Pm vidyalakshmi Yojana 2024 | उच्च शिक्षणाकरिता विद्यार्थ्यांना मिळणार दहा लाखांचे कर्ज | प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना 2024 | best government schemes 2024 –

Pm vidyalakshmi Yojana 2024 | उच्च शिक्षणाकरिता विद्यार्थ्यांना मिळणार दहा लाखांचे कर्ज | प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना 2024 | best government schemes 2024 –

   काही विद्यार्थी हुशार असून सुद्धा त्यांना आर्थिक परिस्थितीमुळे पुढे उच्च शिक्षण घेता येत नाही परंतु अशा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत करण्याकरिता प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना सुरू करण्यात आलेली आहे. आजच्या ब्लॉगमध्ये आपण पीएम विद्या लक्ष्मी योजना याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत…

Pm vidyalakshmi Yojana 2024 | उच्च शिक्षणाकरिता विद्यार्थ्यांना मिळणार दहा लाखांचे कर्ज | प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना 2024 | best government schemes 2024 –

Pm vidyalakshmi Yojana
Pm Vidyalakshmi Yojana

Pm vidyalakshmi Yojana 2024 | प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना 2024 –

– प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना ही ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक अडचणी येतात त्यांच्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण अशी योजना आहे.

– उच्च शिक्षण घेण्याकरिता होणारा संपूर्ण खर्च बँकेमार्फत किंवा इतर वित्तीय संस्थांच्या मार्फत कुठल्याही गॅरेंटरच्या शिवाय प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेच्या अंतर्गत मिळणार आहे. 

– प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेला केंद्र सरकारमार्फत मंजुरी देण्यात आलेली आहे.

– हुशार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याकरिता आर्थिक मदत करणे असा पीएम विद्या लक्ष्मी योजनेचा मुख्य उद्देश आहे. 

– उच्च शिक्षण घेण्याकरिता इच्छुक असणारे विद्यार्थी आर्थिक कारणामुळे उच्च शिक्षण घेण्यापासून वंचित राहू नये असा सुद्धा या योजनेचा हेतू आहे.

– सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत करता यावी यासाठी पीएम विद्या लक्ष्मी योजना सुरू करण्यात आलेली आहे. 

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा अकाउंट ओपन झाल की मेसेज करा. मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेसाठी कोण पात्र आहेत ?

– आठ लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबीयांना शैक्षणिक कर्ज देण्यात येईल.

– उच्च शिक्षण घेण्यासाठी 7.5 लाख रुपयांपर्यंत कर्जावर 75 टक्के क्रेडिट गॅरंटी केंद्र सरकार देणार आहे. 

– तसेच आठ लाख रुपयांपर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असलेल्या परंतु इतर कोणत्याही सरकारी शिष्यवृत्ती किंवा व्यास सवलतीच्या योजनेअंतर्गत लाभार्थी नसलेल्या विद्यार्थ्यांना १० लाखांपर्यंतच्या कर्जासाठी ३ टक्के व्याज सवलत सुद्धा उपलब्ध केलेली आहे. दरवर्षी एक लाख विद्यार्थ्यांना शिक्षण मंत्रालयानुसार , व्याज सवलत दिली जाणार आहे.

– सरकारी संस्था तसेच तांत्रिक किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमांकरीता निवडलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. 

* पीएम विद्या लक्ष्मी योजनेमध्ये देशांमधील मुख्य 860 हायर एज्युकेशन सेंटर समाविष्ट आहेत म्हणजेच उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थेतील 22 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी यामध्ये समाविष्ट केले जातील.

प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साइज फोटो
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास )
  • पत्त्याचा पुरावा
  • बारावीचे प्रमाणपत्र
  • गुणपत्रिका
  • इतर आवश्यक कागदपत्रे

पीएम विद्या लक्ष्मी योजनेसाठी अर्ज कसा करावा | PM Vidyalakshmi Yojana –

– प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेसाठी अर्ज करण्याकरिता पुढील अधिकृत वेबसाईट आहे त्यावरून अर्ज करू शकता. 

अर्ज करण्याकरिता : येथे क्लिक करा.

– अर्ज काळजीपूर्वक भरायचा आहे त्यानंतर त्यासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहेत आणि अर्ज सबमिट करायचा आहे.

पीएम विद्या लक्ष्मी योजनेच्या पोर्टलवरून विद्यार्थी शैक्षणिक कर्जासाठी तसेच व्याज सवलतीसाठी अर्ज करू शकतात. 

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment