Post office Santosh Scheme | Postal Life insurance endowment plan Santosh | पोस्ट ऑफिस संतोष प्लॅन | पोस्टल लाइफ इन्शुरन्स एनडोमेंट प्लॅन संतोष | Best investment schemes 2024 –

Post office Santosh Scheme | Postal Life insurance endowment plan Santosh | पोस्ट ऑफिस संतोष प्लॅन | पोस्टल लाइफ इन्शुरन्स एनडोमेंट प्लॅन संतोष | Best investment schemes 2024 –

     आजच्या ब्लॉग मध्ये पोस्ट ऑफिस तर्फे असणारी पोस्टल लाइफ इन्शुरन्स एनडोमेंट प्लॅन संतोष ( Post office Santosh Scheme ) या स्कीम बद्दल अधिक माहिती बघणार आहोत. चला तर जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती…

Post office Santosh Scheme | पोस्ट ऑफिस संतोष प्लॅन –

Post office Santosh Scheme

– गव्हर्मेंट द्वारे पोस्ट ऑफिस तर्फे ही स्कीम सुरू करण्यात आलेली आहे. 

– या स्कीम अंतर्गत मॅच्युरिटी पिरियड नंतर सम एश्योर्ड आणि त्यासोबत बोनस सुद्धा मिळतो.

– ही स्कीम सेंट्रल गव्हर्नमेंट अंतर्गत असल्यामुळे आपण या स्कीम मध्ये जितके पैसे गुंतवतो त्याबद्दल जास्त चिंता करण्याची आपल्याला आवश्यकता राहत नाही कारण गुंतवणुकीची सुरक्षा भारत सरकार तर्फे होते.

पोस्ट ऑफिस संतोष प्लॅन आवश्यक पॅरामीटर्स | Post office Santosh Scheme Necessary Parameters –

प्रवेशाचे किमान वय ( minimum age at entry ) = १९ वर्षे. 

प्रवेशाचे कमाल वय ( maximum age at entry ) = ५५ वर्षे. 

परिपक्वतेचे वय ( Age at maturity )= 35,40,45,50,55,58,60 वर्षे. 

प्रीमियम पेमेंट टर्म = नियमित प्रीमियम ( Regular premium)

किमान विमा रक्कम =  20,000 रुपये.

कमाल विमा रक्कम =  50,00,000 रुपये.

प्रीमियम पेमेंट मोड: 

4 मोड उपलब्ध आहेत: 

मासिक – दर महिन्याला

 त्रैमासिक – 3 महिने

 सहामाही – 6 महिने 

वार्षिक – एकदा

Post office Santosh Scheme Example | पोस्ट ऑफिस संतोष प्लॅन उदाहरण –

समजा एका व्यक्तीचे वय पस्तीस वर्षे आहे.

वय 35 वर्ष.

सम एश्योर्ड – 10,00,000 रुपये

पॉलिसी टर्म – 25 वर्ष.

मैचुरिटी : 60 – 35=25 वर्ष.( वयाच्या 60 व्या वर्षी )

मंथली प्रीमियम पेमेंट मोड = 3200 रुपये

एनुअल प्रीमियम पेमेंट मोड = 38,400 रुपये

एकूण =  9,60,000 रुपये

मॅच्युरिटी :

सम एश्योर्ड – 10,00,000 रुपये

बोनस -13,00,000 रुपये ( 52 रुपये प्रति 1000 हा दर बदलू सुद्धा शकतो परंतु उदाहरणांमध्ये प्रत्येक वर्षासाठी 52 रुपये गृहीत केला आहे ).

एकूण – 23,00,000 रुपये

डेथ बेनिफिट : 

समजा ज्या व्यक्तीने पॉलिसी घेतलेली आहे त्या व्यक्तीसोबत काही घटना घडली/ मृत्यू झाल्यास अशावेळी डेथ बेनिफिट मिळतो.

सम एश्योर्ड = 10,00,000 रुपये

बोनस = दरवर्षी 52 हज़ार रूपये याप्रमाणे मिळेल.( 52 रुपये प्रति 1000 हा दर बदलू सुद्धा शकतो परंतु उदाहरणांमध्ये प्रत्येक वर्षासाठी 52 रुपये गृहीत केला आहे ).

5 वर्षानंतर मृत्यू झाल्यास :

सम एश्योर्ड =  10,00,000 रुपये

5 वर्षाचा बोनस = 2,60,000 रुपये

एकूण =  12,60,000 रुपये

10 वर्षानंतर मृत्यू झाल्यास :

सम एश्योर्ड = 10,00,000 रुपये.

10 वर्षासाठी बोनस = 5,20,000 रुपये

एकूण = 15,20,000 रुपये

20 वर्षानंतर मृत्यू झाल्यास :

एकूण = 20,40,000 रुपये.

सरेंडर व्हॅल्यू :

 3 वर्षांसाठी प्रीमियम भरल्यानंतर पॉलिसी सरेंडर केली जाऊ शकते .

कर्ज सुविधा: 3 वर्षांचा प्रीमियम भरल्यानंतर. 

रिवाइवल ऑफ़ पॉलिसी : 

– बंद पॉलिसी पुन्हा चालू करणे. 

– जर पॉलिसी सुरू करून तीन वर्ष पूर्ण झाले नसतील आणि सहा महिन्यांपर्यंत प्रीमियम भरला नसेल तर

पॉलिसी लॅप्स होते.

– थकबाकी प्रीमियम व्याजासहित भरून रद्द झालेली पॉलिसी पुन्हा सुरू करू शकता,कव्हरेज पुन्हा सुरू होते.

कर लाभ: 

प्राप्तिकर = कलम 80(c) कलम 10(10)D अंतर्गत परिपक्वता किंवा मृत्यू लाभ प्राप्तिकरमुक्त .

Post office Santosh Scheme Example | पोस्ट ऑफिस संतोष प्लॅन उदाहरण –

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Leave a Comment