Pan card 2.0 | पॅन कार्ड २.० | आता नवीन पॅन कार्ड येणार …| पॅन कार्ड मध्ये नक्की काय बदल झालेत ?

Pan card 2.0 | पॅन कार्ड २.० | आता नवीन पॅन कार्ड येणार …| पॅन कार्ड मध्ये नक्की काय बदल झालेत ?

   कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनोमिक अफेयर्स ( CCEA) कडून पॅन कार्ड २.० साठी नुकतीच मंजुरी मिळाली आहे. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की जुन्या पॅन कार्डचा करायचं काय आणि नवीन पॅन कार्ड कसे काढायचे तर नवीन 2.0 पॅन कार्ड साठी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही तसेच हे पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी अतिरिक्त पैसे सुद्धा द्यावे लागणार नाहीत. पॅन कार्ड 2.0 (Pan card 2.0)या स्कीम साठी जवळपास 1435 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.

Pan card 2.0 | पॅन कार्ड २.० | आता नवीन पॅन कार्ड येणार …| पॅन कार्ड मध्ये नक्की काय बदल झालेत ?

    केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव हे पॅन कार्ड २.० ची घोषणा करताना असे म्हणाले की, पॅन कार्ड हे आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा असा भाग आहे आणि जो मध्यमवर्गीय तसेच लहान व्यवसायांसाठी खूप महत्त्वाचा आहे. या अपग्रेडवर अतिशय काम केलं गेलं आहे आणि आता पॅन कार्ड २.० मंजूर झाले आहे.

    ज्या व्यक्तीकडे जुने पॅन कार्ड आहे त्यांना पॅन कार्ड 2.0 ची प्रोसेस ऑनलाईन करता येऊ शकते. मंगळवारी अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेल्या एका पत्रकानुसार सध्याचे पॅन कार्ड हे सुद्धा पॅन कार्ड २.० आल्यानंतर वैध राहणार आहे. पॅन कार्ड वरील सर्व डिटेल्स जसे की पॅन नंबर आणि इतर माहिती तसेच राहतील, नवीन पॅन कार्ड २.०वर किंवा आर कोड असेल हे क्यू आर कोड असलेले पॅन कार्ड नागरिकांना कुठलाही अतिरिक्त खर्च न करता नोंदणीकृत ईमेल आयडीवर पाठवले जाईल.जर नागरिकांना पॅन कार्ड ची हार्ड कॉपी हवी असेल तर पन्नास रुपये भरावे लागतील.

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

कॉमन बिजनेस आयडेंटिफायर म्हणजे नक्की काय आहे?

    पॅन कार्ड 2.0 हे कॉमन बिजनेस आयडेंटिफायर म्हणून विकसित केले जाणार आहे आणि याचा उपयोग वेगवेगळ्या व्यवसायांसाठी ओळख क्रमांक म्हणून सुद्धा करता येणार आहे.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव असे म्हणाले की, उद्योग तसेच व्यावसायिक जगताकडून कॉमन बिजनेस आयडेंटिफायर असण्याची मागणी होत असून व्यापाऱ्यांना व्यवसायाशी संबंधित कामांसाठी वेगवेगळे नंबर किंवा कार्ड ठेवावे लागणार नाहीत. पॅन कार्ड २.० हे समान ओळखपत्र म्हणून वापरता येईल का? हे बघण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहे. सध्याचे सॉफ्टवेअर दहा ते पंधरा वर्षे जुन्या असल्याकारणाने याकरिता एक नवीन पोर्टल तयार केले जाईल तसेच यासाठी नवतंत्रज्ञान आणण्याची सुद्धा गरज आहे.

पॅन कार्ड २.० (Pan card 2.0)मधील qr कोड :

   पॅन कार्ड २.० मधील क्यू आर कोड हा डायनॅमिक असणार आहे. पॅन कार्ड २.० यामध्ये असणाऱ्या क्यूआर कोड मुळे आपले पॅन कार्ड अधिक सेक्युअर राहील कारण यामुळे कुणीही आपले बनावट पॅन कार्ड तयार करू शकणार नाही तसेच पॅन कार्ड व्हेरिफिकेशन करणे सुद्धा सोपे जाणार आहे. पॅन कार्ड दोन पॉईंट झिरो मधील क्यू आर कोड स्कॅन करून रियल टाईम मध्ये सर्व माहिती एखाद्या मोबाईल ॲप मार्फत किंवा पोर्टल मार्फत बघू शकतो. पॅन कार्ड २.० च्या क्यू आर कोड मध्ये आपले नाव, पॅन क्रमांक, जन्मतारीख तसेच इतर डिटेल्स क्यू आर कोड च्या स्वरूपामध्ये असल्याकारणाने ते अधिक सुरक्षित होणार आहे.

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment