Pradhanmantri Matru Vandana Yojana | गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना मिळणार ६००० रुपये | प्रधानमंत्री मातृ वंदना योजना I Best Government Schemes 2024

गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना मिळणार ६००० रुपये | प्रधानमंत्री मातृ वंदना योजना  | Pradhanmantri Matru Vandana Yojana –

      ज्या महिलांची घरची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे त्यांना त्या गर्भवती असताना किंवा नंतर सुद्धा व्यवस्थित रित्या आहार किंवा आराम मिळू शकतो परंतु ज्या महिलांची परिस्थिती हालाखीची आहे, गरीबीची आहे अशा महिला अगदी गर्भवती असताना सुद्धा मोलमजुरी करतात, अशा महिलांना म्हणावा असा आराम सुद्धा मिळत नाही आणि पोषक आहार सुद्धा मिळत नाही. अशा महिलांना विचारात घेऊन सरकारने एक योजना सुरू केलेली आहे प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ( PradhanMantri Matru Vandana Yojana

Advertisement
) या योजनेबद्दलच अधिक माहिती आज आपण जाणून घेणार आहोत….

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना  | PradhanMantri Matru Vandana Yojana –

PradhanMantri Matru Vandana Yojana

– महिला आणि बालविकास मंत्रालयाद्वारे चालवली जाणारी आणि जानेवारी 2017 मध्ये सुरू करण्यात आलेली केंद्र पुरस्कृत योजना म्हणजेच प्रधानमंत्री मातृ वंदना योजना होय.

– प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत राज्य शासनाचा 40% तर केंद्र शासनाचा 60 टक्के सहभाग आहे.

– गर्भवती महिलांना प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेमुळे जीवनमान सुधारण्यामध्ये तसेच आर्थिक व सामाजिक विकास होण्यामध्ये मदत होणार आहे.

– प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे लाभार्थी गर्भवती स्त्रिया व स्तनपान करणाऱ्या माता असणार आहे.

– प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत गर्भवती स्त्रिया व स्तनपान करणाऱ्या माता यांना आर्थिक लाभ मिळणार असून मिळणारा आर्थिक लाभ डीबीटीच्या सहाय्याने थेट लाभार्थी महिलेच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतो.

– प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेमुळे गर्भवती महिलांना आर्थिक मदत तर मिळणार आहेत त्याचबरोबर योग्य सुविधा मिळाल्यामुळे जन्मलेल्या बाळाला कुपोषित होण्यापासून वाचविणे हा सुद्धा प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा उद्देश आहे.

– प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेमुळे जे आर्थिक सहाय्य मिळणार आहे त्यामुळे हालाखीची परिस्थिती असणाऱ्या, मोलमजुरी करणाऱ्या किंवा इतर काही काम करून कुटुंबास आर्थिक सहाय्य करणाऱ्या महिलांना प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतर सुद्धा आराम मिळू शकतो.

– गर्भवती महिलांना योग्य आहार व आराम मिळाल्यामुळे गर्भवती महिलांचे तसेच बाळाचे मृत्यूचे प्रमाण कमी करणे हा सुद्धा प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा उद्देश आहे.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे लाभार्थी –

– गर्भवती महिला व स्तनपान करणाऱ्या माता प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी पात्र असतील.

– दारिद्र्यरेषेखालील तसेच दारिद्र्यरेषेवरील महिलांना सुद्धा प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ घेता येणार आहे.

– जर महिलेचा नैसर्गिकरित्या गर्भपात झाला किंवा मृत बाळ जन्माला आले तर त्यावेळी सुद्धा प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ घेता येणार आहे.

– राज्य सरकारमध्ये किंवा केंद्र सरकारमध्ये नोकरी करत असलेल्या गर्भवती व स्तनपान करणाऱ्या माता यांना सुद्धा प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ मिळणार आहे.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक साहाय्य – 

– प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य आई आणि तिच्या बाळाची देखभाल करण्यासाठी आहे.

– प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत शासनाने अधिसूचना केलेल्या शासकीय रुग्णालयामध्ये नोंदणी केलेल्या गर्भवती महिलेस तीन हप्त्यांमध्ये 6,000/- रुपये इतकी रक्कम डीबीटीद्वारे थेट महिलेच्या बँक खात्यात  जमा केली जाईल.

पहिला हप्ता ( गरोदरपणाच्या नोंदणीच्या वेळी ) : 1000 रुपये 

दुसरा हप्ता  गर्भधारणेच्या सहा महिन्यांनंतर जर लाभार्थी किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी करून घेत असेल ) : 2000 रुपये

तिसरा हप्ता ( जेव्हा बाळाच्या जन्माची नोंदणी केली जाते आणि बीसीजी, ओपीव्ही, डीपीटी आणि हिपॅटायटीस-बी सह लसींचे पहिले चक्र सुरू होते.) : 2000 रुपये

तर बाळाला जेव्हा रुग्णालयामध्ये आई जन्म देते त्यावेळी जननी सुरक्षा योजना या योजनेअंतर्गत उर्वरित 1,000/- रुपये लाभार्थी महिलेला दिले जातात.

.( परंतु काही नवीन अपडेट्स आलेले आहेत ते पुढे जाणून घेणार आहोत )

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत आवश्यक पात्रता | Eligibility criteria for Pradhanmantri Matru Vandana Yojana

– अर्जदार महिला महाराष्ट्राची मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.

– या योजनेअंतर्गत लाभार्थी महिला एकदाच लाभ मिळवण्यासाठी पात्र असेल.( परंतु काही नवीन अपडेट्स आलेले आहेत ते पुढे जाणून घेणार आहोत )

– जर समजा महिलेला पहिला हप्ता मिळाला आणि प्रसुती दरम्यान गर्भवती महिलेचा गर्भपात झाल्यास त्या महिलेला भविष्यामध्ये कोणतीही गर्भधारणा झाली तरी उर्वरित हप्त्यांवर दावा करता येणार आहे.

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना नियम व अटी –

– भारतामधील महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

– महिलेचे वय किमान 19 वर्ष असणे आवश्यक आहे.

– जर समजा महिलेला गर्भधारणेच्या वेळी वेतनासहित मातृत्व रजा दिलेली असेल तर प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचा लाभ घेता येणार नाही.

– लाभार्थी महिलेला या योजनेअंतर्गत समजा पहिला हप्ता मिळाला आणि त्यानंतर प्रसुती दरम्यान जर गर्भवती महिलेचा गर्भपात झाला तर भविष्यामध्ये गर्भधारणेच्या बाबतीत उर्वरित हप्त्यांवर दावा करण्याचा महिलेचा हक्क असेल.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना आवश्यक कागदपत्रे | Necessary documents for Pradhanmantri Matru Vandana Yojana –

– रेशन कार्ड

– लाभार्थी महिला व तिच्या पतीचे आधारकार्ड

– बँक खाते किंवा पोस्ट खाते

– पासपोर्ट साईज फोटो.

– माता बाळ संरक्षण कार्ड (MCP कार्ड)

– मोबाईल नंबर

लाभ मिळवण्यासाठी पुढील प्रमाणे टप्यानुसार कागदपत्रांची आवश्यकता असेल :

१.फॉर्म 1A भरावा. ह्या अर्जा सोबत माता व बालसंरक्षण प्रमाणपत्र म्हणजेच MCP कार्ड  आणि बँक किंवा पोस्ट खात्याची माहिती देणे आवश्यक आहे.

२. दुसऱ्या लाभाच्या टप्प्यासाठी किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी (ANC) केल्याचे फॉर्म 1B माता आणि बाल संरक्षण प्रमाणपत्रावर नोंदवणे आवश्यक आहे.

३.लाभाच्या तिसर्‍या टप्प्यासाठी, जन्म नोंदणी प्रमाणपत्राची फॉर्म 1C प्रत त्या सोबत बाळाच्या लसीकरणाचा पहिला डोस दिल्याची नोंद MCP कार्ड सादर करणे आवश्यक आहे.

*हे फॉर्म अंगणवाडी केंद्र किंवा मान्यताप्राप्त आरोग्य संस्थेकडून अगदी मोफत मिळतील.जर समजा लाभार्थीकडे आधार कार्ड किंवा बँक खाते किंवा पोस्ट खाते नसेल तर अंगणवाडी सेविका/एएनएम हे कार्ड आणि खाते मिळविण्यामध्ये मदत करतील.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी नोंदणी –

ऑनलाइन नोंदणी:

१. पंतप्रधान मातृ वंदना योजनेसाठी अर्ज ऑनलाईन करायचा असल्यास महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

२.नंतर होम पेजवर विचारलेली माहिती उदाहरणार्थ ईमेल आयडी, पासवर्ड आणि कॅप्चा कोड फॉर्ममध्ये भरा.

३. नंतर दिलेल्या लॉगिन ऑप्शन वर क्लिक करा.

४.क्लिक केल्यानंतर ह्या योजनेचा अर्ज ओपन होईल.

५. अर्जामध्ये विचारलेली माहिती योग्यरीत्या भरून अर्ज सबमिट करावा.

    अशा प्रकारे प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

* उमंग अॅप द्वारे सुद्धा प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी नोंदणी करता येऊ शकते.

ऑफलाईन नोंदणी :

१. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या व पात्र असणाऱ्या महिलांनी त्यांच्या जिल्ह्यामधील स्वयंसेविका, अंगणवाडी केंद्र (AWC), आरोग्य सेविका, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र,तालुका आरोग्य-अधिकारी कार्यालयामध्ये ह्या योजनेअंतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे.

२.नोंदणी करण्यासाठी अर्ज आणि त्यासोबत आवश्यक सर्व कागदपत्रे जोडून अंगणवाडी सेविका आरोग्य-अधिकारी कार्यालयात फॉर्म जमा करावा.

३ लाभार्थी महिलेने रेकॉर्ड साठी आणि भविष्यामधील संदर्भासाठी अंगणवाडी सेविका / आशा/ एएनएम आरोग्य-अधिकारी कार्यालयाकडून पोचपावती अवश्य घ्यावी.

*आवश्यक फॉर्म AWC/मान्यताप्राप्त आरोग्य सुविधेतून मोफत मिळू शकतात. महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या वेबसाइटवरून (http://wcd.nic.in) सुद्धा फॉर्म डाउनलोड करता येतात.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना नवीन अपडेट –

1.नवीन नियमांनुसार, प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेंतर्गत पहिल्या बाळाला 5 हजार रुपये शासनाकडून देण्यात येत होते परंतु आता दुसरे बाळ जर मुलगी असले तर या योजनेंतर्गत सरकारकडून प्रोत्साहन म्हणून 6,000 रुपये दिले जातील.

2.गर्भवती महिलांना आता खासगी रुग्णालयांमध्ये सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे , यासाठी आता खासगी रुग्णालयामध्ये येणाऱ्या गर्भवती महिलांना प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी प्रथम कोणत्याही शासकीय रुग्णालयात नोंदणी करावी लागणार आहे.

3. सुरुवातीला पाच हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले जात होते परंतु आता ही रक्कम दोन हप्त्यांमध्येच दिली जाणार आहे..

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना युजर मॅन्युअल डाउनलोड करण्यासाठी : येथे क्लिक करा.

Advertisement

Leave a Comment