Rainy season business ideas | पावसाळ्यामध्ये चांगली कमाई करून देणारे व्यवसाय | Best business opportunities 2024 –
जर तुम्ही व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर हा ब्लॉग नक्कीच तुमच्यासाठी मदत पूर्ण ठरू शकतो. आजच्या ब्लॉगमध्ये आपण पावसाळ्यामध्ये चांगली कमाई ( Rainy season business ideas ) करून देणारे व्यवसाय याबद्दल माहिती बघणार आहोत. चला तर सुरुवात करूयात…
Rainy season business ideas | पावसाळ्यामध्ये चांगली कमाई करून देणारे व्यवसाय –
Table of Contents
जाणून घेऊयात असे कोणते व्यवसाय (Rainy season business ideas )आहेत की जे आपण पावसाळ्यामध्ये सुरू केले तर चांगली कमाई होऊ शकते :
१. छत्रीचे व्यवसाय | Umbrella Business –
पावसाळ्यामध्ये सर्वांसाठीच महत्वपूर्ण असते ती छत्री. अगदी घराबाहेर पडताना सुद्धा आपण आपल्या सोबत छत्री ठेवत असतो कारण छत्री आपले पावसापासून संरक्षण करते. पावसाळ्यामध्ये छत्री खूप गरजेची वस्तू आहे. छत्री सोबत ठेवण्यास सुद्धा सोपी असते त्यामुळे पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी छत्रीची मागणी पावसाळ्यामध्ये नक्कीच वाढते. छत्रीमध्ये सुद्धा विविध प्रकार येतात जसे की छोट्या मुलांसाठी वेगळी छत्री, लेडीज छत्री, जेंट्स छत्री, रंगबिरंगी छत्री किंवा डिझायनर छत्री. या छत्री वैयक्तिकदृष्ट्या महत्त्वाच्या असतातच परंतु काही लोक पावसाळ्यामध्ये होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये रिटर्न गिफ्ट म्हणून सुद्धा छत्री देतात किंवा काही सुपर मार्केटमध्ये ऑफर सुद्धा असतात की इतक्या इतक्या अमाऊंटची खरेदी केल्यानंतर त्यावर गिफ्ट दिले जाते आणि हे गिफ्ट छत्री सुद्धा असते. म्हणूनच पावसाळ्यामध्ये छत्रीचा व्यवसाय हा फायदेशीर ठरू शकतो.
२. मच्छरदाणी | Mosquito nets –
आपल्या सर्वांनाच माहिती असेल की पावसाळ्यामध्ये डासांचे प्रमाण जास्त वाढते. तसेच ठिकठिकाणी पाणी साचते त्यामुळे सुद्धा डासांचे प्रमाण वाढते. हल्ली डासांपासून संरक्षण करण्यासाठी क्रीम, जेल ,रिपेरंट लोशन हे सुद्धा वापरले जाते परंतु बरेच लोक डासांपासून संरक्षण करण्यासाठी मच्छरदाणी वापरणे निवडतात. परंतु मच्छरदाणी सोबत इतर डासांपासून संरक्षण करणारे उत्पादने सुद्धा आपण विकू शकतो.
३. रेनकोट आणि रबर बूट | Raincoat and Rubber Boot –
पावसाळ्यामध्ये छत्री व्यतिरिक्त पावसापासून संरक्षण करण्यासाठी वापरली जाणारी वस्तू म्हणजे रेनकोट. पावसाळा सुरू झाला तरी सुद्धा कामानिमित्त घराबाहेर पडावेच लागते तसेच विद्यार्थ्यांना सुद्धा शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये जावेच लागते आणि अशावेळी सायकलवरून किंवा गाडीवरून प्रवास करत असताना छत्री पकडणे शक्य होत नाही आणि त्यावेळी वापरला जातो तो रेनकोट. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वजण रेनकोट वापरू शकतात. रेनकोट मध्ये सुद्धा विविध व्हरायटी बघायला मिळते. पावसाळ्यामध्ये रेनकोट विक्री व्यवसाय हा सुद्धा फायदेशीर ठरू शकतो.
पावसाळ्यामध्ये आपण इतर वेळी ज्या चप्पल किंवा शूज वापरतो ते वापरणे कठीण होऊन जाते म्हणजेच चालताना त्रास होऊ शकतो तसेच चप्पल किंवा शूज ओले होऊ शकतात तुटू शकतात किंवा चिखलामध्ये रुतू शकतात आणि म्हणूनच पावसाळ्यामध्ये रबर बूट वापरले जाणे सोयीस्कर ठरते. हा व्यवसाय सुद्धा पावसाळ्यामध्ये फायदेशीर ठरू शकतो.
४. मोबाईल कार वॉश | Mobile car wash –
पावसाळ्यासाठी आणखी एक उत्तम व्यवसाय कल्पना म्हणजे मोबाईल कार वॉश.पावसाळ्यामध्ये ठिकठिकाणी पाणी साचलेले असते आणि हेच पाणी ज्यावेळी आपली गाडी किंवा आपल्याकडे असणारे इतर वाहन त्या पाण्याजवळून किंवा पाण्यामधून जाते तेव्हा वाहन आपोआपच खराब होते. आणि दरवेळी प्रत्येक जण स्वतः आपले वाहन स्वच्छ करू शकेलच असे नाही अशावेळी जर आपण हा व्यवसाय सुरू करणार असाल तर आपल्याकडे कार किंवा ते वाहन धुण्यासाठी आवश्यक असणारी सामग्री घेऊन ठिकठिकाणी जाऊ शकतो किंवा गॅरेज, पार्किंग किंवा क्लाइंटच्या घरी सुद्धा ही सर्विस उपलब्ध करून देऊ शकतो.
अशाप्रकारे हे काही व्यवसाय आहेत की जे इतर ऋतूंच्या तुलनेमध्ये पावसाळ्यामध्ये (Rainy season business ideas ) सुरू केले तर अधिक फायदेशीर ठरू शकतात. आता हे व्यवसाय सुरू करत असताना आपण या वस्तू होलसेलर कडून खरेदी करून रिटेलर म्हणून विकू शकतो. यासाठी जो व्यवसाय सुरू करणार आहोत त्या व्यवसायाची संपूर्ण माहिती घेऊन होलसेलर्स शोधावेत. ज्या होलसेलरकडे वस्तूची चांगली क्वालिटी आणि किंमत सुद्धा योग्य असेल त्या ठिकाणावरून खरेदी करावी.