) मुलांसाठी आहे.
  • आई वडील /पालक किंवा कायदेशीर पालक त्यांच्या अल्पवयीन मुलांसाठी NPS वात्सल्य खाते उघडू आणि व्यवस्थापित करू शकतात.
  • एनपीएस वात्सल्य योजना अशा भारतीय नागरिकांसाठी आहे ज्यांना त्यांच्या मुलांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूक करायची आहे.

NPS Vatsalya Scheme Invetsment I एनपीएस वात्सल्य योजना गुंतवणूक :

  • अल्पवयीन मुलांचे आई वडील किंवा पालक त्यांच्या साथी खाते उघडू शकतात,एनपीएस वात्सल्य योजना या योजनेअंतर्गत वर्षभरामध्ये किमान 1000 रुपये गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
  • NPS वात्सल्य मध्ये किमान योगदान प्रतिवर्ष रु. 1,000 आहे आणि जास्तीत जास्त योगदानावर मर्यादा नाही.
  • NPS वात्सल्य मध्ये प्रारंभिक नावनोंदणीचे योगदान रु. 1,000 आहे.
  • लॉक-इन कालावधी : 3 वर्ष
  • तीन वर्षांच्या नोंदणीनंतर तुम्ही एकूण जमा केलेल्या रकमेपैकी २५% काढू शकता. मूल 18 वर्षांचे होईपर्यंत हे 3 वेळा केले जाऊ शकते. शिक्षण, उपचार किंवा 75% पेक्षा जास्त अपंगत्व असल्यास देखील पैसे काढले जाऊ शकतात.

NPS Vatsalya Scheme required documents I एनपीएस वात्सल्य योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • पालकांचा ओळखीचा पुरावा: (पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट , ड्रायव्हिंग लायसन्स इ.)
  • पत्त्याचा पुरावा
  • अल्पवयीन व्यक्तीसाठी वयाचा पुरावा
  • अल्पवयीन व्यक्तीसाठी ओळखीचा पुरावा
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • फोटो

NPS Vatsalya Scheme benefits I एनपीएस वात्सल्य योजनेचे लाभ :

  • NPS वात्सल्य योजना मुलांमध्ये बचत करण्याच्या सवयीला प्रोत्साहन देईल. मुले 18 वर्षांची झाल्यावर खाते मानक NPS योजनेत रूपांतरित केले जाऊ शकते आणि मुले ते व्यवस्थापित करू शकतात आणि खात्यात स्वतंत्रपणे योगदान सुद्धा देऊ शकतात.
  • NPS वात्सल्य खाते हा एक चांगला सेवानिवृत्ती निधी पर्याय आहे कारण मुल अल्पवयीन असताना खात्यात योगदान सुरू होते.मुलाकडे सेवानिवृत्तीच्या वेळी मोठी रक्कम जमा होऊ शकते .निवृत्तीच्या वेळी, एनपीएस खात्यात जमा केलेल्या रकमेच्या 60% इतकी रक्कम काढता येते.
  • मूल जेव्हा मोठे होते आणि सेवानिवृत्तीचे वयापर्यंत पोहचते त्यावेळी त्याला आरामदायी सेवानिवृत्तीचे जीवन जगण्यासाठी चांगला परतावा मिळू शकतो,दीर्घकालीन गुंतवणूक केल्याने अधिक लाभ मिळू शकतो.
  • NPS वात्सल्य योजना कुटुंबांना त्यांच्या मुलांची भविष्यातील आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.
  • योजनेतील रक्कम आणि कालावधी निवडण्याची पद्धत लवचिक असल्याने आपण ती आपल्या सोयीनुसार निवडू शकतो.

NPS Vatsalya Scheme Application I NPS वात्सल्य योजनेसाठी अर्ज कसा करावा

  • eNPS वेबसाइटवर जा/enps.nsdl.com किंवा nps.kfintech.com ला भेट द्या.
  • ‘NPS वात्सल्य (मायनर)’ टॅब अंतर्गत ‘आता नोंदणी करा’ पर्यायावर क्लिक करा.
  • जन्मतारीख, पॅन क्रमांक, मोबाइल नंबर आणि पालकाचा ईमेल एंटर करा आणि ‘नोंदणी सुरू करा’ वर क्लिक करा.
  • पालकांच्या मोबाईल नंबर आणि ईमेलवर मिळालेला OTP एंटर करा.
  • OTP एंटर केल्यानंतर, स्क्रीनवर एक पावती क्रमांक तयार केला जाईल. ‘सुरू ठेवा’ वर क्लिक करा.
  • अल्पवयीन मुलाचे आणि पालकांचे तपशील एंटर करा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि ‘confirm ‘ वर क्लिक करा.
  • 1,000 रुपयांचे प्रारंभिक योगदान द्या.
  • अशा रीतीने PRAN जनरेट केले जाईल आणि NPS वात्सल्य खाते अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने उघडले जाईल.
जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Leave a Comment